अकोल्यात ३७ हजार हेक्टरचे पंचनामे

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या झालेल्या पिकांचे प्रशासनाकडून पंचनामे करण्यात येत आहेत. सोमवारपर्यंत (ता. २) जिल्ह्यात ३७,३६० हेक्टरचा पंचनामा करण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. कृषी, महसूल, पंचायत अशा तीन विभागांमार्फत पंचनामा केला.
अकोल्यात ३७ हजार हेक्टरचे पंचनामे Panchnama of 37 thousand hectares in Akola
अकोल्यात ३७ हजार हेक्टरचे पंचनामे Panchnama of 37 thousand hectares in Akola

अकोला : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या झालेल्या पिकांचे प्रशासनाकडून पंचनामे करण्यात येत आहेत. सोमवारपर्यंत (ता. २) जिल्ह्यात ३७,३६० हेक्टरचा पंचनामा करण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. कृषी, महसूल, पंचायत अशा तीन विभागांमार्फत पंचनामा केला जात आहे. जिल्ह्यात २१ व २२ जुलैला अतिवृष्टी झाल्याने सुमारे ७५ हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. काही जमीनही खरडली आहे. खरीप हंगामात प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आलेला आहे.  या आपत्तीत शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची मागणी केली जात आहे. प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत यंत्रणांना आदेश दिलेले आहेत. गेल्या आठवड्यापासून कृषी सहायक, तलाठी, ग्रामसेवक व कंपनी प्रतिनिधीच्या उपस्थितीत पंचनामे केले जात आहेत. आतापर्यंत शेती पिकाचे सुमारे ३७ हजार हेक्टरवरील पंचनामे झाले  आहेत. यात प्रामुख्याने अकोला तालुक्यातील ७४५२, बार्शी टाकळी १६३१५, अकोट ४५३४, मूर्तिजापूर १६२, तेल्हारा २८१०, बाळापूर १३३६ आणि पातूर ४७५० हेक्टर, असे ३७,३६० हेक्टरचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. यंत्रणा ३७,५९८ शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचल्या. सध्या यंत्रणा सर्व कामे बाजूला मिशन मोडवर पंचनामे करण्याचे काम करीत आहे. खरडून गेलेल्या हजार हेक्टरचा पंचनामा पुराच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात जमीन खरडली होती. यंत्रणांनी आतापर्यंत ३,१९८ शेतकऱ्यांच्या १,००६ हेक्टरचे पंचनामे पूर्ण केल्याची माहिती आहे. जमीन खरडल्याने त्यावरील पिकेही वाहून गेली. काही ठिकाणे शेतांमध्ये मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. शिवाय काही शेत लागवडी योग्य राहिलेले नाहीत. शेती सुधारणेसाठी शेतकऱ्यांना बरीच मेहनत घ्यावी लागेल. अशा शेतांमध्ये आता खरीप हंगामातील कुठलेही पीक लावणे शक्य नाही.

विमा काढलेल्या ५५५ हेक्टरचा पंचनामा विमा कंपनीकडे ३७ हजारांवर शेतकऱ्यांच्या सूचना आलेल्या आहेत. या सूचनांची माहिती विमा कंपनीकडून जुळवाजुळव केली जात आहे. आलेल्या तक्रारींपैकी १०३१ शेतकऱ्यांच्या ५५५ हेक्टरचा पंचनामा झाला आहे. जिल्ह्यात या हंगामात १ लाख ५२४ शेतकऱ्यांनी १ लाख ५२ हजार हेक्टर क्षेत्राचा विमा काढला आहे. अतिवृष्टीने जे एकूण नुकसान झाले त्यात ४७,२९४ हेक्टर क्षेत्र हे विमा काढलेल्या शेतकऱ्यांचे आहे. एकूणच विमा काढलेल्या क्षेत्रापैकी मोठे क्षेत्र बाधित झालेले असल्याने हे शेतकरी शासकीय मदतीची, विमा कंपनीकडून नुकसान भरपाईची आस लावून बसले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com