agriculture news in Marathi,mango loss due to heavy wind in insurance cover, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

वेगवान वाऱ्यामुळे होणाऱ्या आंब्याच्या नुकसानीलाही विमा
टीम अॅग्रोवन
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

रत्नागिरी ः यंदाच्या आर्थिक वर्षासाठी आंबा, काजूला हवामानावर आधारित फळपीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. आंब्यासाठी विमा लाभांश देताना कमाल, किमान तापमान, अवेळी पाऊस, गारपीट या निकषांबरोबर वेगवान वाऱ्या‍मुळे होणाऱ्या नुकसानीचाही समावेश करण्यात आला आहे. कोकणातील आंबा बागायतदारांना याचा लाभ मिळणार आहे.

रत्नागिरी ः यंदाच्या आर्थिक वर्षासाठी आंबा, काजूला हवामानावर आधारित फळपीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. आंब्यासाठी विमा लाभांश देताना कमाल, किमान तापमान, अवेळी पाऊस, गारपीट या निकषांबरोबर वेगवान वाऱ्या‍मुळे होणाऱ्या नुकसानीचाही समावेश करण्यात आला आहे. कोकणातील आंबा बागायतदारांना याचा लाभ मिळणार आहे.

शासनाने २०१९-२० या वर्षासाठी हवामानातील धोक्यानुसार फळपीक विमा योजना लागू केली आहे. यासाठी भारतीय कृषी विमा कंपनीची नेमणूक झाली आहे. विमा उतरवण्यासाठी ३० नोव्हेंबर २०१९ पर्यंत मुदत शेतकऱ्यांना दिली आहे. काजूसाठी अवेळी पाऊस, किमान तापमान आणि गारपीट यामुळे नुकसान झाल्यास भरपाई मिळते. आंबा पिकासाठी कमाल, किमान तापमानासह अवेळी पावसामुळे होणऱ्या नुकसानीपोटी बागायतदारांना लाभांश दिला जात होता. यंदा त्यात आणखीन एका निकषाची वाढ केली आहे. 

गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये वादळी वाऱ्यामुळे कोकणातील आंबा बागायतदारांना मोठा फटका बसला होता. फळगळ झाल्याने उत्पादनावरही त्याचा परिणाम झाला. त्यानुसार शासनाने वेगवान वाऱ्यामुळे होणाऱ्या फळगळीच्या नुकसानीपोटीही भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. १६ एप्रिल ते १५ मे २०२० या कालावधीत कोणत्याही दिवशी वाऱ्याचा वेग ताशी २५ किलोमीटर राहिल्यास नुकसानभरपाई १४ हजार ३०० रुपये हेक्टरी दिली जाईल. त्यापेक्षा अधिक वाऱ्याचा वेग राहिल्यास हेक्टरी भरपाई २४ हजार २०० रुपये देय राहील.

आंबा नुकसानभरपाई प्रतिहेक्टर रक्कम आणि प्रमाणके (ट्रिगर)
अवेळी पाऊस (१ डिसेंबर २०१९ ते ३१ मार्च) ः
कोणत्याही १ दिवस ५ मीमी किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास हेक्टरी ६,०५० रुपये, सलग २ दिवस ५ मीमी किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास १०,९०० रुपये. १ एप्रिल २०२० ते १५ मे या कालावधीत २५ मिमी किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस एका दिवसात झाल्यास १३,३०० (कमाल देय रक्कम रुपये २४,२००) देय होईल.
कमी तापमान (१ जानेवारी २०२० ते १० मार्च २०२०) ः या कालावधीत कोणत्याही सलग ३ दिवस १३ डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास रक्कम ४,३००, सलग ४ दिवस १३ डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास ८,५८०, सलग ५ दिवस १३ डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास १२,२०० रुपये, सलग ६ दिवस १३ डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास रक्कम १६,५०० रुपये, सलग ७ दिवस १३ डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास २४,२०० रुपये (कमाल देय रक्कम २४,२०० रुपये) 
वेगाचा वारा (१६ एप्रिल २०२० ते १५ मे) ः कोणत्याही दिवसी वाऱ्याचा वेग २५ किमी प्रतितास राहिल्यास नुकसानभरपाई १४३०० रुपये, वारा वेग २५ किमीपेक्षा जास्त राहिल्यास २४२०० रुपये देय राहील.
जास्त तापमान  (१ मार्च ते १५ मे २०२०) ः दिलेल्या कालावधीत कोणतेही ३ दिवस ३७ डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास १२,२०० रुपये, सलग ४ दिवस ३७ डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास २४,४०० रुपये, सलग ५ दिवस ३७ डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रक्कम ३६,३०० रुपये, सलग ५ दिवसांपेक्षा जास्त ३७ डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास ४८,४०० रुपये लाभांश मिळेल. गारपिटीसाठी हेक्टरी ४० हजार ३३३ रुपये देय राहतील.

