agriculture news in Marathi,Over 35 thousand crore crop loss in state, Maharashtra | Agrowon

राज्यात पीकहानी ३५ हजार कोटींवर

टीम अॅग्रोवन
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

पुणे : अतिपावसामुळे राज्यात आत्तापर्यंत फळबागांसह खरीप पिकांची ३५ हजार कोटी रुपयांची हानी झाल्याचा अंदाज आहे. ‘‘राज्यात ओला दुष्काळ पडला असून, दिवसेंदिवस पिकांचे नुकसान वाढते आहे. त्यामुळे यंदा वाटली जाणारी पीक नुकसानभरपाई विक्रमी स्वरूपाची असेल,’’ अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

पुणे : अतिपावसामुळे राज्यात आत्तापर्यंत फळबागांसह खरीप पिकांची ३५ हजार कोटी रुपयांची हानी झाल्याचा अंदाज आहे. ‘‘राज्यात ओला दुष्काळ पडला असून, दिवसेंदिवस पिकांचे नुकसान वाढते आहे. त्यामुळे यंदा वाटली जाणारी पीक नुकसानभरपाई विक्रमी स्वरूपाची असेल,’’ अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

शेतकऱ्यांनी १४० लाख हेक्टरवर कष्टपूर्वक खरीप पिके घेतली आहेत. मात्र, अतिपावसामुळे प्रत्येक जिल्ह्यातून नुकसानीची माहिती शासनाकडे येऊन आदळत आहे. ‘‘खरिपावर आलेले संकट मोठे आणि ऐतिहासिक आहे. राज्यभर ओल्या दुष्काळाची स्थिती आहे. सरकार स्थापन झालेले नसले तरी कृषी, महसूल, अर्थ तसेच मदत-पुनर्वसन विभाग संयुक्तपणे या संकटाचा आढावा घेत आहे. यंदा शेतीमधील नुकसान ‘न भूतो न भविष्यती' असे दिसते आहे. त्यामुळे विक्रमी स्वरूपाची भरपाई वाटपाची तयारी ठेवावी लागेल, अशी पूर्वकल्पना अर्थ विभागाला देण्यात आली आहे,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली.

राज्य शासनाला कृषी व महसूल विभागाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार ४ नोव्हेंबरपर्यंत ५४ लाख ८२ हजारांवरील पिके नष्ट झाली आहेत. त्यात ५३ हजार हेक्टर वरील फळबागदेखील आहेत.

‘‘अतिपावसामुळे खरिपाचे झालेले नुकसान अंदाजाच्या पलीकडचे आहेत. आमच्या मते राज्यातील शेतकऱ्यांना त्यामुळे किमान पाच वर्षे तरी सावरता येणार नाही. कारण, आताच नुकसान ३५ हजार कोटीच्या पलीकडे गेल्याचे दिसते आहे. नुकसानीचे अहवाल रोज येत असून ही आकडेवारी दिवसेंदिवस वाढते आहे. सोयाबीन व कापूस या दोन्ही पिकांमुळे राज्याच्या खरिपाला बळ मिळते. मात्र, यंदा या दोन्ही नगदी पिकांची अपरिमित हानी झालेली आहे. त्यामुळे राज्याला आता केंद्राकडून भरीव मदत मिळण्यासाठी प्रस्ताव तयार केला जात आहे. स्वतः मुख्यमंत्री याबाबत केंद्रात जावून पंतप्रधानांकडे साकडे घालण्याची शक्यता आहे,’’ अशी माहिती महसूल विभागाच्या उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. 

शेतकऱ्यांनी यंदाच्या खरिपात १३ सप्टेंबर २०१९ च्या अहवालानुसार १३८ लाख ७२ हजार हेक्टरवर पेरा केलेला होता. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, ‘‘शेतकऱ्यांनी ४३ लाख ३८ हजार हेक्टरवर लावलेल्या कपाशीपैकी १९.४६ लाख हेक्टरवरील पीक नष्ट झाले आहे. तसेच, ३९.४९ लाख हेक्टरपैकी १९.५२ लाख हेक्टरवरील सोयाबीन वाया गेला आहे. या दोन्ही पिकांनी शेतकऱ्यांची केलेली हानी हजारो कोटींची आहे.”

राज्यात अतिपावसाने कापूस, सोयाबीनप्रमाणेच १.६० लाख हेक्टरवरील धान, दोन लाख हेक्टरवरील ज्वारी आणि सव्वा दोन लाख हेक्टरवरील बाजरी नष्ट झाली आहे. मका उत्पादक शेतकऱ्यांचीदेखील अतोनात हानी झाली असून आतापर्यंत पाच लाख हेक्टरवरील मका मातीमोल झाल्याचे नजरअंदाज आकडेवारीतून स्पष्ट होते आहे. याशिवाय एक लाख हेक्टरवरील तूर आणि सव्वा लाख हेक्टरवरील भुईमूग वाया गेला आहे. 

