जपानमध्ये सेंद्रिय भाजीपाला, धान्यांना वाव ः कुलगुरू डॉ. भाले

जपानमध्ये सेंद्रिय भाजीपाला, धान्यांना वाव ः कुलगुरू डॉ. भाले
जपानमध्ये सेंद्रिय भाजीपाला, धान्यांना वाव ः कुलगुरू डॉ. भाले

अकोला ः सेंद्रिय भाजीपाला, धान्ये, शिक्षण तसेच संशोधनाच्या दृष्टीने येत्या काळात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ हे जपानसोबत संबंध दृढ करण्याचा प्रयत्न करेल, असे मत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना व्यक्त केले.  डॉ. भाले यांच्यासह अपारंपरिक ऊर्जा स्रोत विभागाचे प्रमुख डॉ. सुरेंद्र काळबांडे, विवेक खांबलकर यांचे शिष्टमंडळ नुकतेच जपान दौऱ्यावरून परतले असून त्यांनी तेथे विविध मान्यवरांच्या भेटी घेतल्या. याअनुषंगाने ते बोलत होते. जपानला भेट दिली असता तेथे सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला भाजीपाला, धान्यांना वाव आहे, हे चर्चेतून समोर आले. शिक्षण तसेच संशोधनाच्या दृष्टीनेही संधी आहेत. जपानमधील भारतीय राजदूतांच्या माध्यमातून तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत चर्चा केली. शिवाय काही शैक्षणिक संस्था, सौर ऊर्जेचे काम करणारे कंपनी अधिकारी व व्यापाऱ्यांसोबतही चर्चा या दौऱ्यात झाल्याचे डॉ. भाले म्हणाले. या दौऱ्यात शेतकऱ्यांनी पिकविलेला शेतीमाल (भाजीपाला, डाळी), शैक्षणिक आदान-प्रदान तसेच संशोधनाच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा झाली. येत्या काळात यादृष्टीने कृषी विद्यापीठ जपानसोबत काही करार करेल, असेही ते म्हणाले. दोन्ही देशांदरम्यान संबंध यादृष्टीने वाढविण्यासाठी इंडो-जापान फोरमची स्थापना करावी लागणार आहे. त्यासाठी विद्यापीठ पुढाकार घेऊन असा इंडो-जापान एज्युकेशन अँड रिसर्च फोरम स्थापन करेल. त्याद्वारे संबंध दृढ होतील. काही करारही आगामी काळात करण्यात येतील, अशी माहितीसुद्धा डॉ. भाले यांनी दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com