Agriculture news in marathi;Many medium projects overflow in Khandesh | Agrowon

खानदेशातील अनेक मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लो

टीम अॅग्रोवन
रविवार, 11 ऑगस्ट 2019

जळगाव ः खानदेशातील जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या गिरणा नदीवरील गिरणा धरण तब्बल पाच वर्षांनंतर ६६ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक भरले आहे. सोबतच धुळ्यातील बुराई, नंदुरबारमधील दरा, शहादामधील सुसरी हे मध्यम प्रकल्पदेखील तब्बल तीन वर्षांनंतर ओव्हर फ्लो झाले आहेत. कमाल लघु व मध्यम प्रकल्प भरल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

जळगाव ः खानदेशातील जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या गिरणा नदीवरील गिरणा धरण तब्बल पाच वर्षांनंतर ६६ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक भरले आहे. सोबतच धुळ्यातील बुराई, नंदुरबारमधील दरा, शहादामधील सुसरी हे मध्यम प्रकल्पदेखील तब्बल तीन वर्षांनंतर ओव्हर फ्लो झाले आहेत. कमाल लघु व मध्यम प्रकल्प भरल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

जुलैच्या अखेरीस व २ ऑगस्टपर्यंत धुळ्यातील पांझरा, जळगावमधील तोंडापूर, नंदुरबारमधील रंगावली मध्यम हे प्रकल्प १०० टक्के भरले होते. तर मागील आठ दिवसांतील पावसाने रावेर (जि. जळगाव) तालुक्‍यातील मंगरूळ, सुकी, अभोरा हे मध्यम प्रकल्प, गारबर्डी लघुप्रकल्प, यावलमधील मोर मध्यम प्रकल्प, चोपड्यातील गूळ, नंदुरबारमधील दरा, धुळ्यातील बुराई, मालनगाव, करवंद, नंदुरबारमधील शहादा तालुक्‍यातील सुसरी हे प्रकल्प या आठवड्यातील पावसाने १०० टक्के भरले आहेत.

यावलमधील मोर प्रकल्पात ७० टक्के तर चोपड्यातील गूळ प्रकल्पात ६३ टक्‍क्‍यांवर आणि धुळे जिल्ह्यातील शिरपूरमधील अनेर प्रकल्पात ३४ टक्‍क्‍यांवर साठा असून, त्यातील आवक वाढतच आहे. सतर्कता म्हणून मोर, अनेर व गूळ प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे तिन्ही प्रकल्पदेखील १०० टक्के भरल्याची शाश्‍वती आहे. हतनूर धरणाचे सर्व ४१ दरवाजे शनिवारी (ता. १०) सकाळा नऊ वाजता उघडण्यात आले होते. या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पुन्हा एकदा देण्यात आला. मागील १० दिवसांत हतनूरचे सर्व दरवाजे उघडले. जामनेर (जि. जळगाव) तालुक्‍यातील वाघूर प्रकल्पाचा साठा मात्र फारसा वाढलेला नाही. 

शनिवारी सकाळी नऊपर्यंत विविध प्रकल्पांमधील साठा (टक्केवारीत) ः 
जळगाव ः गिरणा ६६.१३, वाघूर ३६.८३, मोर ७०, गूळ ६३, बोरी ११, बहुळा ११.८८. जळगाव जिल्ह्यातील अग्नावती, हिवरा, भोकरबारी, मन्याड व अंजनी हे प्रकल्प कोरडेच आहेत. 
नंदुरबार ः दरा व रंगावली १००, शिवन ७७.६३. 
धुळे ः करवंद, मालनगाव, बुराई, पांझरा १०० टक्के, कनोली ०, अमरावती ३७.


इतर ताज्या घडामोडी
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
राज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...