सूक्ष्म सिंचनाचे अनुदान निधीअभावी रखडले

सूक्ष्म सिंचनाचे अनुदान निधीअभावी रखडले
सूक्ष्म सिंचनाचे अनुदान निधीअभावी रखडले

नांदेड : पंतप्रधान सिंचन योजनेंतर्गत २०१८-१९ मधील शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यासाठी केंद्र शासनाच्या हिश्‍शाचा निधी आहे. परंतु राज्य शासनाच्या हिश्‍शाचा निधी अद्याप प्राप्त न झाल्याने नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ४ हजार ३५६ शेतकऱ्यांना अनुदान वाटप करता येत नाही. त्यामुळे राज्य शासनाच्या हिश्‍शाचा निधी तत्काळ उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

पंतप्रधान सूक्ष्म सिंचन योजनेंतर्गत २०१८-१९ मध्ये परभणी जिल्ह्यातील २ हजार ४६ शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचन संच अनुदानासाठी कृषी विभागाकडे प्रस्ताव सादर केले. त्यामध्ये १ हजार १७२ शेतकऱ्यांनी १ हजार २४.६३ हेक्टरवरील ठिबक संचासाठी, तर १ हजार २८४ शेतकऱ्यांनी ७१३.६८ हेक्टरवरील तुषार संचासाठी प्रस्ताव सादर केले.

या शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यासाठी केंद्र शासनाच्या हिश्‍शाचा ३ कोटी ८७ लाख रुपये निधी कृषी विभागाकडे प्राप्त झाला आहे. परंतु राज्य शासनाकडील २ कोटी ५८ लाख रुपये निधी प्राप्त झाला नाही. 

नांदेड जिल्ह्यातील १ हजार ४०० शेतकऱ्यांनी प्रस्ताव सादर केले आहेत. केंद्र शासनाचे ३ कोटी रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. परंतु राज्य शासनाच्या हिश्‍शाच्या २ कोटी रुपये अनुदानाची मागणी करण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यातील ५०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचे ठिबक आणि तुषार संचाचे अनुदान राज्य शासनाच्या निधीअभावी रखडले आहे. 

अनुदान वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या हिश्‍शाच्या ६ कोटी ५८ लाख रुपये निधीची गरज आहे. हा निधी प्राप्त न झाल्यामुळे शेतकऱ्यांचे अनुदान वाटप रखडले आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com