agriculture news in Marathi,pre-monsoon grapes belt form Nashik District Devastated by rain, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

नाशिक जिल्ह्यातील पूर्वहंगामी द्राक्ष पट्टा पावसामुळे उद्ध्वस्त (video सुद्धा)

मुकुंद पिंगळे
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

नाशिक : चालू वर्षी दुष्काळात पाणीटंचाई असताना पाणी विकत घेऊन बागा जगविल्या. पोटाला चिमटा घेत दोन पैसे बाजूला ठेवत भांडवल उभे केले, तर अनेकांनी बँकांत खेटे घालत कर्ज घेऊन हंगाम उभा केला. मात्र पावसाच्या तडाख्यात कसमादे पट्ट्यातील द्राक्षबागा सापडल्या आणि शेतकऱ्यांचे अर्थकारणच कोलमडले. द्राक्ष मण्यांना गेलेल्या तड्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या स्वप्नाला तडे गेले आहेत. पूर्वहंगामी द्राक्ष पट्टा निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि पावसामुळे उद्ध्वस्त झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

नाशिक : चालू वर्षी दुष्काळात पाणीटंचाई असताना पाणी विकत घेऊन बागा जगविल्या. पोटाला चिमटा घेत दोन पैसे बाजूला ठेवत भांडवल उभे केले, तर अनेकांनी बँकांत खेटे घालत कर्ज घेऊन हंगाम उभा केला. मात्र पावसाच्या तडाख्यात कसमादे पट्ट्यातील द्राक्षबागा सापडल्या आणि शेतकऱ्यांचे अर्थकारणच कोलमडले. द्राक्ष मण्यांना गेलेल्या तड्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या स्वप्नाला तडे गेले आहेत. पूर्वहंगामी द्राक्ष पट्टा निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि पावसामुळे उद्ध्वस्त झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

जुलैच्या सुरुवातीला गोडी छाटणी केल्यानंतर सप्टेंबरच्या अखेरीस फक्त १० दिवस ऊन पडले. कायम ढगाळ वातावरण असल्याने नैसर्गिक बदलांचा गंभीर परिणाम बागांवर झाला. १०० दिवसांचा माल तयार झाल्यानंतर ऑक्टोबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे द्राक्ष मण्यांना तडे जाण्यास सुरुवात झाली. पडणारे धुके व हवामानातील वाढलेली आर्द्रता यामुळे द्राक्षांचे मणी जागेवरच खराब झाले. त्यामुळे सर्वच बागांमधील घड कुजले. सातत्याने ढगाळ वातावरण राहिल्याने नुकसानीची पातळी वाढत गेल्याचे येथील शेतकऱ्यांनी घेतलेले उत्पादन संपूर्णपणे मातीमोल झाले आहे.

डोळ्यात पाणी आणणारे द्राक्षांचे नुकसान पहा video

बागांमध्ये सर्वत्र दुर्गंधी
चालू वर्षी प्रतिकूल परिस्थितीत द्राक्ष उत्पादन घेण्यासाठी एकरी तीन लाख रुपये खर्चही झाला. मात्र डोळ्यासमोर तयार झालेला, द्राक्षांचे घड समालाची सड झाली. त्यामुळे आता बागेच्या जवळ जाताच दुर्गंधी वाढली आहे. द्राक्ष बागेजवळ गेल्यावर सडलेले घड निदर्शनास येतात. संपूर्ण बागांमध्ये आंबट वास व दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती शेतकऱ्यांनी बोलून दाखविली.

द्राक्ष उत्पादक हवालदिल 
मागील वर्षी दुष्काळ असल्याने अनेकांचे भांडवल बागा जगविण्यासाठी पाणी विकत घेण्यात खर्ची झाले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी बँकेचे नवे जुने प्रकरण करून बँकाचे अर्थसाहाय्य घेतले. अनेकांनी सोने नाणे गहन ठेवून तर कोणी उसनवारी करून बागा उभ्या केल्या. अनेकांनी मोठी मोठी कर्जे घेतली आहेत. अनेकांनी उधारीवर नियमितप्रमाणे लाखो रुपयांच्या कृषी निविष्ठा केल्या. मात्र आता हा उद्योग आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडणार आहे. कसमादे पट्ट्यात जवळपास ५ हजार एकर क्षेत्रावर द्राक्षबागा आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे जवळपास ५०० कोटींचे नुकसान झाल्याचे येथील प्रगतिशील द्राक्ष बागायतदार सांगतात. नुकसानीसोबत वादळामुळे अनेक बागांचे मांडव जमीनदोस्त होत आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल होऊन एकमेकांना आधार देत आहेत.

द्राक्ष बागांचे १०० टक्के नुकसान 
२००९ साली फयान वादळ आले. त्या वेळी काढणीस आलेल्या मालाला तडे गेल्याने माल खराब झाला. मात्र निम्म्या मालाची प्रतवारी विक्रीयोग्य होती. जो विकला गेला नाही त्यावर बेदाण्यासाठी प्रक्रिया झाली. मात्र आता माल संपूर्ण कुज होऊन सडला आहे. त्यामुळे कुठलीही प्रक्रिया यावर करता येणे शक्य नाही. दोन पैसे झाले अन पुन्हा उभे राहता आले, आता मात्र सगळच हातचे गेल्याने मोठे आर्थिक संकट द्राक्ष उत्पादकांवर ओढवले आहे.

