agriculture news in Marathi,premium of 350 farmers not given to crop insurance company, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

विमा कंपनीकडे ३५० शेतकऱ्यांचा हप्ता दिलाच नाही

टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

मी साडे सहा एकर क्षेत्राचा २०१८ च्या खरीप हंगामात पातुर्डा येथील सीएससी केंद्रावर नगदी स्वरूपात पीकविमा भरणा केला. केंद्रचालकाने पावती दिल्याने भरणा झाला असे वाटले. परंतु, भरपाईमध्ये माझ्यासह बरेच शेतकऱ्यांची नावे आलेली नाहीत. म्हणून आम्ही सदर केंद्र चालकाला विचारणा करण्यासाठी गेलो असता त्या केंद्रचालकाने योग्य माहिती दिली नाही. यात संशय आल्याने आम्ही कृषी अधिकारी, विमा कंपनी प्रतिनिधी यांच्याकडे चौकशी केली. त्यात आम्ही केंद्र चालकाला पैसे देऊनही कंपनी कडे आमचे पैसे जमा झाले नसल्याचे उघड झाले. आता काय करावे हे सुचत नाही. पोलिसांत याबाबत तक्रार केली आहे. प्रशासनाने न्याय द्यावा ही अपेक्षा आहे.
- नीलेश डिगाबर इंगळे,  शेतकरी टाकळी पंच ता. संग्रामपूर जि. बुलडाणा

संग्रामपूर, जि. बुलडाणा ः तालुक्यातील टाकळी पंच येथील सुमारे ३५७ शेतकऱ्यांनी गेल्या हंगामात काढलेला पीकविमा, सीएससी केंद्र चालकाने प्रिमियम कंपनीकडे जमा न केल्याने भेटलाच नसल्याची बाब उघडकीस आली आहे. याच तालुक्यातील पातुर्डा येथील हे सीएससी केंद्र असून शेतकरी व शेतकरी संघटनेने पोलिसांत फिर्याद देत कारवाईची तसेच नुकसानभरपाईची मागणी केली आहे. 

सन २०१८ च्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीकविमा योजनेत पिकांचा विमा काढला होता. मात्र, त्यांना अद्यापही मदत न मिळाल्याने त्यांनी चौकशी सुरू केली असता त्यांना आपण भरलेला प्रिमियम विमा कंपनीकडे पोचलाच नसल्याचे समजले. या प्रकरणात सीएससी केंद्रचालकांनी शेतकऱ्यांकडून घेतलेली विम्याची रक्कम कंपनीकडे भरलेली नाही. ही रक्कम लाखो रुपयांची असून त्याचा स्पष्ट आकडा समोर आलेला नाही.  

शेतकरी विमा भरला त्या वेळी त्यांना दिलेली पावतीसुद्धा ही बनावट असल्याची शंका घेतली जात आहे. या भागात हजारो शेतकरी २०१८ च्या हंगामात पीकविमा काढूनही भरपाईपासून वंचित राहलेले आहेत. टाकळी पंच या एकाच गावातील शेतकऱ्यांची संख्या साडेतीनशेपेक्षा अधिक आहे. प्रशासनाने वेळीच लक्ष घालून या सीएससी संचालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रमेश बाणाईत यांनी केली आहे.

प्रतिक्रिया
संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील संबंधित केंद्र चालकाने शेतकऱ्यांना पीकविमा भरणा झाल्याची पावती बनावट तर दिली नाही ना याची चौकशी होणे गरजेचे आहे. कारण, ज्यांना विमा कंपनीकडून नुकसानभरपाई मिळाली त्या पावतीमध्ये आणि वंचित असलेल्या या शेतकऱ्यांजवळील पावतीमध्ये बरीच तफावत दिसत आहे. सदर वेबसाइटवर छेडसाड करून अशा बनावट पावत्या  बनविल्या असाव्यात अशी शंका आहे. त्यामुळे सायबर गुन्ह्याच्या दृष्टीने तपास करणे गरजेचे झालेले आहे.          
- रमेश बाणाईत, जिल्हा अध्यक्ष शेतकरी संघटना


इतर अॅग्रो विशेष
राष्ट्रीय मुद्द्यांचा भाजपपुढे गुंतादिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या...
‘कोरोना’च्या अफवेमुळे पोल्‍ट्री...पुणे ः चीनमधील कोरोना विषाणूने जगभरात भीतीचे...
मांसाहारामुळे ‘कोरोना’ अशी अफवा...नागपूर: मांसाहार कोरोना व्हायरसला कारणीभूत...
शेतकऱ्यांचे ‘नाइट लाइफ’ कधी संपेल रे भौ...पुसद, जि. यवतमाळ : ग्रामीण भागात शेतीचे प्रश्‍न...
उन्हाचा चटका कायम राहणारपुणे : निरभ्र आकाशामुळे उन्हाचा ताप वाढून...
संशोधन शेतात पोचले तरच शेतकऱ्यांचा...दापोली, जि. रत्नागिरी ः विद्यापीठांमध्ये चांगल्या...
तुरीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची पाठनागपूर ः खरेदीनंतर चुकाऱ्यास होणारा विलंब आणि...
‘ठिबक’च्या प्रस्तावासाठी २०...सोलापूर : या वर्षी ठिबक सिंचन केलेल्या...
जोतिबाच्या खेट्यास प्रारंभ, हजारो भाविक...जोतिबा डोंगर, जि. कोल्हापूर: जोतिबाच्या खेट्यास...
आर्थिक निर्णयांनी वाढवला प्रियंकाताईंचा...पती गौरव काकडे यांच्या आग्रहावरून पुणे शहरातील...
नियमित कर्जदारांच्या पदरी निराशाचसांगली ः शासनाच्या कर्जमाफीच्या आदेशात अल्प...
शेतकरीच सरकारचा केंद्रबिंदूः उद्धव ठाकरेजळगाव : कर्जमाफी देणे, हा शेतकऱ्यांच्या...
सिंधुदुर्ग जिल्हा कृषी विभागात १०७ पदे...सिंधुदुर्ग: जिल्हा कृषी विभागातील ३६५ पदांपैकी...
अतिवृष्टी, पूरग्रस्तांच्या कर्जमाफीसाठी...मुंबई ः राज्यात जुलै ते ऑगस्ट २०१९ या काळात...
बॅंकांच्या कृषी पतपुरवठ्यावर सरकारचे...नवी दिल्लीः बॅंकांकडून ग्रामीण भागात होणाऱ्या...
चंदनाची सात-बारा उताऱ्यावर नोंद घ्या:...नगर ः शेतकऱ्यांना शेतात चंदन लागवड करण्यास...
खानदेशात कोरड्या चाऱ्याची टंचाईजळगाव  ः खानदेशात चाऱ्याची मोठी टंचाई दिसत...
तंत्रज्ञान, सहकार, बॅंकिंग क्षेत्रात...जर्मनी हा युरोपातील प्रगत देश. तंत्रज्ञान आणि...
जमिनीची सुपीकता जपत पीक उत्पादनात...नाशिक जिल्ह्यातील कारसूळ (ता. निफाड) येथील संकिता...
उन्हाचा चटका, उकाडाही वाढलापुणे : राज्याच्या किमान तापमानात वाढ झाल्याने...