राज्यातील जिरायती शेतीतील कापूस हे एकमेक नगदी पीक आहे.
बातम्या
किमान तापमानात किंचित वाढ
पुणे : राज्यात थंडीची चाहूल लागल्यानंतर अनेक भागात दाट धुके आणि दव पडत आहे. मुख्यत: निरभ्र आकाशामुळे दुपारी उन्हाचा चटकाही जाणवत आहे. बुधवारी (ता. १३) सकाळी राज्याचा किमान तापमानात किंचित वाढ झाल्याचे दिसून आले. विदर्भातील वर्धा येथे राज्यातील नीचांकी १४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

तापमानात चढ-उतार सुरू असून, कमाल तापमानात २ ते ३ अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे. तर किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे. बुधवारी (ता. १३) उत्तर प्रदेशातील बरेली येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी १०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्याच्या किमान तापमानात किंचित वाढ झाली असली तरी, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्हे वगळता सर्वच ठिकाणी तापमान २० अंशांपेक्षा खाली आले आहे.
बुधवारी (ता. १३) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १७.४ (३), नगर १६.० (१), जळगाव १९.२(४), कोल्हापूर २०.६(३), महाबळेश्वर १६.१(१), मालेगाव १८.६ (४), नाशिक १७.८ (४), सांगली २१.० (३), सातारा १७.९ (२), सोलापूर २०.० (२), अलिबाग २३.५ (२), डहाणू २४.२ (३), सांताक्रूझ २३.८ (२), रत्नागिरी २२.७ (१), औरंगाबाद १५.७ (१), परभणी १६.५ (०), नांदेड १७.५ (१), उस्मानाबाद १७.० (१), अकोला १७.५ (०), अमरावती १७.४ (-१), बुलडाणा १७.८ (१), चंद्रपूर १८.८ (१), गोंदिया १६.० (-१), नागपूर १६.५ (०), वर्धा १४.५ (-२), यवतमाळ १७.० (०).