मांजरपाडा-देवसाने प्रकल्पाचे श्रेय आघाडी सरकारचे ः भुजबळ

देवसाने, ता.दिंडोरी : मांजरपाडा प्रकल्पाचा बोगदा पूर्ण झाला असून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. (छायाचित्र : केशव मते)
देवसाने, ता.दिंडोरी : मांजरपाडा प्रकल्पाचा बोगदा पूर्ण झाला असून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. (छायाचित्र : केशव मते)

नाशिक : आघाडी सरकारच्या काळामध्ये मांजरपाडा बोगद्याचे काम जवळजवळ ९० टक्के काम पूर्ण झाले होते. मात्र २०१४ मध्ये राजकीय हेतूने ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पाची चौकशी लावून या प्रकल्पाचे काम रखडविण्यात आले. त्यासाठी विरोधात असताना व तुरुंगात गेल्यानंतर हे काम पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करावा लागला. त्यामुळे हे सर्व श्रेय आघाडी सरकारचेच आहे, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली.  मांजरपाडा-देवसाने प्रकल्पाचे जलपूजन गुरुवारी (ता. २५) झाले. या वेळी ते बोलत होते. भुजबळ म्हणाले, ‘‘आघाडीचे सरकार असताना मांजरपाडाच्या उर्वरित कामांसाठी ७० कोटींची तरतूद करून ठेवली होती. मात्र, सत्तापरिवर्तनानंतर ही रक्कम इतरत्र वळविण्यात आली. दरम्यानच्या काळात कारागृहात असल्याने तेथूनही या कामासाठी त्यांचा सतत रेटा सुरू होता. त्यामुळे शासनाला या प्रकल्पाला तृतीय प्रशासकीय मान्यता द्यावी लागली. त्यामुळे जूनमध्ये बोगद्याचे काम पूर्ण झाले.’’  प्रकल्पाविषयी काय म्हणाले छगन भुजबळ पहा video दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ, माजी आमदार धनराज महाले, राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष श्रीराम शेटे यांनी दुष्काळी चांदवड, येवला तालुक्यासह मराठवाड्यात पाणी पोचवण्याचे श्रेय भुजबळांना दिले. दिंडोरी तालुक्याला १०० दशलक्ष घनफूट पाणी मिळावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली.  निवडणुका नाही, शेतकरी महत्त्वाचा  निवडणूक येतील जातील, हार-जीत होत राहील. मात्र, शेतकरी जगला पाहिजे. कुणाला माझ्या पक्षांतराचे पडले आहे. मात्र, मला माझ्या मतदारसंघाच्या विकासाचे पडलेले आहे. गुजरातला जाणारे पाणी अडवून महाराष्ट्राच्या जनतेला मिळावे यासाठी सरकारने सकारात्मक पाऊल उचलावे, आम्ही सरकारच्या बरोबर असू या शब्दांत भुजबळांनी आपली भूमिका मांडली. पुन्हा जलपूजन ! मांजरपाडा प्रकल्पावरून पालकमंत्री व भुजबळ यांच्यात श्रेयवाद रंगल्याचे दिसून येते. पालकमंत्री गिरीश महाजन पुन्हा जलपूजन करणार असल्याची मला समाज माध्यमांवरून समजल्याने छगन भुजबळ यांनी या वेळी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com