मराठवाड्याला सर्वाधिक फटका
सर्वांत जास्त नुकसान मराठवाड्यात झाले असून, तेथे २३ लाख २० हजार हेक्टरवरील पिके मातीमोल झाली आहेत. त्यापाठोपाठ जास्त हानी नाशिक विभागात असून, तेथील १६ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातील खरीप वाया गेला आहे. विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांना अतिपावसाने तडाखा दिला असून, धानशेतीचे मोठे नुकसान झाल्याची माहिती हाती येत आहे. आत्तापर्यंत ११.२४ लाख हेक्टरवरील खरीप पिके वाया गेल्याचा अहवाल अमरावती विभागातून आलेला आहे. ठाणे विभागात १.२० लाख हेक्टर, पुणे १.३६ लाख हेक्टर, तर नागपूर विभागातील ९० हजार हेक्टरवरील पिके नष्ट झाली आहेत. 

मदतीच्या नियोजनासाठी विचारविनिमय
केंद्र शासनाकडे पाठविण्याच्या अंतिम अहवालासाठी माहिती गोळा करण्याचे काम सध्या राज्य शासनाकडून केले जात आहे. त्यासाठी कृषी आणि महसूल विभागाकडून होत असलेल्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. याबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली जात असून, केंद्राकडे निश्चित काय भूमिका मांडायची, तसेच शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आर्थिक नियोजन कसे करायचे, याबाबत विचारविनिमय सुरू आहे, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.


इतर अॅग्रो विशेष
भांडवली शेतीचा विळखा बघता बघता हरितक्रांतीला पन्नास वर्षे झाली. तसे,...
पशुखाद्य : नियोजन अन् नियंत्रणमहाराष्ट्रात २०१२ च्या दुष्काळापासून दुग्ध...
मराठवाड्यात साडेदहा हजार एकरांवर तुतीऔरंगाबाद : मराठवाड्यात यंदा ३० नोव्हेंबर...
विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सहा दिवस...मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या...
विठ्ठल मंदिरात मोबाईल बंदीपंढरपूर, जि. सोलापूर ः श्री विठ्ठल मंदिराच्या...
धानासाठी क्विंटलला पाचशे रुपये अनुदानमुंबई: राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा...
‘पीजीआर’ला मान्यतेचा मार्ग मोकळापुणे ः देशभरात शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या बिगर...
इथेनॉलसाठी मान्यता; पण प्रकल्पांसाठी...पुणे  : थेट साखरेपासून इथेनॉल तयार करण्यास...
उत्कृष्ट व्यवस्थापनातून पपईत मिळवली ओळखनंदुरबार जिल्ह्यात धमडाई येथील सुभाष व प्रनील या...
उद्या तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे ः बंगाल उपसागराच्या आग्नेय भागात कमी दाबाचे...
परिश्रमपूर्वक व्यवस्थापनातून...पुणे जिल्ह्यातील रिहे येथील सुनील शिंदे...
किरकोळ व्यापाऱ्यांकरिता कांदासाठा...मुंबई ः देशात कांद्याचे उत्पादन घटल्याने...
सर्वाधिक दर मोजक्याच कांद्यालानगर ः वाढलेल्या कांदादराचा गेल्या महिनाभरापासून...
पशुखाद्य दर गगणाला भिडलेसांगली ः दुष्काळ व अतिवृष्टीचा फटका पशुखाद्य...
शेवंतीचे तीन वाण लवकरच पुणेः शेतकऱ्यांना शेवंतीच्या पांरपरिक वाणांना...
उत्तर प्रदेशात ‘एसएपी’त बदल नाहीनवी दिल्ली: उत्तर प्रदेश सरकारने सलग दुसऱ्या...
उसाचे ३८ गुंठ्यांत तब्बल १४७ टन उत्पादनकोल्हापूर जिल्ह्यातील कवठेगुलंद (ता. शिरोळ) येथील...
कमी कालावधीचा दोडका देतोय चांगला नफागेल्या दोन, तीन महिन्यांत झालेल्या पावसामुळे पुणे...
तापमानात चढ-उतारपुणे ः अरबी समुद्राच्या आग्नेय भागात असलेले कमी...
जीवघेणा बाजारदेशात बोगस, भेसळयुक्त, अनधिकृत कीडनाशकांचा वापर...