Agriculture news in marathiMathadi union calls off work | Page 2 ||| Agrowon

नाशिक : माथाडी युनियनकडून ‘काम बंद’

टीम अॅग्रोवन
रविवार, 25 एप्रिल 2021

राज्य शासनाच्या विविध माथाडी मंडळातील राज्यातील विविध बाजार समित्या व रेल्वे मालधक्के, शासकीय गोदाम, विविध आस्थापनांमध्ये कामे करणाऱ्या माथाडी, मापारी व अन्य घटकांचा अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करा.

नाशिक : राज्य शासनाच्या विविध माथाडी मंडळातील राज्यातील विविध बाजार समित्या व रेल्वे मालधक्के, शासकीय गोदाम, विविध आस्थापनांमध्ये कामे करणाऱ्या माथाडी, मापारी व अन्य घटकांचा अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करा.

जसे डॉक्टर्स, पोलिस, महापालिका कर्मचारी अशा या घटकांना शासनाने लागू केलेले विमा संरक्षण कवच माथाडी कामगारांना लागू करा, या मागण्या राज्य सरकारकडे करण्यात आल्या. मात्र या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याने लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्स्पोर्ट, जनरल कामगार युनियनच्या मुंबई व नाशिक माथाडी मंडळाने शनिवारी (ता. २४) एकदिवसीय बंद पुकारला आहे.

२२ एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कामगार नेत्यांची ऑनलाइन बैठक घेतली. यामध्ये माथाडी संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र पाटील विविध मागण्या मांडल्या. या बाबत निवेदनही देण्यात आल्याचे सांगण्यात आले. परंतु शासनाने याकडे दुर्लक्ष केले करीत अद्यापपर्यंत मागण्यांवर अधिसूचना काढली नसल्याने हा एकदिवसीय संप पुकारण्यात आला.

करण्यात आलेल्या मागण्या 
कोरोनाने मृत्यू झालेल्या पन्नास माथाडी कामगारांच्या कुटुंबीयांना या संरक्षणातून ५० लाख रुपयेपर्यंत आर्थिक साह्य द्या. मागण्यांसंबंधी सुविधांची अधिसूचना शासनाने त्वरित काढावी. रेल्वे, बस सेवा व इतर व्यवस्थेने प्रवास करण्यास परवानगी द्या.

प्रतिक्रिया
गेल्या वर्षभरापासून मोठे संकट देशावर आहे. अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या इतर घटकांप्रमाणे विचार व्हावा. जे जीव धोक्यात घालून काम करीत असताना मागण्या करूनही त्या विचारात घेतल्या जात नाहीत. शासन माथाडी व मापारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे.
-सुनील यादव, सचिव-माथाडी कामगार युनियन, नाशिक विभाग 


इतर ताज्या घडामोडी
नगरमध्ये साडेपाच हजार हेक्टरवर फळबाग... नगर : नगर जिल्ह्यात गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही...
मराठवाड्यात पीककर्ज वाटप धीम्या गतीनेच औरंगाबाद : मराठवाड्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी...
कोल्हापुरात पाऊस सुरूच; नद्यांच्या...कोल्हापूर : जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाच्या...
साखर कारखान्यांच्या कर्जांची चौकशी करानगर : शेतकऱ्यांना पीककर्ज द्यायचे झाल्यास अत्यंत...
राष्ट्रीयीकृत बँकांच्या मदतीने...नाशिक : नाशिक जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून कर्ज...
‘किसानपुत्र आंदोलन’कडून काळ्या...औरंगाबाद : किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने शुक्रवारी...
द्राक्ष सल्ला : प्रतिकूल ढगाळ हवामानात...यावर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ढगाळ...
थायलंडचे शेतमजूर अन् मध्यम मार्गावरील...शेती म्हटली की सर्वत्र कमी जास्त प्रमाणात त्याच...
विदर्भात अडीच कोटींचा ‘एचटीबीटी’ साठा...नागपूर : गेल्या हंगामात अनधिकृत कापूस बियाण्याचे...
वैयक्तिक वनदाव्यांचा जलदगतीने निपटारा...नाशिक : जिल्ह्यातील वैयक्तिक वनदाव्यांचा वनसमिती...
कोल्हापुरातील शिवारे जलमयकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता. १६)...
खानदेशात अनेक भागांत पावसाची हजेरीजळगाव ः खानदेशात बुधवारी (ता. १६) अनेक भागांत...
दूध दरवाढीसाठी पुणे जिल्ह्यात निदर्शनेपुणे : लॉकडाउनच्या काळात मागणी घटल्याचे कारण देत...
खतांची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर...वाशीम : जिल्ह्यातील चार महसूल मंडळांचा अपवाद...
शेतकरी कंपन्यांसाठी अर्थसंकल्पाची गरजशेतकरी कंपनी सुरू करण्यापूर्वी जसे व्यवसायाची...
खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी...माती परीक्षणाच्या आधारावर पिकांना द्यावयाची...
सोयाबीन पिकावरील खोडमाशीचे एकात्मिक...खोडमाशीच्या अळ्या प्रथम पाने पोखरून पानांच्या...
तंत्र तीळ लागवडीचेतीळ पीक आपत्कालीन पीक, आंतरपीक व मिश्र पीक म्हणून...
खानदेशात कांदा दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात लाल कांद्याच्या दरात गेल्या चार-...
नऊ कृषी सहायकांकडे १०४ गावांची जबाबदारीबुलडाणा ः राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांच्या...