Agriculture news in marathiOn the workings of ‘Pokra’ Gramsevak boycott behind | Agrowon

‘पोकरा’च्या कामकाजावरील ग्रामसेवकांचा बहिष्कार मागे

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 5 ऑगस्ट 2021

राज्यात राबविल्या जात असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजिवनी योजनेच्या कामकाजावर बहिष्कार टाकणाऱ्या ग्रामसेवकांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे.

अकोला : राज्यात राबविल्या जात असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजिवनी योजनेच्या कामकाजावर बहिष्कार टाकणाऱ्या ग्रामसेवकांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या हस्तक्षेपानंतर ग्रामसेवक संघटनेने आंदोलन मागे घेतले आहे. 

नानाजी देशमुख कृषी संजिवनी योजनेच्या समितीत सदस्य सचिवपद हे ग्रामसेवकाकडे देण्यात आलेले आहे. याच मुद्याला ग्रामसेवकांकडून विरोध दर्शविण्यात आला. कृषी विभागाची योजना, कृषी खात्याचा निधी, अंमलबजावणी करणारी यंत्रणा कृषी खात्याचीच असताना ग्राम समितीचे हे सचिवपद आम्हाला नको, अशी भूमिका ग्रामसेवक संघटनेने घेतली होती.

या बाबत पोकरा प्रकल्प संचालकांसह शासनाकडे मागणीही करण्यात आली होती. मात्र, या बाबत कुठलाही निर्णय होत नसल्याने अखेरीस गेल्या काही महिन्यांपासून ग्रामसेवकांनी पोकराच्या कामकाजावर बहिष्कार टाकला होता. ग्रामसभांमध्ये सहभाग ते घेत नव्हते. प्रकल्प अंमलबजावणीत अडचणी तयार झाल्या होत्या. अखेरीस दोन दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नानाजी देशमुख कृषी संजिवनी समितीबाबत संपूर्ण राज्यातील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत व्हीडीओ कॉन्फरन्स घेतली.

त्यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष एकनाथराव ढाकणे, राज्य सरचिटणीस प्रशांत जामोदे, राज्य कोषाध्यक्ष संजीव निकम सहभागी होते. ग्रामसेवकांच्या मागणीबाबत पवार यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करीत लवकरच हा मुद्दा मार्गी लावू, असे सांगितले. तसेच राज्यात रिक्त असलेल्या ग्रामसेवकांच्या जागाही भरण्याचे आश्‍वासन दिले. यामुळे राज्य ग्रामसेवक संघटनेने सध्याची परिस्थिती पाहता वरील कामांबाबत टाकलेला बहिष्‍कार मागे घेण्याचे जाहीर केले, अशी माहिती संघटनेतर्फे जामोदे 
यांनी दिली.

प्रतिक्रिया
ग्रामसेवकांच्या प्रश्‍नांबाबत पोकरा योजनेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला होता. मागणीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आश्‍वासन दिल्याने हे आंदोलन तूर्त स्थगित केले आहे.
-प्रशांत जामोदे, राज्य सरचिटणीस, ग्रामसेवक संघटना


इतर बातम्या
जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा...पुणे : राज्यात पुढील दोन दिवस जोरदार वारे,...
पुण्यात साकारतेय देशी गाय संशोधन आणि...पुणे ः देशी गायींच्या संवर्धनातून त्यांची...
विमा कंपन्यांना आठ हंगामांत १२ हजार...पुणे ः देशातील खासगी विमा कंपन्यांनी गेल्या आठ...
द्राक्ष हंगामात नियोजन आणि बाजारपेठेचे...अधिक परतावा देणारी पिके म्हणजे जोखीमही मोठी असते...
मागणीमुळे हरभरा दर हमीभावाच्या वर टिकूनपुणे : गेल्या आठवडाभरात हरभऱ्याला चांगली मागणी...
गुन्हा दाखल करण्याऐवजी पुन्हा चौकशीचा...पुणे ः जलयुक्त शिवार योजनेच्या नावाखाली मृद व...
शेतकरी आंदोलन लोकसभा  निवडणुकीपर्यंत...नगर : केंद्रातील भाजप सरकारने ठरविलेल्या...
सोयाबीन कापणीचा दर  एकरी तीन...अकोला : या हंगामात लागवड केलेले कमी कालावधीचे...
महुद ग्रामस्थांची एकजूट कौतुकास्पद :...सोलापूर ः वसुंधरा आणि पृथ्वीच्या रक्षणासाठी...
सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यासह  दर्जेदार...अमरावती : राजुरा बृहत लघु पाटबंधारे योजनेप्रमाणेच...
पारनेर कारखाना विक्रीतील  दोषींवर...नगर : नगर जिल्ह्यातील पारनेर सहकारी साखर...
वालचंदनगर (जि.पुणे) : लाळ्या खुरकूत...वालचंदनगर, जि. पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून...
सांगली : रब्बीचे पावणे तीन लाख हेक्टरवर...सांगली : जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियासह खते,...
खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या ...चंद्रपूर : कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांना...
सांगलीतील पूरग्रस्तांच्या  मदतीसाठी...सांगली : जिल्ह्यात जुलै महिन्यात आलेल्या...
जायकवाडीतील उपयुक्‍त पाणीसाठा ७१.३९ टक्...औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी...
नांदेडमधील प्रकल्पांत ८२.५७ टक्के...नांदेड : ऑगष्ट-सप्टेंबर महिन्यात जोरदार पाऊस झाला...
नंदुरबार जिल्ह्यात चार साखर कारखाने...जळगाव : खानदेशात उसाची लागवडदेखील बऱ्यापैकी आहे....
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास...सोलापूर ः ‘‘कृषी योजनांचा अधिकाधिक प्रसार करून...
‘‘हतनूर’मधून ३८८ दशलक्ष घनमीटर पाणी...जळगाव ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ९०...