Agriculture news in marathi;Only 20,000 farmers benefit from powwism | Agrowon

जळगाव : पीकविम्याचा केवळ २० हजार शेतकऱ्यांना लाभ

टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 जुलै 2019

जळगाव ः शासनाकडून शेतकऱ्यांना पीकविम्याची सक्ती केली जाते. पण या योजनेतून हव्या तेवढ्या शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नसल्याचे चित्र आहे. २०१८ मध्ये सुमारे ६२ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा काढला. त्यांपैकी केवळ २० हजार शेतकऱ्यांना पीकविम्याची भरपाई मिळाली आहे. अन्य शेतकऱ्यांना मात्र नुकसान होऊनही भरपाई मिळालेली नाही. 

जळगाव ः शासनाकडून शेतकऱ्यांना पीकविम्याची सक्ती केली जाते. पण या योजनेतून हव्या तेवढ्या शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नसल्याचे चित्र आहे. २०१८ मध्ये सुमारे ६२ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा काढला. त्यांपैकी केवळ २० हजार शेतकऱ्यांना पीकविम्याची भरपाई मिळाली आहे. अन्य शेतकऱ्यांना मात्र नुकसान होऊनही भरपाई मिळालेली नाही. 

जिल्ह्यात प्रधानमंत्री पीकविमा योजनेत खरीप-२०१८ मध्ये ६२ हजार ८२७ शेतकऱ्यांनी ७७ हजार ८८६ हेक्‍टर क्षेत्राचा विमा काढला. त्यासाठी १३ कोटी ८४ लाख ३५ हजार ५९३ रुपये एवढा प्रीमिअम भरला. त्यांपैकी २० हजार ७७ शेतकऱ्यांना विम्यापोटी २३ कोटी ७२ लाख ४४ हजार ८७५ एवढी भरपाई मिळाली. विम्याची रक्कम भरल्याच्या दुप्पट भरपाई मिळाली, तरी केवळ २० हजार शेतकऱ्यांनाच. विमा कंपनीने शेतकऱ्यांना त्यांच्या मंडळात नुकसान झाले नसल्याचे सांगत भरपाई नाकारली. यामुळे शेतकरी पीकविमा योजनेकडे पाठ फिरविताना दिसत आहेत. 

विमा काढताना संबंधित ग्राहकाचे नुकसान झाल्यास त्याला भरपाई मिळते. हात, पाय निकामी किंवा घर गाडीचे नुकसान झाले, तर वैयक्तिक भरपाई मिळते. पीकविम्याचे मात्र नेमके उलट आहे. पीकविम्यात शेतकऱ्याने वैयक्तिक विमा हप्ता भरायचा आहे आणि मात्र नुकसान अनेक गावांचे झाले, तरच भरपाई दिली जाते.

नुकसान झाल्यानंतर चोवीस तासांच्या आत आपल्या नुकसानीचे फोटो विमा कंपनीच्या वेबसाइटवर अपलोड करावे लागतात. हे शेतकऱ्यांना अद्यापही माहिती नाही, असे म्हणण्यापेक्षा विमा कंपनीचे अधिकारी, कृषी अधिकाऱ्याने शेतकऱ्यांना ही माहिती दिली पाहिजे. प्रत्यक्षात मात्र तसे होत नसल्याचे दिसून आले आहे. महसूल मंडळात सर्वत्र नुकसान झाले तरच भरपाई दिली जाते. हा प्रकार विमा कंपनीला बंद करायला शासनाने भाग पाडले पाहिजे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.  

पीकविमा योजनेची स्थिती 

वर्ष शेतकरी भरलेला हप्ता लाभ  मिळालेले शेतकरी रक्कम
२०१७ ८५५७८ १६,३३,२९,६२४ ४६१६१ ६९,१६,५६,१५१
२०१८ ६२८२७ १३,८४,३५,५९३ २००७७ २३,७२,४४,८७५

 


इतर बातम्या
नगर जिल्ह्याच्या विकासासाठी ९७१ कोटींची...नगर ः जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाकडे ९७१...
खानदेशातील ‘रब्बी’ला ढगाळ वातावरणाचे...जळगाव : खानदेशात यंदा हुडहुडी भरविणारी थंडी दोन-...
उद्योगमंत्र्यांनी जाणली रेशीम...औरंगाबाद : जिल्ह्यात रेशीम कोषाचे उत्पादन,...
फुलकिड्यांच्या प्रादुर्भावामुळे काजू...सिंधुदुर्ग : ढेकण्या, शेंडेमर, फांदीमर रोगांमुळे...
दहा वर्षांत सातारा जिल्ह्यातील १३८०...सातारा  ः जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी...
मुळा, भंडारदरा धरणांतून आजपासून आवर्तननगर  ः यंदा पाऊस चांगला झाल्याने...
पुणे कृषी महाविद्यालयातील ...पुणे  ः विद्यार्थी वसतिगृहाचे प्रवेशद्वार...
भीमा खोऱ्यातील धरणांमध्ये ८५ टक्के पाणीपुणे  : जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात यंदा दमदार...
हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यांत...हिंगोली : पाऊस लांबल्यामुळे हिंगोली, नांदेड,...
‘पोकरा’अंतर्गत तांत्रिक सहकार्यासाठी...औरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या...
शिरवाडे वणीत जलसंधारणासाठी...नाशिक : कर्मवीर काकासाहेब वाघ कला विज्ञान आणि...
अनियमित थंडी ऊस रिकव्हरीच्या मुळावरकोल्हापूरः जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातही ऊस...
कुरखेडा तालुक्यात सेवा सोसायट्यांचा धान...गडचिरोली  ः कमिशन व हमालीची रक्‍कम मिळत...
देशात केवळ ३५ तेलबिया हबनिर्मितीनवी दिल्ली: देशातील तेलबिया उत्पादन वाढावे आणि...
नवव्या जागतिक कृषी महोत्सवास उद्यापासून...नाशिक : श्रीस्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी...
राज्यात गारठा कमी, उकाडा वाढलापुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रवाह...
संवादासाठी तंत्रज्ञान महोत्सव फायदेशीर...सोलापूर : ‘‘शेतीतील नवे ज्ञान, तंत्रज्ञान, बदल...
धान खरेदी केंद्रासाठी शेतकऱ्यांचा...भंडारा  ः गेल्या दोन महिन्यांपासून बंद...
काँग्रेसचा दर बुधवारी मुंबईत ‘लोकदरबार’ मुंबई  : विविध कामांसाठी मंत्रालयात येणाऱ्या...
अलिबागचा पांढरा कांदा ‘जीआय’च्या वाटेवरपुणे : औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध असलेल्या...