जळगाव : पीकविम्याचा केवळ २० हजार शेतकऱ्यांना लाभ

पीकविम्याचा केवळ २० हजार शेतकऱ्यांना लाभ
पीकविम्याचा केवळ २० हजार शेतकऱ्यांना लाभ

जळगाव ः शासनाकडून शेतकऱ्यांना पीकविम्याची सक्ती केली जाते. पण या योजनेतून हव्या तेवढ्या शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नसल्याचे चित्र आहे. २०१८ मध्ये सुमारे ६२ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा काढला. त्यांपैकी केवळ २० हजार शेतकऱ्यांना पीकविम्याची भरपाई मिळाली आहे. अन्य शेतकऱ्यांना मात्र नुकसान होऊनही भरपाई मिळालेली नाही.  जिल्ह्यात प्रधानमंत्री पीकविमा योजनेत खरीप-२०१८ मध्ये ६२ हजार ८२७ शेतकऱ्यांनी ७७ हजार ८८६ हेक्‍टर क्षेत्राचा विमा काढला. त्यासाठी १३ कोटी ८४ लाख ३५ हजार ५९३ रुपये एवढा प्रीमिअम भरला. त्यांपैकी २० हजार ७७ शेतकऱ्यांना विम्यापोटी २३ कोटी ७२ लाख ४४ हजार ८७५ एवढी भरपाई मिळाली. विम्याची रक्कम भरल्याच्या दुप्पट भरपाई मिळाली, तरी केवळ २० हजार शेतकऱ्यांनाच. विमा कंपनीने शेतकऱ्यांना त्यांच्या मंडळात नुकसान झाले नसल्याचे सांगत भरपाई नाकारली. यामुळे शेतकरी पीकविमा योजनेकडे पाठ फिरविताना दिसत आहेत.  विमा काढताना संबंधित ग्राहकाचे नुकसान झाल्यास त्याला भरपाई मिळते. हात, पाय निकामी किंवा घर गाडीचे नुकसान झाले, तर वैयक्तिक भरपाई मिळते. पीकविम्याचे मात्र नेमके उलट आहे. पीकविम्यात शेतकऱ्याने वैयक्तिक विमा हप्ता भरायचा आहे आणि मात्र नुकसान अनेक गावांचे झाले, तरच भरपाई दिली जाते. नुकसान झाल्यानंतर चोवीस तासांच्या आत आपल्या नुकसानीचे फोटो विमा कंपनीच्या वेबसाइटवर अपलोड करावे लागतात. हे शेतकऱ्यांना अद्यापही माहिती नाही, असे म्हणण्यापेक्षा विमा कंपनीचे अधिकारी, कृषी अधिकाऱ्याने शेतकऱ्यांना ही माहिती दिली पाहिजे. प्रत्यक्षात मात्र तसे होत नसल्याचे दिसून आले आहे. महसूल मंडळात सर्वत्र नुकसान झाले तरच भरपाई दिली जाते. हा प्रकार विमा कंपनीला बंद करायला शासनाने भाग पाडले पाहिजे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.   पीकविमा योजनेची स्थिती 

वर्ष शेतकरी भरलेला हप्ता लाभ  मिळालेले शेतकरी रक्कम
२०१७ ८५५७८ १६,३३,२९,६२४ ४६१६१ ६९,१६,५६,१५१
२०१८ ६२८२७ १३,८४,३५,५९३ २००७७ २३,७२,४४,८७५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com