पुणे जिल्ह्यात महिनाभर पोषण अभियान राबविणार

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  : जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत सप्टेंबर महिन्यात पोषण अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत बालकांचे पहिले शंभर दिवस, ॲनेमिया, हात धुणे आणि स्वच्छता, अतिसार, पौष्टिक आहार या पाच महत्त्वाच्या घटकांवर लक्ष देण्यात येणार आहे. पाणी, परिसर आणि वैयक्तिक स्वच्छता; तसेच आरोग्य व पोषण सेवा उपलब्ध करून देणे यावर विशेष भर देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे यांनी दिली.

या अभियानाचे उद्‌घाटन रविवारी (ता.१) मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुनील कुऱ्हाडे, तसेच जिल्ह्यातील सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी, सहायक बाल विकास प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका उपस्थित होत्या.

पोषण महिन्यामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत शासनाच्या विविध विभागांच्या सहाकार्याने कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. त्यामध्ये गणेशोत्सवात फलक लावणे, लसीकरण करणे, प्रभातफेरी, कुपोषित बालकाच्या घरी भेट देऊन अतिसार, परिसर स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि हात धुणे याबाबत जनजागृती करणे, आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने ॲनेमिया प्रतिबंधात्मक आणि पथनाट्याद्वारे जागृती करणे. सायकल रॅलीच्या माध्यमातून वैयक्तिक स्वच्छतेचा संदेश देणे, शाळांमध्ये पोषण विषयावर विविध स्पर्धा आणि चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे. पालक, अंगणवाड्या, बचत गट यांच्या बैठका घेऊन जागृती; तसेच किशोरींकरिता कौशल्य विकास केंद्रांना भेटी आणि मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com