हरणबारी कालव्याच्या सर्वेक्षणाचे आदेश : भामरे

हरणबारी कालव्याच्या सर्वेक्षणाचे आदेश : भामरे
हरणबारी कालव्याच्या सर्वेक्षणाचे आदेश : भामरे

सटाणा, जि. नाशिक : बागलाण तालुक्यातील केळझर चारी क्रमांक आठसाठी राज्य शासनाने अंतिम प्रशासकीय मान्यता प्रदान केली. त्यासाठी ४ कोटी ९७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिले. याबरोबरच केळझर वाढीव चारी क्रमांक आठसह प्रलंबित हरणबारी उजव्या कालव्याच्या सर्वेक्षणाचे आदेश जलसिंचन विभागाने दिले, अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिले. त्यामुळे दोन्ही कालव्यांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

केळझर चारीच्या शून्य ते बारा किलोमीटरपर्यंतचा (भाक्षी-मुळानेपर्यंत) मार्ग यापूर्वीच मोकळा झाला आहे. आता त्यापुढील चौगाव, कर्हे, अजमीर सौंदाणे, सुराणे, देवळाणे येथील सर्वेक्षणाला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातून मंजुरी मिळाली आहे. या वाढीव कालव्यासाठी १४ दलघफू पाणी आरक्षण करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे डॉ. भामरे म्हणाले.

कालव्यासाठी पूरपाण्याव्यतिरिक्त ३८ दलघफू पाणीसाठा जलसंपदा विभागाने आरक्षित केला. सर्वेक्षणाच्या आदेशामुळे पारनेर, बिजोटे, आखतवाडे, गोराणे, आनंदपूर, फोफिर, खीरमाणे, कोटबेल, कुपखेडा, नामपूर परिसर, नळकेस, सारदे, रामतीर, रातीर, सुराणे, देवळाणे, वायगा, काकडगाव, द्याने, आसखेडा, सातमाणे गावांच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.

डॉ. भामरे म्हणाले, ‘‘दोन्ही कालव्यांच्या सर्वेक्षणासाठी कमी कालावधीच्या निविदा प्रसिद्ध करून लाभक्षेत्रातील एकही गाव टळणार नाही, याची दक्षता घेतली जाईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com