agriculture news in Marathi,Onion market shutdown in Nagar, Maharashtra | Page 3 ||| Agrowon

नगरला कांदा बाजार कडकडीत बंद 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

कांद्यावर घातलेली निर्यातबंदी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान करत आहे. शासनाने मतासाठी शेतकऱ्यांचा बळी देऊ नये. निर्यातबंदी थांबेपर्यंत शेतकरी संघटना आंदोलन सुरूच ठेवेल. शेतकऱ्यांनी कांदा विक्रीला आणू नये.
- विक्रम शेळके, नेते, शेतकरी संघटना, नगर  

नगर ः कांद्यावर आणलेली निर्यातबंदी, साठवणुकीला घातलेले निर्बंध आणि कांद्याला उठाव नसल्याने कांदा व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या कांदा सत्याग्रह आंदोलनामुळे सोमवारी (ता. ७) नगरमधील कांदा बाजार पूर्णतः बंद होता. सोमवारी कांद्याचे लिलावच झाले नाहीत. त्यामुळे बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात शुकशुकाट होता. शेतकरी संघटनेनेही या आंदोलनात उडी घेतली असून, सहभाग नोंदवला आहे. 

कांद्याचे दर वाढताच शासनाने कांदा निर्यातबंदी केली आहे. शिवाय कांदा साठवणूक करण्यालाही बंदी घातली आहे. त्याचा परिणाम कांदा बाजारावर झाला आहे. नगरसह राज्यातून परराज्यांत जाणारा कांदा राज्याच्या सीमेवर अडवला जात आहे. याशिवाय त्या त्या राज्यात साठवलेला कांदा प्रशासन धाडी घालून जप्त करत आहे. याशिवाय परदेशांतील कांद्याची निर्यात बंद असल्याने कांद्याला उठाव नाही. त्यामुळे नगरसह महाराष्ट्रातून घेतलेला कांदा ठेवायचा कुठे, शिवाय सरकार जर तो ताब्यात घेणार असेल तर पैसे द्यायचे कोठून? असा प्रश्न व्यापारी उपस्थित करू लागले आहेत. त्यामुळे आजपासून व्यापाऱ्यांनी कांदा सत्याग्रह आंदोलन पुकारले असून, त्याला शेतकरी संघटनेने पाठिंबा दिला आहे. 

आंदोलनामुळे नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती बाजारात कांदा बाजार बंद असल्याने लिलाव झाले नाहीत. त्यामुळे दिवसभर शुकशुकाट होता. कांदा बाजार बेमुदत बंद राहणार आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. शेतकरी संघटना पूर्ण ताकदीने व्यापाऱ्यांसोबत आहे. निर्यातबंदी उठवल्याशिवाय शांत बसणार नाही, असे शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट यांनी सांगितले.

प्रतिक्रिया
नगरसह राज्यातून परराज्यांत जाणारा कांदा राज्याच्या सीमेवर अडवला जात आहे. याशिवाय त्या त्या राज्यात साठवलेला कांदा प्रशासन धाडी घालून जप्त करत आहेत. याशिवाय परदेशांतील कांद्याची निर्यात बंद असल्याने कांद्याला उठाव नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनी बेमुदत कांदा बाजार बंद आंदोलन पुकारले आहे.
- अनिल महेत्रे, कांदा व्यापारी, नगर
 


इतर बातम्या
गुणनियंत्रण संचालकपदी दिलीप झेंडेपुणे: राज्याच्या निविष्ठा व गुणनियंत्रण संचालकपदी...
राज्य सरकारने कांदा उत्पादकांना अनुदान...नाशिक  : कांदा हे पीक दरवर्षी कोणत्या ना...
सोलापूर जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलन सोलापूर  ः दूध दरवाढीसाठी पुकारलेल्या एल्गार...
दोन बियाणे कंपन्यांविरुद्ध न्यायालयीन...अकोला ः या हंगामात सोयाबीन बियाणे उगवले नसल्याने...
शेतकऱ्यांचा एल्गार मंत्रालयावर धडकेल...नगर  ः महाविकास आघाडी सरकारचे अस्तित्व...
... तर आम्ही मोठे आंदोलन करू ः...पुणे  ः राज्य सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर...
दूध दर आंदोलनाचा राज्यभर एल्गारपुणे: दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व...
पीकविमा नोंदणीत महाराष्ट्राची आघाडीपुणे: डिजिटल तंत्राचा वापर करून पंतप्रधान पीकविमा...
कोकण, घाटमाथ्यावर मुसळधारेचा अंदाज  पुणे ः राजस्थानचा दक्षिण भाग ते उत्तर...
कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत...पुणे : बंगालच्या उपसागरात मंगळवारपर्यंत (ता.४)...
डाळिंबावरील तेलकट डाग, मर, बुरशीजन्य...नगर ः राहुरी येथील महात्मा फुले कृषी...
सोयाबीनमध्ये तुरीचे आंतरपीकनांदेड : ‘‘कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी...
नांदेड जिल्ह्या अखेरच्या दिवशी...नांदेड : पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गंत पीक...
खानदेशात केळी दरांवर दबावजळगाव  ः खानदेशात केळी दरांवर दबाव कायम आहे...
लातूर विभागात २० लाख हेक्टरवर पिकांना...लातूर : ‘‘विभागातील लातूर, उस्मानाबाद, नांदेड,...
हिंगोली, परभणीकडे पावसाची पाठऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील जवळपास...
उसाची बाकी द्या, अन्यथा स्वातंत्र्यदिनी...नांदेड : भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याकडे...
नगरमधील एक लाखांवर शेतकरी पीक...नगर  ः ‘कोरोना’मुळे लाॅकडाउन करण्यात आले....
साखर कारखान्यांची देखभाल दुरुस्ती गतीनेकोल्हापूर: कोविडच्या पार्श्‍वभूमीवर साखर...
‘सोनगीर जामफळ’मधून विसर्गसोनगीर,  जि. धुळे  ः तापी नदीच्या...