agriculture news in Marathi,moong sowing deficit by 29 percent, Maharashtra | Agrowon

देशात रब्बी मूग पेरणीत २९ टक्के घट

कोजेन्सिस वृत्तसेवा
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

नवी दिल्ली: देशात रब्बी हंगामाच्या पेरणीला प्रारंभ झाला असून शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. काही राज्यांमध्ये परतीचा आणि मॉन्सूनोत्तर पाऊस लांबल्याने पेरण्याही लांबल्या आहेत. देशात मूगाची लागवड २८.९ टक्क्यांनी कमी झाली असून आतापर्यंत २४ हजार ८०० हेक्टरवर पेरणी झाली आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी विभागाने प्रसिध्द केलेल्या अहवालातून मिळाली. 

नवी दिल्ली: देशात रब्बी हंगामाच्या पेरणीला प्रारंभ झाला असून शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. काही राज्यांमध्ये परतीचा आणि मॉन्सूनोत्तर पाऊस लांबल्याने पेरण्याही लांबल्या आहेत. देशात मूगाची लागवड २८.९ टक्क्यांनी कमी झाली असून आतापर्यंत २४ हजार ८०० हेक्टरवर पेरणी झाली आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी विभागाने प्रसिध्द केलेल्या अहवालातून मिळाली. 

दरम्यान, खरिपात मूग उत्पादक राज्यांमध्ये पावसाचा मूग पिकाला फटका बसल्याने त्याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. त्यामुळे मूग बाजारात चांगलाच भाव खात आहे. ऑक्टोबर महिन्यात मुगाच्या दरात १५ टक्के वाढ झाली होती. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकालाही चांगला दर मिळण्याची शक्यता व्यापारी सूत्रांनी व्यक्त केली आहे. 

खरिपात मॉन्सूनचे उशिरा आगमन झाले. परिणामी, पेरण्याही लांबल्याने हंगाम लांबला. त्यामुळे रब्बी पेरणीलाही उशीर होत आहे. त्यातच ऐन काढणीच्या काळात पावसाने हजेरी लावल्याने काढणीला उशीर होत आहे. त्याचाही परिणाम रब्बी पेरणीवर झाला, असेही व्यापाऱ्यांनी सांगितले. दक्षिण भारतात सरासरीपेक्षा ३२ टक्के अधिक पाऊस झाला असून मध्य भारतात ९७ टक्के अधीक पाऊस झाला आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली. 

केंद्र सरकारने २०१९-२० च्या हंगामात मुगाचे उत्पादन वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. गेल्या वर्षी ५ लाख १० हजार टन उत्पादन झाले होते. यंदा ७ लाख टन उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. 

तमिळनाडूतही पेरणी माघारली
देशात मूग उत्पादनात तामिळनाडू आणि मध्य प्रदेश हे अग्रेसर राज्ये आहेत. तमिळनाडूत मूग पेरणीत गेल्या वर्षीच्या तुलनेत ३९ टक्के घट झाली असून १४ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. मध्य प्रदेशात अद्याप मूग पेरणीला प्रारंभ झाला नाही. मध्य प्रदेशात यंदा सरासरीपेक्षा ५२ टक्के अधिक पाऊस झाला आहे. 

ओडिशात क्षेत्र वाढले
ओडिशा राज्यात रब्बी मुगाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असते. राज्यातील काही भागांत आलेल्या पुरामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते. पाऊस चांगला झाल्याने राज्यात रब्बी पेरणीलाही जोर आला आहे. मूग लागवडीत यंदा मागील वर्षीच्या तुलनेत १६.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्यात आतापर्यंत ७ हजार ७०० हेक्टरवर मुगाची लागवड झाली आहे.

राज्यनिहाय मूग लागवडीची स्थिती (हेक्टरमध्ये)

राज्य  २०१९-२०  २०१८-१९   बदल (%)
आंध्र प्रदेश ३,०००  ३,०००  ०
छत्तीसगड १००  १,३०० (-)९२.३
ओडिशा  ७,७००   ६,६००  १६.७
तमिळनाडू १४,००० २३,००० (-)३९.१
तेलंगणा  १,०००  (-)१०० 
एकूण   २४,८००  ३४,९०० (-)२८.९

 


इतर अॅग्रोमनी
सोयाबीनमध्ये तेजी, मक्याची मागणी वाढतीया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने खरीप मका,...
थकीत खत अनुदान ३३ हजार कोटींवरखत उत्पादन उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या...
कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्थिती...कापसाचा नवीन हंगाम (२०१९-२०) सुरू होऊन जवळपास दोन...
मध ठरू पाहतेय साखरेला पर्याय...खरंच ‘...नागपूर : साखरेमुळे वाढत चाललेल्या आरोग्याच्या...
कापसाची ४९०० ते ५००० रुपये दरात खेडा...जळगाव  ः राज्यात कापूस पट्ट्यात कापसाचे दर...
पपईला जागेवरच १८ रुपये प्रतिकिलो दरजळगाव ः खानदेशात पपईचा हंगाम सुरू झाला असून,...
गुजरातमधून मागणी मंदावल्याने गूळ दरांत...कोल्हापूर : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गुजरातला...
वाशीम : त्रुट्यांमुळे ‘किसान सन्मान’...वाशीम  ः पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा...
हळद, गवार बीच्या फ्युचर्स किंमतीत घटया सप्ताहात हरभरा, गवार बी, हळद व गहू यांच्या...
नागपुरी संत्रा चीनच्या 'प्रोटोकॉल'...नागपूर : माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार...
संकेश्‍वरी मिरचीचा ‘ठसका’ यंदा गायबकोल्हापूर : गेल्या महिन्यातील अतिवृष्टीने यंदा...
वायदा बाजारात सोयाबीन, कापसाच्या...या सप्ताहात खरीप मका, हळद, गवार बी यांच्यात घट...
कडधान्यातील स्वयंपूर्णता यंदा ठरणार...नवी दिल्ली ः देशात यंदा मॉन्सूनच्या उशिरा...
देशात रब्बी मूग पेरणीत २९ टक्के घटनवी दिल्ली: देशात रब्बी हंगामाच्या पेरणीला...
सोयाबीनशिवाय सर्व पिकांच्या वायदा...या सप्ताहात गहू व गवार बी वगळता इतर सर्व...
राज्यात कापूस दर हमीभावापेक्षा कमीचजळगाव  ः राज्यात कापसाचे दर हमीभावापेक्षा...
‘कॉन्टॅक्टलेस लेंडिंग’ पद्धतीची...नोव्हेंबर २०१६ मध्ये सरकारने ५०० आणि १०००...
चौदा गुंठ्यांतील वैविध्याने अर्थकारणाला...पाच एकर शेतीचे नियोजन करताना ऊस, आले, केळी अशा...
तीन वर्षांत हळदीच्या दरात दीड हजार...सांगली ः सांगली जिल्ह्यासह अन्य भागांत  ...
मका, हळद, गव्हाच्या किमतीमध्ये वाढरब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या...