agriculture news in Marathi,permission for one lac ton Onion Import, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

केंद्र सरकारकडून एक लाख टन कांदा आयातीला परवानगी

टीम अॅग्रोवन
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

इराण येथून कांदा आयात होण्याची शक्यता आहे. पुढील ८-१० दिवसांत तो कांदा येईल. मात्र सध्या नाशिकमधील कांदा व्यापाऱ्यांवर पडलेल्या आयकर विभागाच्या धाडींमुळे तेथील बाजार बंद होता, त्यामुळे पुणे बाजारात आवक वाढल्याने दर क्विंटलला १ हजार रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. सोमवारी ६०-६५ रुपयांनी विक्री झालेला कांदा मंगळवारी ४५ रुपयांनी विक्री झाला. मंगळवारी साधारण जुन्या कांद्याची ७० ट्रक आवक होऊनदेखील ३० ट्रक माल शिल्लक आहे. तर नवीन कांद्याची १० ट्रक आवक झाली. मात्र त्याचा दर्जा खालावलेला असल्याने दर मिळत नाही.
- विलास रायकर, कांदा आडतदार, पुणे बाजार समिती 

पुणे: मॉन्सूनचा वाढलेला मुक्काम, अतिवृष्टी, मॉन्सूनोत्तर पावसाचे वाढलेले दिवस आदी कारणांनी कांदा पिकाचे झालेले नुकसान आणि जुन्या कांद्याच्या टंचाईमुळे बाजारातील कांद्याची आवक घटली आहे. परिणामी, कांद्याचे दर वाढण्याची शक्यता लक्षात घेता केंद्र शासनाने एक लाख टन कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. 

केंद्र सरकारचे अर्थ सल्लागार आणि नागरी पुरवठा विभागाचे अधिकारी ए. के. चौधरी यांनी एक लाख टन कांदा आयात करण्याबाबतचे पत्र एमएमटीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक वेद प्रकाश यांना दिले आहे. कांद्याच्या आयातीमुळे शेतकऱ्यांना मिळणारे दर कमी होण्याचा धोका निर्माण झाला असून, याबद्दल शेतकऱ्यांनी आणि शेतकरी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

देशातील कांदा टंचाई लक्षात घेता केंद्राने कांदा आयात सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, महिनाभरात इजिप्त आणि तुर्कस्थान येथून कांदा आयात होणार आहे. या आयात होणाऱ्या कांद्याच्या वितरणाची जबाबदारी नाफेडवर सोपविण्यात आली आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक आणि शेजारील राज्यात झालेल्या अतिवृष्टी, पूरस्थितीमध्ये कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. 

 त्यामुळे कांद्याचे उत्पादन घटले असून, बाजारात सध्या होणारी आवकेमध्येदेखील चांगल्या दर्जाच्या कांद्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे जुन्या कांद्याला मागणी वाढली असून, त्याचे दर पुणे बाजार समितीमध्ये किलोला ६० रुपयांपर्यंत वाढले आहेत. तर नवीन कांद्याचे दर ३० रुपयांपर्यंत आहेत. तर हेच दर किरकोळ बाजारात ८० रुपयांच्या घरात पोचले आहेत. भविष्यात कांद्याच्या दराने शंभरी ओलांडू नये यासाठी केंद्राने आयातीचा निर्णय घेतला आहे. पुढील महिनाभरात टप्प्याटप्पाने कांदा आयात होणार असून, त्याचे वितरण नाफेड मार्फत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
 


इतर अॅग्रो विशेष
भांडवली शेतीचा विळखा बघता बघता हरितक्रांतीला पन्नास वर्षे झाली. तसे,...
पशुखाद्य : नियोजन अन् नियंत्रणमहाराष्ट्रात २०१२ च्या दुष्काळापासून दुग्ध...
मराठवाड्यात साडेदहा हजार एकरांवर तुतीऔरंगाबाद : मराठवाड्यात यंदा ३० नोव्हेंबर...
विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सहा दिवस...मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या...
विठ्ठल मंदिरात मोबाईल बंदीपंढरपूर, जि. सोलापूर ः श्री विठ्ठल मंदिराच्या...
धानासाठी क्विंटलला पाचशे रुपये अनुदानमुंबई: राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा...
‘पीजीआर’ला मान्यतेचा मार्ग मोकळापुणे ः देशभरात शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या बिगर...
इथेनॉलसाठी मान्यता; पण प्रकल्पांसाठी...पुणे  : थेट साखरेपासून इथेनॉल तयार करण्यास...
उत्कृष्ट व्यवस्थापनातून पपईत मिळवली ओळखनंदुरबार जिल्ह्यात धमडाई येथील सुभाष व प्रनील या...
उद्या तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे ः बंगाल उपसागराच्या आग्नेय भागात कमी दाबाचे...
परिश्रमपूर्वक व्यवस्थापनातून...पुणे जिल्ह्यातील रिहे येथील सुनील शिंदे...
किरकोळ व्यापाऱ्यांकरिता कांदासाठा...मुंबई ः देशात कांद्याचे उत्पादन घटल्याने...
सर्वाधिक दर मोजक्याच कांद्यालानगर ः वाढलेल्या कांदादराचा गेल्या महिनाभरापासून...
पशुखाद्य दर गगणाला भिडलेसांगली ः दुष्काळ व अतिवृष्टीचा फटका पशुखाद्य...
शेवंतीचे तीन वाण लवकरच पुणेः शेतकऱ्यांना शेवंतीच्या पांरपरिक वाणांना...
उत्तर प्रदेशात ‘एसएपी’त बदल नाहीनवी दिल्ली: उत्तर प्रदेश सरकारने सलग दुसऱ्या...
उसाचे ३८ गुंठ्यांत तब्बल १४७ टन उत्पादनकोल्हापूर जिल्ह्यातील कवठेगुलंद (ता. शिरोळ) येथील...
कमी कालावधीचा दोडका देतोय चांगला नफागेल्या दोन, तीन महिन्यांत झालेल्या पावसामुळे पुणे...
तापमानात चढ-उतारपुणे ः अरबी समुद्राच्या आग्नेय भागात असलेले कमी...
जीवघेणा बाजारदेशात बोगस, भेसळयुक्त, अनधिकृत कीडनाशकांचा वापर...