agriculture news in marathi,pomegranate orchard become in trouble due to rain, jalna, maharashtra | Agrowon

पावसाने जालन्यातील डाळिंब बागांना फटका

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

जालना  : केवळ जालनाच नव्हे तर संपूर्ण राज्यातील डाळिंब उत्पादकांना ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. फूलगळ, फळगळ, फळकूज, फळ तडकण्याच्या समस्येत वाढ झाली आहे. अति पावसामुळे डाळिंब उत्पादकांचे झालेले नुकसान पाहता या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून डाळिंब उत्पादकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संघाने केली आहे. 

जालना  : केवळ जालनाच नव्हे तर संपूर्ण राज्यातील डाळिंब उत्पादकांना ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. फूलगळ, फळगळ, फळकूज, फळ तडकण्याच्या समस्येत वाढ झाली आहे. अति पावसामुळे डाळिंब उत्पादकांचे झालेले नुकसान पाहता या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून डाळिंब उत्पादकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संघाने केली आहे. 

या संदर्भात जालन्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांना शनिवारी (ता. २) निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे, की राज्यात यापूर्वी दुष्काळ होता. डाळिंब बागांना पाणी न मिळाल्याने काही बागा वाळून गेल्या. त्याचे पंचनामे अद्याप झालेले नाही. हे संकट संपते न संपते तोच ऑक्‍टोबर महिन्यात अतिपावसाने डाळिंब बागांची मोठी हानी झाली. जवळपास ७५ टक्‍के डाळिंब पिकाचे नुकसान झाले आहे. या पावसामुळे डाळिंब बागांचा ताण मोडला. त्यामुळे छाटणीची समस्या निर्माण झाली. ज्या ठिकाणी छाटणी झाली तेथे फूलगळ मोठ्या प्रमाणात होते आहे. ज्या ठिकाणी फळ आले तेथे फळकूज, फळ तडकण्याची समस्या वाढली आहे. पावसामुळे फळावर तेलकट डाग रोगाचे प्रमाणही वाढले आहे.

नाशिक, परभणी, लातूर, बीड, जालना, अकोला, औरंगाबाद, सांगली, सातारा, नगर, पूणे, सोलापूर, जळगाव, धुळे आदी जिल्ह्यांत डळिंब पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. डाळिंब उत्पादकांचे झालेले नुकसान पाहता नुकसानीचे पंचनामे तत्काळ व्हावे, त्यांची कर्जमाफी व्हावी, त्यांना नुकसानभरपाई मिळावी व तशा सूचना सबंधितांना देऊन अंमलबजावणी करण्याची मागणी अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक, संशोधन संघाने केली आहे. 


इतर ताज्या घडामोडी
पुणे जिल्हा परिषदेचा ‘एक पुस्तक' पॅटर्न...पुणे : विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी...
लातूर, उस्मानाबादमध्ये २० तूर खरेदी...लातूर : लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात हमी...
शेती करताना जैवविविधता जोपासणे आवश्यक...नाशिक : वाढत्या लोकसंख्येचा भार कृषी क्षेत्रावरही...
अकोला : तूर विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणीत...अकोला  ः शासनाकडून हमी भावाने तूर खरेदीसाठी...
भंडारा : शेतकरी किसान सन्मानच्या...भंडारा ः पंतप्रधान किसान सन्मान योजनेला वर्षभराचा...
कवठेमहांकाळ तालुक्यात पाणीसाठ्यात वाढसांगली  ः कवठेमहांकाळ तालुक्यात ऑक्टोबर...
खानदेशात कांदा लागवड सुरूचजळगाव ः खानदेशात कांदा लागवड सुरूच असून, सुमारे...
असे करा घाटेअळीचे जैविक व्यवस्थापनघाटेअळी नियंत्रणासाठी सातत्याने रासायनिक...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ४३ हजार...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सांगोल्यात डाळिंब व्यापाऱ्याला पुन्हा...सांगोला, जि. सोलापूर : सांगोल्यातील एका...
विजेबाबतच्या समस्या निकाली काढा : डॉ....बुलडाणा  : विजेच्या बाबत नागरिकांना अनेक...
चाळीसगाव : किसान सन्मानच्या लाभापासून...चाळीसगाव, जि. जळगाव ः शासनाकडून राबविण्यात...
जिल्हा परिषदांचे तलाव मासेमारीसाठी खुले...मुंबई : राज्यातील ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा...
खानदेशात तूर नोंदणीला प्रतिसादजळगाव  ः जिल्ह्यात तूर नोंदणीसंबंधी १०...
नागपूर जिल्ह्यात रब्बीच्या क्षेत्रात...नागपूर : मॉन्सूनोत्तर पावसाने खरीप पिकाचे चांगलेच...
मागासवर्गीयांपर्यंत फडणवीस सरकारच्या...मुंबई: राज्यात गत सरकारच्या कार्यकाळात...
सिंचन प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी निधी...मुंबई : जलसंपदा विभागाचे प्रलंबित प्रकल्प पूर्ण...
औरंगाबादेत पाणीप्रश्‍नावर भाजपचे उद्या...औरंगाबाद : नेहमी दुष्काळाशी सामना करणाऱ्या...
कापूस दर ५१०० वर स्थिर, खेडा खरेदी वाढलीजळगाव  ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
पलटी नांगर योजनेसाठीचा निधी अपुरा जळगाव  ः जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे...