नगरला प्रतिक्विंटल २०० ते १००० रुपये

नगरला प्रतिक्विंटल २०० ते १००० रुपये
नगरला प्रतिक्विंटल २०० ते १००० रुपये

नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोला प्रतिक्विंटलला २०० ते एक हजार रुपये आणि सरासरी ६०० रुपये दर मिळत आहे. गुरुवारी (ता. २३) १२० क्विंटलची आवक झाली. मागील महिन्याच्या तुलनेत दर काहीसे कमी झाले आहेत.

नगर बाजार समितीत दर दिवसाला साधारण ८० ते १०० क्विंटल आवक होत असते. १६ ऑगस्टला १२२ क्विंटलची आवक होऊन २०० ते १००० व सरासरी ६०० रुपये दर मिळाला. ७ ऑगस्टला ९२ क्विंटलची आवक झाली आणि ४०० ते १२०० व सरासरी ८०० रुपये दर मिळाला.

२ ऑगस्टल ९५ क्विंटलची आवक होऊन ५०० ते १३०० रुपये व सरासरी ९०० रुपये दर मिळाला. २६ जुलैला ११० क्विंटलची आवक होऊन ५०० ते १८०० रुपये व सरासरी ११५० रुपये दर मिळाला.

१९ ऑगस्टला ८२ क्विंटलची आवक होऊन १०० ते २५०० रुपये व सरासरी १७५० रुपये दर मिळाला. १२ जुलैला ८६ क्विटंलची आवक झाली. त्या दिवशी ५०० ते २००० व सरासरी १२५० रुपये दर मिळाला, असे बाजार समितीतून सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com