द्राक्षावरील रोजगार संपुष्टात
द्राक्ष काढणी हंगामात आदिवासी पाड्यावरील कामगारांना दोन ते तीन महिने शाश्वत मोठा रोजगार मिळतो. मात्र या नुकसानीमुळे माल खराब झाल्याने अर्थकारण ठप्प झाले आहे. शहराच्या ठिकाणी कापड बाजार, किराणा दुकानांमध्ये गर्दी मंदावली आहे. कृषी निविष्ठा केंद्रातील गर्दीही ओसरल्याचे बाजारात पाहायला मिळते.

द्राक्ष निर्यात होणार नसल्याची खंत 
जागतिक बाजारपेठेत ‘बागलाण’ हा द्राक्ष उत्पादन घेणारा देश आहे का? अशी आयातदारांकडून विचारणा होते. आमच्या द्राक्षाची जगभरात वेगळी ओळख आहे. मात्र या वर्षी जागतिक बाजारपेठेत आमचे सटाणा मागे पडणार असल्याची खंत येथील तरुण द्राक्ष उत्पादक संदीप भामरे यांनी व्यक्त केली. जगभरातून पहिली द्राक्ष निर्यात होऊन परकीय चलन मिळवून देण्यात या भागाचा व द्राक्ष पिकाचा मोठा वाटा आहे. मात्र चालू वर्षी येणारे उत्पादन १०० % घटणार आहे. त्यामुळे प्रयोगशील द्राक्ष उत्पादकांच्या पट्ट्यात निसर्गाचा कोप झाल्याची भावना येथील द्राक्ष उत्पादक अरुण भामरे यांनी बोलून दाखवली. 

दिवाळीची रौनकच गेली
दिवाळीसारखा आनंदाचा सन आला अन् गेला. मात्र कुठलीही रोषणाई, फटक्याची आतषबाजी या भागात झाली नाही. लहान मुलांपासून तर ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकासाठी ही दिवाळी दुखःची होती. त्यामुळे अनेकांनी तर गोडधोड, फराळसुद्धा केला नाही. ज्यांनी केला तर त्यांची चव त्यांच्यासाठीही दिवाळी कडूच राहिली आहे. त्यामुळे ऐन सणासुदीत या भागात रौनक दिसली नाही.

नुकसानीची सध्याची स्थिती 

  •  तयार द्राक्षाच्या घडांना तडे जाऊन घडांची कुज.
  •  बुरशीचा प्रादुर्भाव वाढल्याने घडांची पूर्णपणे सड होत आहे.
  •  १०० % द्राक्षबागांचे नुकसान.
  •  सततच्या पावसामुळे बागेत चिखल असल्याने कामात अडचणी.

तालुकानिहाय गावांमधील नुकसान

  • सटाणा : पिंगळवाडे, दसाने, भुयाने, करंजाड, आसखेडा, जायखेडा, गोराणे, पारनेर, डोंगरेज, वायगाव, बिजोटे, कोड्बेल, तळवाडे, द्याने, श्रीपूरपाडे, ब्राह्मणगाव  
  • मालेगाव  : सातमाने, येसगाव
  • देवळा  : वाजगाव
  • कळवण : ककानी, खेडगाव , खामखेडा आदी 
     

इतर अॅग्रो विशेष
हवामानबदलाशी लढण्यासाठी एक हजार कोटी...पुणे ः जागतिक हवामानबदलाची समस्या संपूर्ण जगासमोर...
राज्यात उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : राज्यात कमाल तापमानात मोठी वाढ झाल्याने...
कापसाचे ६४७ कोटींचे चुकारे थकीतअमरावती ः बाजारात दर कोसळल्याने महाराष्ट्र राज्य...
‘पणन’ची कापूस खरेदी उच्चांकी दिशेनेऔरंगाबाद : महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन...
शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीत ८५ स्वराज्यरथ...पुणे : ‘‘पुण्यात शिवजयंती महोत्सव समितीतर्फे आज...
सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षकाची...औरंगाबाद शहरापासून सुमारे बारा किलोमीटरवर...
कापूस उद्योगाचे चीनमध्ये पाच हजार कोटी...जळगाव ः देशातील सूत व कापूस गाठींचा मोठा खरेदीदार...
हमीदराने खरेदीसाठी तुरीचे संपूर्ण...वाशीम ः तुरीचे स्वतंत्रपणे पीक घेण्याची पद्धत...
पंधरा लाख कापूस गाठींची खानदेशातील...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
शेतीमाल निर्यातवाढीसाठी सुकाणू समितीची...पुणे : राज्य सरकारने स्वतंत्र कृषी निर्यात धोरण...
बियाणे परवान्यासाठी केंद्रीय पद्धती...नवी दिल्ली: केंद्र सरकार सुधारित बियाणे विधेयक...
शिवनेरीवर उद्या शिवजयंती सोहळापुणे: छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या ३९० व्या...
चीनला होणाऱ्या कोळंबी निर्यातीला फटकानवी दिल्ली: चीनमध्ये कोरोना विषाणूने थैमान...
कापूस, मक्यावरील अळी नियंत्रणाचे काम...अकोला ः नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कापूस,...
किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाजपुणे : राज्यात कमाल व किमान तापमानात सातत्याने...
'सोया’ पदार्थांना मिळवली ग्राहकांकडून...अमरावती जिल्ह्यातील दुर्गम अंजनसिंगी (ता. धामणगाव...
दर्जेदार फरसबीचे वर्षभर उत्पादनकमी कालावधीतील पिके वर्षभर टप्प्याटप्प्याने...
‘कीडनाशके कायदा’ हवा स्पष्ट शेतकऱ्यांना बनावट कीडनाशके विक्रेत्यांपासून...
राष्ट्रीय मुद्द्यांचा भाजपपुढे गुंतादिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या...
‘कोरोना’च्या अफवेमुळे पोल्‍ट्री...पुणे ः चीनमधील कोरोना विषाणूने जगभरात भीतीचे...