agriculture news in Marathi,pink bowl army worm on cotton in Akola District, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

अकोला जिल्ह्यात कपाशीवर बोंड अळी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

अकोला ः परतीच्या पावसाने कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणावर आधीच नुकसान झाले आहे. त्यातून सावरलेल्या कपाशीवर फुले, पात्या, बोंडे लागत आहेत. मात्र, यावरही गुलाबी बोंड अळी येण्याची दाट शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर गेल्या आठवड्यात घेतलेल्या निरीक्षणात कामगंध सापळ्यांमध्ये पतंग दिसून आले आहेत. तर पातूर तालुक्यात कापसावर १० टक्क्यांवर या अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. 

अकोला ः परतीच्या पावसाने कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणावर आधीच नुकसान झाले आहे. त्यातून सावरलेल्या कपाशीवर फुले, पात्या, बोंडे लागत आहेत. मात्र, यावरही गुलाबी बोंड अळी येण्याची दाट शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर गेल्या आठवड्यात घेतलेल्या निरीक्षणात कामगंध सापळ्यांमध्ये पतंग दिसून आले आहेत. तर पातूर तालुक्यात कापसावर १० टक्क्यांवर या अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. 

गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव सप्टेंबरच्या शेवटच्या तसेच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सरासरी २९ ते ३३ सेल्सिअस तापमान असताना आढळून येतो. परंतु, या वर्षी पावसाचा हंगाम वाढल्याने व बोंड अळीस पोषक वातावरण सध्या असल्याने या अळीचे पतंग जमिनीत असलेल्या कोषावस्थेतून बाहेर निघाले. ही परिस्थिती सर्वत्र असल्याची शक्यता आहे. कोषातून बाहेर निघालेले पतंग मिलन होऊन अंडी घातल्यानंतर ८ ते १० दिवसांनी त्यांचा प्रादुर्भाव ज्या कपाशीला हिरवी बोंडे व पात्या आहेत त्या ठिकाणी दिसून येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी म्हटले आहे. 

पंदेकृविच्या तज्ज्ञांनी सुचविलेले उपाय
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. डी. बी. उंदीरवाडे यांनी या अळीच्या नियंत्रणासाठी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांनी त्वरिक किमान एकरी दोन फेरोमोन सापळे लावून सतत तीन दिवस सात ते आठ पतंग आढळल्यास ५ टक्के निंबोळी अर्क किंवा अॅझाडिरेक्टीन (१५०० पीपीएम) २५ मिलि प्रति १० लिटर पाण्यामधून फवारावे. बोंड, पात्या, फुलांमध्ये प्रादुर्भाव ५ ते १० टक्के आढळून आल्यास इंडोक्झाकार्ब (१५.८ टक्के प्रवाही) १० मिलि किंवा क्विनॉलफॉस (२५ टक्के) २५ मिलि किंवा क्लोरपायरीफॉस (२० टक्के) २५ मिलि प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव १० टक्क्यांपेक्षा अधिक असल्यास इमामेक्टीन बेंझोएट (५ टक्के दाणेदार) ४ ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस (४० टक्के) + सायपरमेथ्रीन (४ टक्के) २० मिलि प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. फवारणीच्या या मात्रा नॅपसॅक पंपासाठीच्या आहेत. डिसेंबर २०१९ नंतर कापूस पीक पूर्णतः काढून फरदड घेण्याचा मोह टाळावा, असेही डॉ. उंदीरवाडे यांनी म्हटले आहे.


इतर अॅग्रो विशेष
राज्यात दोन लाख क्‍विंटल कापूस खरेदीअमरावती ः खासगी बाजारात कापसाला कमी दर मिळत...
राज्यातील दूध संकलन ३० लाख लिटरने घटलेसोलापूर ः ओल्या दुष्काळामुळे ओढवलेल्या आपत्तीने...
मातीची धूप थांबविण्यासाठी जागरूक रहा :...परभणी ः शेतीसाठी माती हा सर्वांत महत्त्वाचा घटक...
पणज गावाने आणली केळी पिकातून सुबत्ताअकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात पणज हे छोटे गाव...
संगेवाडीच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्याला...सोलापूर  : दोन महिन्यांपुर्वी झालेल्या...
माणुसकीलाच काळिमापशुवैद्यकीय महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची...
श्रमसधन उद्योग उभारणीवर हवा भरआजच्या घडीला सरकार कृषी संशोधन आणि विकास...
रोपवाटिका व्यवसायाने दिला सक्षम आधारदहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर नोकरी न मिळाल्याने...
मराठवाड्यात नऊ लाख हेक्‍टरवर रब्बी पेरणीलातूर : अतिपावसाने खरीप पिके हातची गेलेल्या...
औरंगाबादच्या मोसंबी कलमांची मध्य...महाराष्ट्रातील अत्यंत गोड, रसाळ मोसंबीने आता मध्य...
बी-हेव्ही मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीस...सोलापूर : साखरेचे अतिरिक्‍त उत्पादन टाळून इंधन...
कृत्रिम रेतन व्यवसाय येणार कायद्याच्या...पुणे : राज्यातील गाय-म्हशींच्या कृत्रिम रेतनाचा...
हलक्या पावसामुळे वाढली धास्तीपुणे  ः अरबी समुद्राच्या दक्षिण भागात सक्रिय...
दोन-तीन दिवसात किमान तापमानात होणार घट...पुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कोकण, पश्चिम...
भंडारा : दूध संघांचे १८ कोटींचे चुकारे...भंडारा ः जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघाने...
डिसेंबर ते फेब्रुवारीत अशी असेल थंडी;...नवी दिल्ली ः डिसेंबर ते फेब्रुवारी या हंगामात...
मिश्रखतांसाठी विनापरवानगी कच्चा माल...पुणे : राज्यात गेले दीड वर्ष मिश्र खतांसाठी कच्चा...
शरीराचा एक पाय अपघाताने गेला असला,...कोल्हापूर ः नियतीने शरीर अपंग केले... पण मनाची...
कपाशीचा झाला झाडा, शेतात नुसत्या पऱ्हाटीनांदेड :  नांदेड, परभणी, हिंगोली...
शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी...मुंबई  ः संकटातील शेतकऱ्यांना सरसकट व...