agriculture news in Marathi,Narsimha reddi says, seed bill for fever to companies, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

बियाणे कंपन्यांचे हित जपण्यासाठीच विधेयक: नरसिम्हा रेड्डी

टीम अॅग्रोवन
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

यवतमाळ ः केंद्र सरकार बियाणे अधिनियमात सुधारणा करण्यासाठी लवकरच संसदेत विधेयक आणत आहे. मसुद्यानुसार हे विधेयक केवळ बियाणे कंपन्यांच्या हिताचे असून, शेतकऱ्यांचा बियाण्यांवरील अधिकार याद्वारे संपेल, असा आरोप पॅन इंडियाचे (पेस्टीसाइड ऍक्‍शन नेटवर्क) संचालक डॉ. नरसिम्हा रेड्डी धोंती यांनी पत्रकार परिषदेत केला. 

यवतमाळ ः केंद्र सरकार बियाणे अधिनियमात सुधारणा करण्यासाठी लवकरच संसदेत विधेयक आणत आहे. मसुद्यानुसार हे विधेयक केवळ बियाणे कंपन्यांच्या हिताचे असून, शेतकऱ्यांचा बियाण्यांवरील अधिकार याद्वारे संपेल, असा आरोप पॅन इंडियाचे (पेस्टीसाइड ऍक्‍शन नेटवर्क) संचालक डॉ. नरसिम्हा रेड्डी धोंती यांनी पत्रकार परिषदेत केला. 

डॉ. नरसिम्हा रेड्डी म्हणाले, की केंद्र सरकारने १ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत विधेयकाचा मसुदा सर्वसामान्यांसाठी खुला केला आहे. बुधवारपर्यंत (ता.१३) या प्रस्तावित विधेयकावर आक्षेप किंवा सूचना देता येतील. मात्र हे विधेयक सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारे आहे. २००२ मध्येच पहिल्यांदा खासगी कंपन्यांना बियाण्यांचा अधिकार दिला गेला. त्यानंतर २००४ मध्ये बीजी-१ ला परवानगी दिली गेली. हे तंत्रज्ञान बहूतांशी अपयशी ठरले. मग बीजी-२ आले. त्यातूनही शेतकरी ऐवजी विदेशी कंपन्यांचेच भले झाले.

मात्र या आजही बाजारात या दोन्ही जणुकांचा समावेश असलेले बियाणे विकले जात आहे. हा प्रकार थांबला पाहिजे. याबाबत सरकार पातळीवर विचारणा केल्यास या संदर्भात कठोर कायदा नसल्याचा युक्‍तिवाद सरकारकडून केला जातो. 

‘‘वास्तविकतः देशात १९६६ चा बियाणे कायदा अस्तित्वात आहे. बियाणे अधिनियमात दुरुस्तीचा पहिला ड्राफ्ट २००४  मध्ये तयार झाला, तेव्हापासून पॅन इंडिया त्यातील चुकांविरोधात लढा देत आहे. तरीही आता २०१९ मध्ये त्या चुकांसह हे विधेयक मांडले जाणार आहे. ते जसेच्या जसे पारित झाल्यास सामान्य शेतकऱ्यांना यापुढे घरच्या बी-बियाणे तयार करता येणार नाही. तो अधिकार केवळ खासगी कंपन्यांनाच राहील. विशेष म्हणजे या विधेयकात बियाण्यांच्या मूल्य नियंत्रणा संदर्भातही कुठलीच तरतूद करण्यात आलेली नाही. या तरतुदीचा उपयोग होत शेतकऱ्यांच्या लुटीचाही प्रकार घडण्याची शक्‍यता आहे,’’ असेही ते म्हणाले. 

या वेळी किसान काँग्रेसचे विदर्भ अध्यक्ष देवानंद पवार, शहराध्यक्ष उमेश इंगळे, चंद्रशेखर चौधरी, अजय किन्हीकर, अशोक भुतडा उपस्थित होते.


इतर ताज्या घडामोडी
मुळा कालव्याचे पाणी अनेक गावांत पोचलेच...अमरापूर, जि.नगर  : मुळा उजव्या कालव्यातून...
पुणे जिल्हा प्रशासन कोरोनाबाबत...पुणे  : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
पुणे जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचा...पुणे  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सरकारने...
सह्याद्री सॅनिटायझर लवकरच बाजारपेठेतकऱ्हाड, जि. सातारा  ः ‘कोरोना’चा संसर्ग...
सातारा जिल्ह्यातील दूध उद्योगासह...कऱ्हाड, जि.सातारा ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर...
संजीवनी कारखान्याकडून प्रतिदिन ६० हजार...नगर  ः केंद्र सरकारच्या अन्न व औषध...
शेतीला दिवसा बारा तास वीज द्या : राजू...कोल्हापूर  : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर...
आरोग्य क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांनी...मुंबई  :  कोरोना विरोधातील युद्धात...
द्राक्षबागेतील अवस्थांनुसार व्यवस्थापनसध्याच्या काळात बागेतील घडांच्या स्थितीनुसार...
कढीपत्त्याची व्यावसायिक लागवड फायदेशीरकढीपत्याचे शास्त्रीय नाव ‘मुर्रया कोइनिगी’ आहे....
दर्जेदार पशू खाद्य निर्मितीचे तंत्रजनावरांना शारीरिक व दूध उत्पादनासाठी लागणारे घटक...
माती परीक्षणानुसार द्या खतमात्रामाती परिक्षण अहवाल प्राप्त झाल्यानंतर जमिनीतील...
असे करा दर्जेदार चिकू उत्पादनाचे नियोजनचिकू फळांना योग्य दर मिळण्यासाठी योग्य आकार व...
सेनगाव, माकोडी कृषी बाजारात शेतमालाची...हिंगोली : ‘‘सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समिती,...
‘चांगभलं’च्या जयघोषाविना यंदा जोतिबाची...जोतिबा डोंगर, जि. कोल्हापूर ः कोरोना आणि...
नक्षलवाद्यांनीही घेतला कोरोनाचा धसका;...मुंबई : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत...
मुंबईत हापूसची आवक वाढली; ५ डझन पेटीस...मुंबई : वाहतुकीतील अडथळे दूर केल्याने मुंबई कृषी...
नांदेड जिल्ह्यात गारपीटीमुळे पिके...नांदेड : जिल्ह्यातील ४० मंडळांमध्ये मंगळवारी (ता....
इचलकरंजीत विक्रेत्यांकडून चाराविक्रीचे...कोल्हापूर : वैरण बाजारात चारा विक्रेत्यांनी...
शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी...नांदेड :‘‘‘लॅाकडाऊन’मुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या...