Agriculture news in marathiPanchnama of 37 thousand hectares in Akola | Agrowon

अकोल्यात ३७ हजार हेक्टरचे पंचनामे

टीम अॅग्रोवन
बुधवार, 4 ऑगस्ट 2021

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या झालेल्या पिकांचे प्रशासनाकडून पंचनामे करण्यात येत आहेत. सोमवारपर्यंत (ता. २) जिल्ह्यात ३७,३६० हेक्टरचा पंचनामा करण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. कृषी, महसूल, पंचायत अशा तीन विभागांमार्फत पंचनामा केला.

अकोला : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या झालेल्या पिकांचे प्रशासनाकडून पंचनामे करण्यात येत आहेत. सोमवारपर्यंत (ता. २) जिल्ह्यात ३७,३६० हेक्टरचा पंचनामा करण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. कृषी, महसूल, पंचायत अशा तीन विभागांमार्फत पंचनामा केला जात आहे.

जिल्ह्यात २१ व २२ जुलैला अतिवृष्टी झाल्याने सुमारे ७५ हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. काही जमीनही खरडली आहे. खरीप हंगामात प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आलेला आहे. 

या आपत्तीत शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची मागणी केली जात आहे. प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत यंत्रणांना आदेश दिलेले आहेत. गेल्या आठवड्यापासून कृषी सहायक, तलाठी, ग्रामसेवक व कंपनी प्रतिनिधीच्या उपस्थितीत पंचनामे केले जात आहेत. आतापर्यंत शेती पिकाचे सुमारे ३७ हजार हेक्टरवरील पंचनामे झाले 
आहेत.

यात प्रामुख्याने अकोला तालुक्यातील ७४५२, बार्शी टाकळी १६३१५, अकोट ४५३४, मूर्तिजापूर १६२, तेल्हारा २८१०, बाळापूर १३३६ आणि पातूर ४७५० हेक्टर, असे ३७,३६० हेक्टरचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. यंत्रणा ३७,५९८ शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचल्या. सध्या यंत्रणा सर्व कामे बाजूला मिशन मोडवर पंचनामे करण्याचे काम करीत आहे.
खरडून गेलेल्या हजार हेक्टरचा पंचनामा

पुराच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात जमीन खरडली होती. यंत्रणांनी आतापर्यंत ३,१९८ शेतकऱ्यांच्या १,००६ हेक्टरचे पंचनामे पूर्ण केल्याची माहिती आहे. जमीन खरडल्याने त्यावरील पिकेही वाहून गेली. काही ठिकाणे शेतांमध्ये मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. शिवाय काही शेत लागवडी योग्य राहिलेले नाहीत. शेती सुधारणेसाठी शेतकऱ्यांना बरीच मेहनत घ्यावी लागेल. अशा शेतांमध्ये आता खरीप हंगामातील कुठलेही पीक लावणे शक्य नाही.

विमा काढलेल्या ५५५ हेक्टरचा पंचनामा
विमा कंपनीकडे ३७ हजारांवर शेतकऱ्यांच्या सूचना आलेल्या आहेत. या सूचनांची माहिती विमा कंपनीकडून जुळवाजुळव केली जात आहे. आलेल्या तक्रारींपैकी १०३१ शेतकऱ्यांच्या ५५५ हेक्टरचा पंचनामा झाला आहे. जिल्ह्यात या हंगामात १ लाख ५२४ शेतकऱ्यांनी १ लाख ५२ हजार हेक्टर क्षेत्राचा विमा काढला आहे. अतिवृष्टीने जे एकूण नुकसान झाले त्यात ४७,२९४ हेक्टर क्षेत्र हे विमा काढलेल्या शेतकऱ्यांचे आहे. एकूणच विमा काढलेल्या क्षेत्रापैकी मोठे क्षेत्र बाधित झालेले असल्याने हे शेतकरी शासकीय मदतीची, विमा कंपनीकडून नुकसान भरपाईची आस लावून बसले आहेत.


इतर बातम्या
‘अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना  हेक्टरी...परभणी : अतिवृष्टीमुळे जमिनी खरडून गेल्या आहेत....
राज्यात पावसाचा जोर वाढणारपुणे : काहीशा विश्रांतीनंतर राज्यात पावसाला...
ज्वारी पेरली तर खरी,  पण वाचवायची कशी? अकोला : गेल्या काही वर्षांत सातत्याने ज्वारीचे...
‘कृषी’ शिक्षक म्हणून कृषी, संलग्न ...कोल्हापूर : शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश...
द्राक्ष बागायतदार संघाचे आजपासून ६१ वे...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे...
पुरंदरमध्ये लवकरच प्रॉपर्टी कार्ड : ...गराडे, जि. पुणे : स्वामित्व योजना...
आमच्या गावाला ग्रामपंचायत द्या...गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील रवी व मुल्लुरचक या...
मूग, सोयाबीन पिकाला कोंब फुटण्याची...पुणे : राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर...
साखरनिर्यातीचे १८०० कोटींचे अनुदान मंजूरकोल्हापूर : केंद्राने २०२०-२१ या हंगामात निर्यात...
पुणे जिल्ह्यात तुरळक  ठिकाणी हलक्या...पुणे : दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक वातावरण...
एकरकमी एफआरपीसाठी  भारतीय किसान संघाचे...पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त व किफायतशीर...
नगरला कांदा दरात  चढ-उतार सुरूच नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी  कुरुंदवाडमध्ये...कोल्हापूर : महापूर ओसरून दीड महिना झाला असून,...
शिसोदे समितीची आज तातडीची बैठकपुणे ः जलयुक्त शिवार कामांमध्ये झालेल्या कोट्यवधी...
सामाजिक, मानसिक स्वास्थ्यासाठी...पुणे ः ‘‘बदलत्या परिस्थितीत सामाजिक आणि मानसिक...
दोन आठवडे अगोदरच खरीप कांदा बाजारातनाशिक : जिल्ह्यातील चांदवड,देवळा, मालेगाव, येवला...
‘व्हीएसआय’च्या जालना केंद्रासाठी ३० कोटीपुणे ः विदर्भ, मराठवाड्याला मार्गदर्शक ठरणाऱ्या...
अखेर ‘चोसाका’ला मिळाली नवसंजीवनीचोपडा, जि. जळगाव  : ‘‘चोपडा शेतकरी सहकारी...
पूर्व विदर्भात पावसामुळे हाहाकार नागपूर : पूर्व विदर्भातील भंडारा आणि नागपूर...
पोषक आहाराबद्दल जागरूकता महत्त्वाची :...सोलापूर ः ‘‘आपल्या सर्वांसाठी पोषक आहार आवश्यक...