agriculture news in Marathi,Monsoon return journey is continue, Maharashtra | Agrowon

देशाच्या उत्तर-मध्य बहुतांश भागातून मॉन्सून माघारी

टीम अॅग्रोवन
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) मजल-दरमजल करत देशाच्या विविध भागांतून निरोप घेत आहे. बुधवारी (ता. ९) पश्चिम राजस्थानातून सुरू कलेला परतीचा प्रवास सातत्याने सुरूच आहे. रविवारी (ता. १३) गुजरात मध्य प्रदेशचा बहुतांशी भाग, उत्तर अरबी समुद्र, छत्तीसगडच्या आणखी काही भागांतून मॉन्सूनने माघार घेतली आहे. मंगळवारपर्यंत (ता. १५) मध्य भारतासह देशाच्या बहुतांशी भागांतून मॉन्सून परतण्याची शक्यता आहे. तसेच गुरुवारपासून (ता. १७) पूर्व भारतात ईशान्य मॉन्सून वारे सक्रिय होणार असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.  
 
 

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) मजल-दरमजल करत देशाच्या विविध भागांतून निरोप घेत आहे. बुधवारी (ता. ९) पश्चिम राजस्थानातून सुरू कलेला परतीचा प्रवास सातत्याने सुरूच आहे. रविवारी (ता. १३) गुजरात मध्य प्रदेशचा बहुतांशी भाग, उत्तर अरबी समुद्र, छत्तीसगडच्या आणखी काही भागांतून मॉन्सूनने माघार घेतली आहे. मंगळवारपर्यंत (ता. १५) मध्य भारतासह देशाच्या बहुतांशी भागांतून मॉन्सून परतण्याची शक्यता आहे. तसेच गुरुवारपासून (ता. १७) पूर्व भारतात ईशान्य मॉन्सून वारे सक्रिय होणार असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.  
 
 
मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाची घोषणा करण्यासाठी सलग पाच दिवस पावसाची उघडीप असणे, हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी होणे, हवेचा खालच्या थरात केंद्रभागी दाब अधिक असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती (ॲण्टी सायक्लोनिक सर्क्युलेशन) निर्माण होणे आवश्यक असते. ही स्थिती निर्माण झाल्याने बुधवारी (ता. ९) पंजाब, हरियाणा आणि उत्तर राजस्थानमधून मॉन्सून माघारी फिरल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.

यंदाचा मॉन्सून आतापर्यंतच्या सर्वांत उशिराने परतीच्या प्रवासाला निघाला. यापूर्वी १ ऑक्टोबर १९६१ मध्ये सर्वांत उशिराने माघारी फिरला होता. त्यांनतर २००७ मध्ये ३० सप्टेंबर रोजी राजस्थानातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला होता. 

यंदा तब्बल सव्वा महिना अधिकचा मुक्काम केल्यानंतर मॉन्सून बुधवारी (ता. ९) पश्चिम राजस्थानमधून माघारी फिरल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी गुरुवारी (ता.१०) मॉन्सूनने हरियाणा, चंदीगड, दिल्लीचा संपूर्ण भाग, राजस्थान व पंजाबचा बराचसा भाग, तसेच उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशाच्या काही भागाचा निरोप घेतला.

शुक्रवारी (ता. ११) जम्मू काश्‍मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान राज्याचा संपूर्ण भाग, बिहार, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छच्या काही भागातून मॉन्सून परतला. शनिवारी (ता.१२) गुजरात, मध्य प्रदेशचा बहुतांशी भाग, छत्तीसगड, झारखंड, बिहारच्या काही भागातून मॉन्सूनने काढता पाय घेतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले.


इतर अॅग्रो विशेष
मॉन्सूनची अंदमानात चाल;...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी...
कापूस उत्पादनात २४ लाख गाठींनी घट शक्यजळगाव ः देशात कापसाच्या उत्पादनात सुमारे २४ लाख...
टोळधाडीकडून भाजीपाल्याचे सर्वाधिक...नागपूर : राजस्थान, मध्यप्रदेशनंतर टोळधाडीचा...
उन्हाच्या झळांनी काहीली वाढली पुणे : सुर्य चांगलाच तळपत असल्याने...
केळी ‘रायपनिंग चेंबर’ व्यवसाय झाला पूरक...सातारा जिल्ह्यातील अनवडी (ता. वाई) येथील प्रवीण...
अंदमानात उद्या मॉन्सूनची प्रगती शक्य पुणे: बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’...
राज्यात कापूस बियाणे विक्रीला प्रारंभ अकोला ः आगामी हंगामासाठी कापूस बियाणे...
मध्यम धाग्याच्या कापूस खरेदीची ...नागपूर ः एफएक्‍यु ग्रेडमधीलच तिसऱ्या दर्जाच्या...
मराठवाडा पाणी परिषदेचे शनिवारी ऑनलाइन...औरंगाबाद: लॉकडाउनमुळे मराठवाडा पाणी परिषदेची...
'ग्रामपंचायतीचा अखर्चित निधी शासनाला...अकोला ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरु...
टोळधाडीचा अमरावती, वर्ध्यात शिरकावअमरावती ः लॉकडाउनमुळे आधीच अडचणीत असलेल्या...
सव्वा एकरांत सेंद्रिय भाज्यांचा `जगदाळे...कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी (ता.शिरोळ) येथील...
टोळधाडीचा आठ राज्यांमध्ये धुडगूसपुणेः देशात एरव्ही जून आणि जुलैमध्ये येणाऱ्या...
उष्णतेच्या लाटेने पिके होरपळलीपुणे : राज्यात मराठवाडा, विदर्भासह खानदेशात...
संसर्गाचे थैमान, महाराष्ट्र, तामिळनाडू...नवी दिल्ली : जगातील अन्य देशांसोबतच भारतातही...
सहकारी क्षेत्रातील दुग्ध उद्योगांसमोर...नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे...