agriculture news in Marathi,nine thousand crore setback for vinyard,Maharashtra | Agrowon

सांगली : द्राक्षच्या उत्पादन खर्चातच ९०० कोटींचा फटका

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

सांगली : चार वर्षांपासून जिल्ह्यात उन्हाळ्यात द्राक्षे बागा टँकरवर जगविल्या जात आहेत. मात्र, यंदा मॉन्सूनोत्तर पावसाने द्राक्ष शेतीला मोठा फटका दिला. सुमारे १ लाख ५० हजार क्षेत्रापैकी ३० हजार एकर पेक्षा जास्त क्षेत्र पावसात नुकसान झाले आहे. एकरी किमान तीन लाखांचे उत्पन्न धरल्यास जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना उत्पादन खर्चापोटी तब्बल ९०० कोटींचा फटका बसला आहे. 

सांगली : चार वर्षांपासून जिल्ह्यात उन्हाळ्यात द्राक्षे बागा टँकरवर जगविल्या जात आहेत. मात्र, यंदा मॉन्सूनोत्तर पावसाने द्राक्ष शेतीला मोठा फटका दिला. सुमारे १ लाख ५० हजार क्षेत्रापैकी ३० हजार एकर पेक्षा जास्त क्षेत्र पावसात नुकसान झाले आहे. एकरी किमान तीन लाखांचे उत्पन्न धरल्यास जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना उत्पादन खर्चापोटी तब्बल ९०० कोटींचा फटका बसला आहे. 

जिल्ह्यात साधारण दीड लाख एकरावर द्राक्ष शेती केली जाते. या द्राक्षाचा छाटणीचा हंगाम सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यात सुरू होतो. मध्यंतरी पाऊस थांबल्यानंतर तासगाव, मिरज, पलूस, जत, खानापूर, वाळवा या तालुक्यांतील शेतकऱ्यांनी छाटण्या मोठ्या प्रमाणात घेतल्या आहेत. या द्राक्ष बागांवर डावण्या, फळकुज व अन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. तर काही बागायतदार चांगल्या दराच्या आशेवर जुलै ऑगस्टमध्ये आगाप छाटणी घेतात, त्यांच्या फळ अवस्थेतील द्राक्षांवर आता बुरशीजन्य डाऊनी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे केवळ रात्रंदिवस कीटकनाशक फवारणी करणे एवढेच काम शेतकऱ्यांचे सुरू आहे.

जिल्ह्यातील तासगाव, कवठेमहांकाळ, जत, कडेगाव, खानापूर, आटपाडी आणि मिरज पूर्व भागांत मोठा फटका बसला. त्यात द्राक्ष बागेसाठी असलेली पीकविमा योजना केवळ कंपनीच्याच फायद्याची ठरत आहे. त्यातील निकष जाचक आहेत, त्यामुळे द्राक्ष बागायतदारांचे कितीही नुकसान झाले, तरी योग्य नुकसानभरपाई मिळत नाही. साधारणतः ३० हजार एकरावरील द्राक्ष शेतीचे नुकसान झाले आहे. सरासरी ३ लाख रुपये एकरी उत्पन्न धरल्यास हा आकडा सुमारे ९०० कोटी रुपयांवर जातो, तर महापूर आणि परतीचा पाऊस असे नुकसान बघितल्यास तो आकडा सुमारे ७९०० कोटी रुपयांपर्यंत जातो.

द्राक्षे पिकासाठी एकरी खर्च मोठा
सांगली जिल्ह्यात नाशिकच्या बरोबरीने द्राक्ष उत्पादन घेतले जाते. नदीकाठावर ऊस हे नगदी पीक आहे, तर कमी पाण्यावर येणारे पीक म्हणून दुष्काळी भागात द्राक्षे पिकविली जातात. त्याचा एकरी उत्पादन खर्चही मोठा आहे. तो पहिल्या वर्षी सरासरी एकरी २ ते अडीच लाख तर त्यानंतर एक ते दीड लाख इतका खर्च येतो. 

निर्यातक्षम द्राक्षांची विशेषतः युरोपला निर्यात होणाऱ्या द्राक्षांची विशेष काळजी घ्यावी लागत आहे. २० सप्टेंबरच्या आधी द्राक्ष छाटणी घेतलेल्या निर्यातक्षम बागा बुरशीजन्य रोगाला बळी पडल्या आहेत. त्यानंतर छाटणी झालेल्या बागांचे पीक पुढे कसे येणार? हे तज्ज्ञही सांगू शकत नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील यावर्षीचे निर्यातक्षम द्राक्षाचे उत्पादन ३० ते ५० टक्‍क्‍यांनी घटण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. युरोप आणि अन्य देशांमध्ये निर्यात होणाऱ्या द्राक्षांचे सुमारे ५० ते ७० कोटींचे नुकसान होण्याची शक्यता आहे. शिवाय ही द्राक्ष वाचण्यासाठी होणारा खर्चही वाढत आहे. त्यामुळे भविष्यात निर्यातक्षम द्राक्षांची किती निर्यात होणार ? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 


इतर अॅग्रो विशेष
सोयाबीन दर विक्रमी पातळी गाठण्याचे संकेतनवी दिल्ली : देशातील महत्त्वाच्या सोयाबीन...
`उज्ज्वला` योजनेत मोठा भ्रष्टाचारनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी...
गारठा पुन्हा वाढणारपुणे  ः राज्यात अंशतः ढगाळ हवामान असून...
पूरबाधित ऊस तोडीस कारखान्यांकडून टाळाटाळपुणे  ः राज्यातील गाळप हंगाम सुरू होऊन...
नाशिक जिल्ह्यात द्राक्षमणी पोखरणाऱ्या...नाशिक  : जिल्ह्यात द्राक्ष पीक फुलोरा व मणी...
मराठवाड्यातील ५५ प्रकल्प कोरडेचऔरंगाबाद : ऑक्‍टोबरमधील पावसाने दुष्काळाने...
पंजाबचे पशुपालक वापरतात सुधारित तंत्रलुधियाना (पंजाब) येथे प्रोग्रेसिव्ह डेअरी...
शेती, दुग्धव्यवसायाने बनविले...कोल्हापूर जिल्ह्यातील शेळेवाडी (ता. राधानगरी)...
म्हणे शेतात, पीक असल्याने वीज जोडणीस...अमरावती  ः शेतात पीक असल्यामुळे शेतकरी वीज...
देशी गोसंगोपन, गांडूळखतासह दूध...सातारा जिल्ह्यातील कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड)...
दर्गनहळ्ळी येथे वाढलाय पक्ष्यांचा...सोलापूर : पूर्वी सूर्यकिरणांसोबतच पक्ष्यांचा...
अवकाळी पावसामुळे बाधितांसाठी साडेचार...मुंबई : ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांतील अवकाळी...
डाळिंब बियाच्या तेलापासून ‘सॉफ्टजेल...सोलापूर ः येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राने...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात...पुणे  ः मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व...
आव्हाने खूप सारी, तरीही मधमाशीपालनात...नाशिक येथे पूर्वा केमटेक या कंपनीतर्फे नुकताच...
आकस्मिकता निधीच्या मर्यादेत तात्पुरत्या...मुंबई : महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या...
खासगी प्रवासी बसमधून शेतमाल वाहतुकीला...सोलापूर : राज्याच्या ग्रामीण भागातून मुंबई,...
राज्यात बोरं ८०० ते ४००० रुपये...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
विदर्भात वादळी पावसाची शक्यता पुणे ः विदर्भाच्या काही भागांत हवामान ढगाळ आहे....
मूळ समस्यांशी थेट भिडावे लागेल ऑगस्टपर्यंत पावसाची वाट पाहणारा शेतकरीवर्ग...