इतर अॅग्रो विशेष
विमा कंपनीकडे ३५० शेतकऱ्यांचा हप्ता...संग्रामपूर, जि. बुलडाणा ः तालुक्यातील टाकळी पंच...
ढगाळ हवामानामुळे तापमानात चढ-उतारपुणे : राज्यात थंडीची चाहूल लागल्यानंतर अंशत:...
अनुदान नव्हे; योगदानच वाचवेल शेतीलावातावरण बदल आणि कोसळणाऱ्या पाऊस धारा अथवा कडक...
साखर निर्यातीची सुवर्णसंधीपावसाळी स्थितीमुळे निर्यात न होऊ शकलेल्या साखर...
कापूस लोकायची लाज राखते; पण आमचं काय? यवतमाळ : ‘‘आमच्या कापसापासून तयार कपड्यानं आमी...
कंपोस्ट खते बनविण्याच्या पद्धतीजमिनीचा कस टिकविण्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा...
एकदम बाजार समित्या बरखास्त करू नका:...पुणे ः केंद्रीय अर्थमंत्र्यांनी बाजार समित्या...
पावसाने मोसंबीच्या उत्पादनातही संकटाची...औरंगाबाद : लिंबूवर्गीय फळपिकात 'राजा' पीक म्हणून...
आंतरराष्ट्रीय द्राक्ष चर्चासत्र आजपासूनपुणे: राष्ट्रीय द्राक्ष संशोधन (एनआरसीजी)...
राज्यात पीकहानी ७० लाख हेक्टरच्याही...पुणे : केंद्र शासनाला पाठविल्या जाणाऱ्या अहवालात...
राज्यात गारठा वाढला; नगर १२.१ अंशावरपुणे : किमान तापमानात घट होत असल्याने राज्यात...
साखर कारखान्यांसाठी कर्ज परतफेडीचा...नवी दिल्ली ः केंद्र सरकारने साखर कारखान्यांसाठी...
दोडका पिकाने उंचावले अर्थकारणधामणखेल (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील चंद्रकांत...
पेरू विक्रीसाठी प्रसिद्ध पेरणे फाटापुणे जिल्ह्यातील हवेली आणि शिरूर तालुक्यांच्या...
जळगावचे उडीद मार्केट यंदा पोचले...उडीद उत्पादनात खानदेश अग्रेसर आहे. जळगावच्या...
पर्यायाविना निर्णय घातकच! ऑ नलाइन राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) अधिक...
नैसर्गिक आपत्तीपासूनचा धडा काही वेदनांमधून सुखद आनंदप्राप्ती होते, तर काही...
किमान तापमानात किंचित वाढपुणे  : राज्यात थंडीची चाहूल लागल्यानंतर...
बाजार समित्यांना सक्षम पर्याय द्याः...पुणे ः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी...
पावसाने संत्र्यात ४० टक्के फळगळ; ४००...नागपूर : राज्याचे मुख्य फळपिकांत महत्त्वाचे स्थान...