लष्करी अळीचा प्रादुर्भाव, शेतकऱ्याने मका पिकावर फिरवला नांगर

लष्करी अळीचा प्रादुर्भाव, शेतकऱ्याने मका पिकावर फिरवला नांगर
लष्करी अळीचा प्रादुर्भाव, शेतकऱ्याने मका पिकावर फिरवला नांगर

नाशिक : जिल्ह्यात मका पिकावर लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांनी रासायनिक व जैविक कीटकनाशकांच्या फवारण्या केल्या. मात्र, याचा परिणाम न होता नुकसान पातळी वाढल्याने मक्यावर नांगर फिरवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. येवला तालुक्यातील उंदीरवाडी येथील बाबाजी शंकर चापेकर या मका उत्पादक शेतकऱ्याने शेतातील दीड एकर क्षेत्रावरील मक्याचे पीक नांगरून टाकले. लष्करी अळीचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी रासायनिक कीटकनाशकांच्या तीन फवारण्या करूनही परिणाम दिसून आले नाहीत.  परिणामी, खिशात पुढील फवारणी करण्यासाठी भांडवल नसल्याने अखेर जनावरे घालून व ट्रॅक्टरद्वारे मकापीक नांगरून टाकले. पिकावरील मशागत, लागवड, बियाणे व कीटकनाशकांचा खर्च वाया गेला आहे. या गंभीर परिस्थितीमुळे तालुक्यातील शेतकरी हतबल झाले आहेत.

मला ३ एकर क्षेत्र आहे. पैसे नसल्याने उसनवारी करून मका लावला. थोड्याफार शिल्लक भांडवलावर तीन फवारण्या केल्या. मात्र काहीच फायदा झाला नाही, प्रादुर्भाव तसाच होता. पुढे पीक संरक्षण करण्यासाठी भांडवल नसल्याने मका नांगरण्याचा निर्णय घेतला. - बाबाजी शंकर चापेकर, मका उत्पादक शेतकरी, उंदीरवाडी, ता. येवला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com