agriculture news in Marathi,over 6 thousand shetishal will be in state , Maharashtra | Agrowon

राज्यात रब्बीसाठी सव्वासहा हजार शेतीशाळा

टीम अॅग्रोवन
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

रब्बी हंगामातील पिकांची उत्पादकता वाढविणे, तसेच शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करण्याचे मुख्य उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कृषी विभागाने सहा हजार ३४७ शेतीशाळा घेण्याचे ठरविले आहे. या उपक्रमात हरभरा, ज्वारी पिकांवर भर दिला जाईल.
- सुहास दिवसे, कृषी आयुक्त

पुणे : रब्बी हंगामात राज्यात सव्वासहा हजारांपेक्षा जास्त शेतीशाळा घेण्यात येणार असून, त्यावर दहा कोटी रुपये खर्च केले जाण्याची शक्यता आहे. 

“थेट बांधावर जाऊन कृषी विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयोग खरिपात यशस्वी झाला. त्यामुळे रब्बी हंगामातदेखील आम्ही क्रॉपसॅपमधून चार हजार तर पोक्रा व आत्मा उपक्रमातून दोन हजारांपेक्षा जास्त शेतीशाळा राज्यभर घेणार आहोत,” अशी माहिती आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली. 

एका शेतीशाळेवर सरकारी तिजोरीतून १५ हजार रुपये खर्च केले जातात. कृषी सहायक व पर्यवेक्षकाकडे या उपक्रमाची सूत्रे देण्यात आली आहेत. मात्र, त्याचा आराखडा विभागीय कृषी सहसंचालकांनी तयार करायचा आहे. शेतीशाळा गावात, पारावर किंवा इतर ठिकाणी न घेता थेट बांधावर घेण्याच्या सूचना आयुक्तालयाने दिल्या आहेत. 

किमान १५ दिवसांतून एक वर्ग यात अपेक्षित असून आठ शेतीशाळा हंगामात घेतल्या जातील. यात पेरणीपूर्व, पेरणीच्या वेळी, पीक वाढीच्या अवस्थेत, काढणीच्या वेळी, काढणीपश्चात अशा विविध टप्प्यांत शाळा घेतल्या जातील. 
शेतीशाळा उपक्रमासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, राष्ट्रीय गळीत धान्य अभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजना, आत्मा, क्रॉपसॅप याशिवाय पोक्रा (नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प) अशा विविध माध्यमांचा निधी वापरला जात आहे. 

“शेतीशाळेमध्ये कृषी कर्मचाऱ्यांनी केवळ थातूरमातूर कामे न करता शास्त्रज्ञ सल्ला व योजनांची सखोल माहिती देणे अपेक्षित आहे. शेतीशाळांसाठी तांत्रिक साहित्य तयार करण्यासाठी पीकनिहाय समित्यादेखील स्थापन करण्यात आलेल्या आहेत. यात शास्त्रज्ञ व अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. खरिपात बारा हजार शेतीशाळा घेण्यासाठी एक हजार ७७० कृषी पर्यवेक्षक आणि दहा हजार ६२० कृषी सहायकांची मदत घेण्यात आली. याशिवाय शेतकऱ्यांमधून निवडलेल्या १७ हजार 
शेतीमित्रांचीदेखील मदत या उपक्रमासाठी घेण्यात आली.


इतर अॅग्रो विशेष
भविष्यात देशी कपाशीला गतवैभव प्राप्त...परभणी: देशी कपाशीचे वाण रसशोषण करणाऱ्या किडीसाठी...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २२७ कोटी...मुंबई: राज्यात जुलै ते ऑक्टोबर दरम्यान...
बेदाणा दरात वाढीचे संकेतसांगली ः दिवाळीनंतर बेदाण्याचे सौदे सुरु झाले...
पीकविमा कंपन्यांच्या नफेखोरीला चाप लावा...पुणे: कृषी विभागाच्या कामकाजाची माहिती...
द्राक्षाचे ४० वाण आयात करणार : डॉ. ए....पुणेः शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या...
सुटीच्या दिवशीही बाजार समित्या सुरू ठेवापुणे: अवकाळी पावसाने लांबलेल्या शेतमालाच्या...
विदर्भापाठोपाठ खानदेशात थंडी वाढतेयपुणे ः राज्यातील अनेक भागांत हवामान कोरडे...
पणन महासंघाकडून ९ कोटी रुपयांचे चुकारेअमरावती ः राज्यात महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस...
नुकसानग्रस्तांना ५,३०० कोटींचा दुसरा...मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा...
साहेब, शेतीसाठी दिवसा वीज द्या हो...अकोला  ः रब्बी हंगामात सिंचनाचे काम सुरू...
नोकरीला शेतीची जोड देत उंचावले अर्थकारणआसोदे (ता. जि. जळगाव) येथील नीलेश नारायण माळी एका...
प्रक्रिया उद्योगातून सोयाबीनचे...शहरी बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड...
शेवतींच्या फुलांनी जिंकले मन !...मांजरी, पुणे : विविधरंगी शेवंतीच्या फुलांनी...
कमी पाण्यामध्ये सीताफळाचे किफायतशीर...सिंचनासाठी पाण्याच्या कमतरतेसह प्रतिकूल...
दर्जेदार वांगी उत्पादनात मानेंचा हातखंडाकसबे डिग्रज (ता. मिरज, जि. सांगली) येथील युवा...
देशी कपाशीतील संशोधनाची शंभरीपरभणी येथील कापूस संशोधन केंद्र, मेहबूब बागची...
जैवविविधता संवर्धनासाठी सामूहिक...नाशिक: पर्यावरणाची योग्य ती काळजी न घेतल्याने...
देशी कापसाचा ब्रॅंड आवश्‍यकपरभणी ः आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लांब धाग्याच्या...
...'या' बॅंकांचे थकले चौदा हजार कोटी...पुणे : कोरड्या दुष्काळानंतर ओला दुष्काळ आणि त्यात...
तागाच्या पिशव्यांकडे साखर कारखान्यांची...कोल्हापूर : ताग उत्पादकांना चालना देण्यासाठी...