agriculture news in Marathi,n Nashik, the mountain of black mines markets | Agrowon

नाशिकला डोंगराची काळी मैना विक्रीसाठी बाजारात

टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 मे 2019

नाशिक : आदिवासी भागात सध्या मोठ्या प्रमाणावर रानमेवा उपलब्ध होतो आहे. करवंद, भोकर, काजूआंबा यांसारख्या जंगली फळांना आयुर्वेदिक महत्त्व असून शहरी भागात ग्राहक यांची खरेदी करतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हंगामातील करवंदांना 'डोंगराची काळी मैना' म्हणून शहरात लहान मोठ्यांमध्ये मागणी असते. हाच रानमेवा आदिवासी भागातील नागरिकांचे उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे. 

नाशिक : आदिवासी भागात सध्या मोठ्या प्रमाणावर रानमेवा उपलब्ध होतो आहे. करवंद, भोकर, काजूआंबा यांसारख्या जंगली फळांना आयुर्वेदिक महत्त्व असून शहरी भागात ग्राहक यांची खरेदी करतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हंगामातील करवंदांना 'डोंगराची काळी मैना' म्हणून शहरात लहान मोठ्यांमध्ये मागणी असते. हाच रानमेवा आदिवासी भागातील नागरिकांचे उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे. 

आदिवासी पाड्यावर पाण्याचा प्रश्नाबरोबर रोजगाराचा प्रश्न गंभीर झाला आहे. दोन वेळच्या दानापाण्यासाठी करवंद विक्रीतून मोठा हातभार लागत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, कळवण, दिंडोरी या तालुक्यांमध्ये डोंगराळ भागात करवंदाची जाळी आहेत. या भागातील अदिवासी बांधव करवंदे व इतर रानमेवा विक्रीसाठी शहरात आणत आहेत. सध्या शहरातील पंचवटी, काळा राम मंदिर परिसराबरोबरच शहरातील मुख्य रस्त्यांवर विविध ठिकाणी करवंदांसह इतर रानमेव्याची विक्री होत आहे. 

अशी आहे विक्रीची पद्धत : 

  • पळसाच्या पानापासून द्रोण बनवून या द्रोणामध्ये करवंदाची विक्री होते. 
  • त्यासाठी एक ग्लासचे माप ठरविले असून त्या आधारावर विक्री होते.
  • एक ग्लास करवंद - १० रुपये 
  • अंदाजे मापाचे वजन - १०० ग्रॅम
  • प्रतिकिलो १०० रुपयेप्रमाणे बाजारभाव 
  • दररोज ५०० ते १००० रुपयांची होते कमाई

इतर बातम्या
जंगलातील वणव्यांचाही वटवाघळांना होतो...वटवाघळांसाठी रहिवासाचा ऱ्हास, वातावरणातील...
मराठवाड्यात साडेदहा हजार एकरांवर तुतीऔरंगाबाद : मराठवाड्यात यंदा ३० नोव्हेंबर...
जालना जिल्ह्यात रब्बी सिंचनाची वाट अवघडचजालना :  जायकवाडी प्रकल्पावरून...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत केळी...नांदेड : सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यातील पावसामुळे...
आटपाडीत तीनशे हेक्‍टरवर फुलणार डाळिंब...आटपाडी, जि. सांगली : पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड...
गांडूळ खतनिर्मितीस प्रोत्साहन द्या : डॉ...कोल्हापूर  : ‘‘शेतकऱ्यांनी जमिनीचा पोत...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीच्या ४०...बुलडाणा ः यंदाच्या हंगामात जिल्ह्यात रब्बीसाठी...
अधिकारी कार्यालयात घुसवल्या बैलजोड्याअमरावती ः वारंवार अर्ज, विनंत्या करूनसुद्धा पांदण...
नाशिक जिल्ह्यातील बंद उपसा जलसिंचन...नाशिक : जिल्ह्यात सन १९९५ ते २००० या कालावधीत...
सातारा जिल्ह्यात ऊसदराची कोंडी फोडणार...सातारा  ः साखर कारखान्यांची धुराडी पेटली...
प्रतिकूल हवामानामुळे पुणे जिल्ह्यात...पुणे  ः दर वाढल्याने पुणे जिल्ह्यातील अनेक...
प्रतिकूल हवामानाचा नगर जिल्ह्यातील गहू...नगर  ः जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून...
चंद्रपूर जिल्ह्यात ११ महिन्यांत ५०...चंद्रपूर  ः नापिकी, कर्जबाजारीपणा यातून...
हवामानाच्या पूर्व अंदाजासाठी पाषाण,...पुणे  ः पुणे शहरातील विविध ठिकाणी अनेकदा कमी...
बुलडाणा जिल्ह्याच्या भूजलपातळीत १.३९...बुलडाणा ः मागील काही वर्षांपासून जिल्हा सातत्याने...
पुण्यात १७ जानेवारीपासून पुष्प...पुणे  ः ॲग्री हार्टिकल्चर सोसायटी ऑफ...
नवी दिल्लीतील प्रदर्शनात जैविक खते,...पुणे  ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे...
शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील ऊस...कोल्हापूर : शिरोळ, हातकणंगले तालुक्यांतील...
विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सहा दिवस...मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या...
विठ्ठल मंदिरात मोबाईल बंदीपंढरपूर, जि. सोलापूर ः श्री विठ्ठल मंदिराच्या...