agriculture news in Marathi,only 40 percent supply of Onion against demand, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

देशात मागणीच्या तुलनेत ४० टक्केच कांदा आवक

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

पुणे: देशभरात ऑगस्ट महिन्यातील खरीप कांद्याच्या लागणींची प्रतिएकरी उत्पादकता अतिवृष्टीमुळे घटली. पर्यायाने नोव्हेंबरमध्ये येणाऱ्या नव्या कांद्याच्या आवकेत साप्ताहिक मागणीच्या तुलनेत देशपातळीवर ५८ टक्क्यांपर्यंत घट दिसत असून, त्यामुळेच बाजार समित्यांतील सर्वसाधारण कांदा दर साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटलच्या उच्चांकी पातळीवर पोचले आहेत.

पुणे: देशभरात ऑगस्ट महिन्यातील खरीप कांद्याच्या लागणींची प्रतिएकरी उत्पादकता अतिवृष्टीमुळे घटली. पर्यायाने नोव्हेंबरमध्ये येणाऱ्या नव्या कांद्याच्या आवकेत साप्ताहिक मागणीच्या तुलनेत देशपातळीवर ५८ टक्क्यांपर्यंत घट दिसत असून, त्यामुळेच बाजार समित्यांतील सर्वसाधारण कांदा दर साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटलच्या उच्चांकी पातळीवर पोचले आहेत.

उत्तम प्रतीच्या कांद्यासाठी नाशिक जिल्ह्यांतील बाजार समित्यांत सोमवारी (ता.१८) ५५०० ते ६००० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान बाजारभाव निघाले. १० ते १६ नोव्हेंबरदरम्यान देशव्यापी बाजार समित्यांतील आवक १ लाख ७५ हजार टन होती. देशांतर्गत किमान साप्ताहिक गरज सुमारे ४ लाख २० हजार टन असताना त्या तुलनेत मागील आठवड्यातील आवक ५८ टक्क्यांनी कमी होती. परिणामी, कांद्याचे सरासरी दर उच्चांकी पातळीवर स्थिरावले आहेत.

उमराणे (ता. देवळा) येथील खरेदीदार व निर्यातदार खंडू देवरे म्हणाले, ‘‘जुने कांदे संपत आले आहेत. नव्या कांद्याला पावसाचा मार बसला. डिसेंबरमध्ये नव्या कांद्याची तुरळक आवक असेल; पण मागणीच्या प्रमाणात तुटवडा भरून निघणार नाही. आजघडीला अल्वर विभागातून कच्चा-पक्का माल येत आहे. दक्षिण भारतासह महाराष्ट्रातील आगाप कांदा पावसामुळे बऱ्यापैकी खराब झाल्याचे दिसते. अशातच, नोव्हेंबरमध्ये थंडी अपेक्षित होती. जेणेकरून येणाऱ्या कांद्याच्या उत्पादकतेत सुधारणा झाली असती. तथापि, गेल्या पंधरवड्यात थंडीच नसल्याने उत्पादकतेत सुधारणा दिसत नाही.’’

महत्त्वाच्या बाबी : 
लागणी व आवकेचे चक्र : रोप पुनर्लागणीनंतर कांद्याचे पीक ९० दिवसांनी बाजारात येते. म्हणजेच ऑगस्ट महिन्यातील  दर आठवड्यातील लागणी नोव्हेंबर महिन्यात अनुक्रमे बाजारात येतील. याचप्रमाणे सप्टेंबरच्या पुनर्लागणी डिसेंबरमध्ये येतील. 
देशव्यापी लागणी : केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशपातळीवर २.७ लाख हेक्टरवर खरीप लागणी झाल्या. २०१८ च्या तुलनेत केवळ ७ टक्क्यांची यंदा घट आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरात व राजस्थान ही प्रमुख खरीप कांदा उत्पादक राज्य होत.
नुकसानीचे प्रमाण : अतिवृष्टीमुळे खरीप लागणी बाधित झाल्या. बाधित लागणींची राज्यनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे -
मध्य प्रदेश ः ५८, कर्नाटक ःझ १८. अन्य राज्यांमधील नेमक्या नुकसानीची माहिती उपलब्ध नाही.
निर्यात घटली : चालू कॅलेंडर वर्षात ऑगस्टअखेरपर्यंत १३.६ लाख टन कांदा निर्यात झालीय. मागील कॅलेंडर वर्षांत १९.९ लाख टन कांदा निर्यात झाल्याचे केंद्रीय कृषी मंत्रालयाकडील आकडेवारीतून दिसते. यंदा सप्टेंबरपासून निर्यातीवर पूर्णत: बंदी आहे.


इतर अॅग्रो विशेष
राज्यात दोन लाख क्‍विंटल कापूस खरेदीअमरावती ः खासगी बाजारात कापसाला कमी दर मिळत...
राज्यातील दूध संकलन ३० लाख लिटरने घटलेसोलापूर ः ओल्या दुष्काळामुळे ओढवलेल्या आपत्तीने...
मातीची धूप थांबविण्यासाठी जागरूक रहा :...परभणी ः शेतीसाठी माती हा सर्वांत महत्त्वाचा घटक...
पणज गावाने आणली केळी पिकातून सुबत्ताअकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात पणज हे छोटे गाव...
संगेवाडीच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्याला...सोलापूर  : दोन महिन्यांपुर्वी झालेल्या...
माणुसकीलाच काळिमापशुवैद्यकीय महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची...
श्रमसधन उद्योग उभारणीवर हवा भरआजच्या घडीला सरकार कृषी संशोधन आणि विकास...
रोपवाटिका व्यवसायाने दिला सक्षम आधारदहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर नोकरी न मिळाल्याने...
मराठवाड्यात नऊ लाख हेक्‍टरवर रब्बी पेरणीलातूर : अतिपावसाने खरीप पिके हातची गेलेल्या...
औरंगाबादच्या मोसंबी कलमांची मध्य...महाराष्ट्रातील अत्यंत गोड, रसाळ मोसंबीने आता मध्य...
बी-हेव्ही मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीस...सोलापूर : साखरेचे अतिरिक्‍त उत्पादन टाळून इंधन...
कृत्रिम रेतन व्यवसाय येणार कायद्याच्या...पुणे : राज्यातील गाय-म्हशींच्या कृत्रिम रेतनाचा...
हलक्या पावसामुळे वाढली धास्तीपुणे  ः अरबी समुद्राच्या दक्षिण भागात सक्रिय...
दोन-तीन दिवसात किमान तापमानात होणार घट...पुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कोकण, पश्चिम...
भंडारा : दूध संघांचे १८ कोटींचे चुकारे...भंडारा ः जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघाने...
डिसेंबर ते फेब्रुवारीत अशी असेल थंडी;...नवी दिल्ली ः डिसेंबर ते फेब्रुवारी या हंगामात...
मिश्रखतांसाठी विनापरवानगी कच्चा माल...पुणे : राज्यात गेले दीड वर्ष मिश्र खतांसाठी कच्चा...
शरीराचा एक पाय अपघाताने गेला असला,...कोल्हापूर ः नियतीने शरीर अपंग केले... पण मनाची...
कपाशीचा झाला झाडा, शेतात नुसत्या पऱ्हाटीनांदेड :  नांदेड, परभणी, हिंगोली...
शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी...मुंबई  ः संकटातील शेतकऱ्यांना सरसकट व...