agriculture news in marathi,movement for transition scheme, akola, maharashtra | Agrowon

भावांतर योजनेच्या मागणीसाठी अकोल्यात धरणे आंदोलन
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 29 मे 2018
अकोला  ः महाराष्ट्रात मध्य प्रदेशप्रमाणे भावांतर योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी सोमवारी (ता. २८) भारतीय किसान संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे अांदोलन करण्यात अाले. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात अाले.
 
अकोला  ः महाराष्ट्रात मध्य प्रदेशप्रमाणे भावांतर योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी सोमवारी (ता. २८) भारतीय किसान संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे अांदोलन करण्यात अाले. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात अाले.
 
सध्या तूर, हरभरा खरेदी मंद गतीने सुरू अाहे. यामुळे राज्यातील शेतकरी अार्थिक अडचणीत सापडले अाहेत. यासाठी शासन व प्रशासन दोघेही उदासीन अाहेत. यामुळे शेतकऱ्यांना तूर व हरभरा कमी भावाने व्यापाऱ्यांना विकावा लागला. यातून नुकसान सोसावे लागले. प्रशासनावर नियंत्रण नसल्याने तूर खरेदी केवळ ३३ टक्के व हरभरा खरेदी त्याहीपेक्षा कमी झाली. शासनाने जी थोडीशी खरेदी केली त्याचेही पैसे दिले नाहीत. शेतीमालाला योग्य भाव मिळण्यासाठी भारतीय किसान संघाने पाठपुरावा केला. शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित अाहेत.   
 
शासनाने भावांतर योजना सुरू करावी, विदर्भातील अनेक धरणांची कामे अजूनही अपूर्ण अाहेत हे प्रकल्प पूर्ण करावेत, कृषिपंपाला १२ तास वीजपुरवठा दिला जावा, पाणंद रस्ते पूर्ण करावेत, अायात निर्यात धोरण हे शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन आखावे, एकतर शेतीमाल अायात होऊ नये किंवा अायात शुल्क जास्त अाकारावे, शेतीमाल निर्यातीस प्रोत्साहन द्यावे, जैविक मालाची स्वतंत्र विपणन व्यवस्था बाजार समितीच्या माध्यमातून करावी.
 
शेतीमजूर मिळत नसल्याने रोजगार हमी योजनेत शेतकामाची योजना करावी व मजुरांना मिळणाऱ्या योजनांचा पुनर्विचार करावा, बोगस बियाणे, कीटकनाशके विक्रेत्यांवर कारवाई व्हावी, बीटी कापसाच्या एचटी वाणावर बंदी घालावी, वन्य प्राण्यामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी, अशा मागण्या किसान संघाने केल्या अाहेत. 
 
जिल्हाध्यक्ष पांडुरंग गायकी, जिल्हामंत्री डॉ. सुभाष देशपांडे यांच्यासह इतर पदाधिकारी या अांदोलनात सहभागी झाले होते.

इतर ताज्या घडामोडी
सुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...
नत्र स्थिरीकरणावर परिणाम करणारे घटक गेल्या भागापासून आपण मार्टीन ॲलेक्झांडर यांच्या...
पशुपालनातील मिथेन उत्सर्जन कमी करणे...मिथेनचे कमी उत्सर्जन करणाऱ्या गायींची पैदास करणे...
गिरणा नदीवरील बलून बंधाऱ्यांसाठी आर्थिक...जळगाव ः जिल्ह्यातील सतत दुष्काळाशी झगडणाऱ्या...
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...