मिथेन उत्सर्जन कमी करण्यासाठी दक्ष राहण्याची गरज

Need to be careful to reduce methane emissions
Need to be careful to reduce methane emissions

गेल्या भागामध्ये विविध हरितगृह वायू कोठून येतात, याचा आढावा घेतला. त्यातील पशुपालन आणि कृषी क्षेत्रातून उत्सर्जित होणाऱ्या महत्त्वाच्या मिथेन वायू उत्सर्जन कमी करण्यासाठीची माहिती व नव्या संशोधन या लेखामध्ये पाहू. वातावरणावरील दीर्घकालीन आणि अल्पकालीन परिणामांचा विचार केला असता मानवी हस्तक्षेपामुळे निर्माण होणाऱ्या मिथेन या हरितगृह वायूकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण, अल्पकालीन परिणामांमध्ये त्याचे प्रमाण जवळपास अर्ध्याइतके आहे.

  • वातावरणामध्ये उत्सर्जित होणाऱ्या मिथेनला रोखण्यासाठी किंवा मर्यादित ठेवण्यासाठी सध्या उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करणे शक्य आहे. या तंत्रज्ञानाद्वारे त्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी करणे शक्य असल्याने नुकत्याच झालेल्या संशोधनामध्ये दिसून आले आहे. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ॲप्लाईड सिस्टिम्स ॲनालिसीस या संस्थेतील संशोधिका लेना हॉगलंड-इसाकसन यांनी केलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष जर्नल एन्व्हायर्नमेंटर रिसर्च कम्युनिकेशन्स मध्ये प्रकाशित झाले आहे.  
  • जागतिक तापमानवाढीसाठी कारणीभूत मानल्या जाणाऱ्या हरितगृह वायूमध्ये कार्बन डायऑक्साइडशिवाय अन्य मिथेनसारख्या वायूंवरही लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. सध्या वापरामध्ये असलेल्या तंत्रज्ञानाचा काटेकोरपणे वापर केल्यास त्यामध्ये लक्षणीय घट करणे शक्य आहे. अन्यथा, येत्या काही दशकामध्ये वातावरणाच्या तीव्र परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे, असा दावा संशोधिका लेना हॉगलंड-इसाकसन करतात.  
  • इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ॲप्लाइड सिस्टिम्स ॲनालिसीस (IIASA) येथील संशोधकांनी १९९० ते २०१५ या काळातील मिथेन प्रमाणाचा (विशेषतः देशातील उत्सर्जन आणि त्यांचे स्रोत यांचा) खालून वर आणि वरून खाली यांचा अभ्यास केला. या माहितीसाठ्याचा वापर करून २०५० पर्यंतच्या मिथेनच्या उत्सर्जन रोखण्यासाठी कोणतेही उपाययोजना न केल्यास होणाऱ्या जागतिक मिथेन उत्सर्जनाचा अंदाज मिळवण्याचा प्रयत्न केला.  
  • या विश्लेषणामध्ये २०१० या वर्षापासून वातावरणातील मिथेनचे प्रमाण तीव्रतेने वाढले आहे. त्यामध्ये उत्तर अमेरिकेतील शेल गॅस उत्पादन, चीन, इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलिया या सारख्या अन्य देशांमध्ये वाढलेले कोळसा खोदाईचे प्रमाण यांचा समावेश आहे. त्याला आशिया आणि आफ्रिकेतील वाढत्या लोकसंख्येमुळे वाढणाऱ्या कचरा आणि सांडपाणी यांचीही मोठी जोड मिळत आहे.  
  • लॅटीन अमेरिका आणि आफ्रिकेतील गोमांस आणि डेअरी उत्पादनातून उत्सर्जित होणाऱ्या मिथेनमुळे होणारी अल्प, पण नियमित वाढही कारणीभूत ठरत आहे. जागतिक पातळीवरील मिथेनच्या उत्सर्जन स्रोतांचे प्रकार आणि त्यांचे वितरण यावर या विश्लेषणामध्ये भर देण्यात आला आहे.
  • निष्कर्ष

  • नियंत्रणाच्या कोणत्या उपाययोजनांविना जागतिक मिथेन उत्सर्जनामध्ये २०५० पर्यंत ३० टक्क्यांनी वाढ होणार आहे.  
  • सध्या उपलब्ध व स्वस्त असलेल्या विविध तंत्रज्ञानाचा वापर केल्यास मिथेन ३८ टक्क्यांनी कमी करणे शक्य होईल.  
  • तरीही २०२० ते २०५० या काळातील एकूण मिथेन उत्सर्जनाचा विचार केल्यास ते लक्षणीय राहणार असून, जागतिक तापमानवाढीचे प्रमाण १.५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी राखणे आव्हानात्मक ठरणार असल्याचे संशोधकांचे मत आहे.  
  • भविष्यातील जागतिक मिथेन उत्सर्जनाचे प्रमाण ३० ते ५० टक्क्यांच्या दरम्यान असताना ते दूर करण्यासाठी खर्च हा कार्बन डायऑक्साईडपेक्षा (५० युरो प्रति टन) कमी असेल.  
  • कृषी क्षेत्रामध्ये तांत्रिक पातळीवर मिथेनमध्ये घट करण्याची क्षमता कमी आहे.  
  • आहारविषयक सवयी बदलण्यातून (उदा. दूध आणि मांसाचा वापर कमी करणे यांसारख्या) ती वाढवावी लागणार आहे.  
  • आफ्रिका आणि आग्नेय आशियातील अल्पभूधारक पशुपालकांना संस्थात्मक आणि सामाजिक आर्थिक बदलातून विविध मदतीतून त्यावर मार्ग काढता येईल.
  • प्रतिक्रियाः

    संपूर्ण जगासाठी कोणतेही एक धोरण किंवा प्रारूप काम करणार नाही. मध्य पूर्व आणि आफ्रिकेमध्ये तेलाच्या उत्पादनातून मिथेनचे उत्सर्जन होते. अत्यंत कमी खर्चामध्ये ते कमी करता येणेही शक्य आहे. युरोप आणि लॅटीन अमेरिका येथील डेअरी आणि गोमांस उत्पादन हे मुख्य स्रोत आहेत. त्यामध्ये तुलनेने अल्प तांत्रिक संधी आहेत. मात्र, उत्तर अमेरिकेतील शेल वायूंच्या काढण्यामध्ये होणारे मिथेनचे उत्सर्जन हे अल्प खर्चामध्ये कमी करता येऊ शकते. या प्रकारे प्रादेशिक आणि विभागनिहाय विशिष्ट दृष्टिकोनातून उत्सर्जन कमी राखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. - लेना हॉगलंड - इसाकसन

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com