वेगवान वाऱ्यामुळे होणाऱ्या आंब्याच्या नुकसानीलाही विमा

आंबा नुकसान
आंबा नुकसान

रत्नागिरी ः यंदाच्या आर्थिक वर्षासाठी आंबा, काजूला हवामानावर आधारित फळपीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. आंब्यासाठी विमा लाभांश देताना कमाल, किमान तापमान, अवेळी पाऊस, गारपीट या निकषांबरोबर वेगवान वाऱ्या‍मुळे होणाऱ्या नुकसानीचाही समावेश करण्यात आला आहे. कोकणातील आंबा बागायतदारांना याचा लाभ मिळणार आहे. शासनाने २०१९-२० या वर्षासाठी हवामानातील धोक्यानुसार फळपीक विमा योजना लागू केली आहे. यासाठी भारतीय कृषी विमा कंपनीची नेमणूक झाली आहे. विमा उतरवण्यासाठी ३० नोव्हेंबर २०१९ पर्यंत मुदत शेतकऱ्यांना दिली आहे. काजूसाठी अवेळी पाऊस, किमान तापमान आणि गारपीट यामुळे नुकसान झाल्यास भरपाई मिळते. आंबा पिकासाठी कमाल, किमान तापमानासह अवेळी पावसामुळे होणऱ्या नुकसानीपोटी बागायतदारांना लाभांश दिला जात होता. यंदा त्यात आणखीन एका निकषाची वाढ केली आहे.  गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये वादळी वाऱ्यामुळे कोकणातील आंबा बागायतदारांना मोठा फटका बसला होता. फळगळ झाल्याने उत्पादनावरही त्याचा परिणाम झाला. त्यानुसार शासनाने वेगवान वाऱ्यामुळे होणाऱ्या फळगळीच्या नुकसानीपोटीही भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. १६ एप्रिल ते १५ मे २०२० या कालावधीत कोणत्याही दिवशी वाऱ्याचा वेग ताशी २५ किलोमीटर राहिल्यास नुकसानभरपाई १४ हजार ३०० रुपये हेक्टरी दिली जाईल. त्यापेक्षा अधिक वाऱ्याचा वेग राहिल्यास हेक्टरी भरपाई २४ हजार २०० रुपये देय राहील. आंबा नुकसानभरपाई प्रतिहेक्टर रक्कम आणि प्रमाणके (ट्रिगर) अवेळी पाऊस (१ डिसेंबर २०१९ ते ३१ मार्च) ः कोणत्याही १ दिवस ५ मीमी किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास हेक्टरी ६,०५० रुपये, सलग २ दिवस ५ मीमी किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास १०,९०० रुपये. १ एप्रिल २०२० ते १५ मे या कालावधीत २५ मिमी किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस एका दिवसात झाल्यास १३,३०० (कमाल देय रक्कम रुपये २४,२००) देय होईल. कमी तापमान (१ जानेवारी २०२० ते १० मार्च २०२०) ः या कालावधीत कोणत्याही सलग ३ दिवस १३ डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास रक्कम ४,३००, सलग ४ दिवस १३ डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास ८,५८०, सलग ५ दिवस १३ डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास १२,२०० रुपये, सलग ६ दिवस १३ डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास रक्कम १६,५०० रुपये, सलग ७ दिवस १३ डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास २४,२०० रुपये (कमाल देय रक्कम २४,२०० रुपये)  वेगाचा वारा (१६ एप्रिल २०२० ते १५ मे) ः कोणत्याही दिवसी वाऱ्याचा वेग २५ किमी प्रतितास राहिल्यास नुकसानभरपाई १४३०० रुपये, वारा वेग २५ किमीपेक्षा जास्त राहिल्यास २४२०० रुपये देय राहील. जास्त तापमान  (१ मार्च ते १५ मे २०२०) ः दिलेल्या कालावधीत कोणतेही ३ दिवस ३७ डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास १२,२०० रुपये, सलग ४ दिवस ३७ डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास २४,४०० रुपये, सलग ५ दिवस ३७ डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रक्कम ३६,३०० रुपये, सलग ५ दिवसांपेक्षा जास्त ३७ डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास ४८,४०० रुपये लाभांश मिळेल. गारपिटीसाठी हेक्टरी ४० हजार ३३३ रुपये देय राहतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com