शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांसमोर समस्यांचा डोंगर कायम

शेतकरी आत्महत्या
शेतकरी आत्महत्या

अकोला ः घरातील कर्ता पुरुष गेल्यानंतर अनेक कुटुंब उघड्यावर पडले आहेत. कर्जाच्या परतफेडीचा प्रश्‍न आ वासून उभा आहे. मुलांना शिकण्याची इच्छा आहे मात्र, खर्च झेपावत नसल्याने त्यांना कुठे पाठवणार? राहायला घर नाही म्हणून दुसऱ्यांकडे आश्रय घ्यावा लागला....अशा व्यथा आहेत जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या. जिल्हा प्रशासनाने या कुटुंबांना प्रत्यक्ष भेटी देऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि आता या कुटुंबाला मदत करण्यासाठी सुक्ष्म नियोजन केले जाणार आहे. अकोला जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी कर्जापायी आणि नापिकीसोबतच कुटुंबाचा प्रपंच चालविण्याचा यक्ष प्रश्‍न असल्याने जीवनयात्रा संपविली आहे. त्यांच्या माघारी त्यांचे कुटुंब कसे जीवन जगत आहेत, हे जवळून अनुभवण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केला. त्यांनी जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना प्रत्यक्ष भेटी देण्याचा कार्यक्रम आखला. अधिनस्त अधिकाऱ्यांना या कुटुंबाच्या समस्या जाणून घेण्यासाठी पाठविले. त्यातून पुढे आलेल्या व्यथा व जगण्याचा संघर्ष मन सुन्न करणारा होता. पडक्या झोपडीत कसेबसे मुलांसोबत दिवस काढत भविष्यातील चांगल्या दिवसांची आशा बाळगून असलेल्या या कुटुंबांना त्यांच्या जीवन संघर्षात साथ देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. या कुटुंबांच्या घेतल्या भेटी! कान्हेरी गवळी येथील लक्ष्मीबाई भीमराव टकले, सायवणी येथील वर्षा संतोष ताले, सांगळूद येथील सीमा संदीप सिरसाट, सुकळी येथील गीता कैलास माळी, सिरसा येथील ज्योती सुधीर मेहरे, हिंगणी येथील जयश्री गोपाल चाकोते, दहिहांडा येथील मंगला प्रल्हाद रौराळे, राजनखेड येथील दर्शना सुरेश राठोड, म्हातोडी येथील चंदा अनिल भांडे, विझोरा येथील शुभांगी राजेश गवई आदी कुटुंबाला वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्यात. भेटीत काय आढळले

  • आत्‍महत्याग्रस्त कुटुंबाला अर्थसाह्य मिळाले नाही.
  • मुलांच्या शिक्षणासाठीची सोय नाही.
  • कर्जाची परतफेड करण्याची व्यवस्था नाही.
  • राहण्यासाठी घर नाही.
  • आरोग्य सुविधा मिळत नाही.
  • घरकुल, शौचालय योजनेच्या यादीत नाव असूनही लाभ मिळालेला नाही.
  • शेती शिवाय उत्पन्नाचे स्रोत नाही.
  • स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याची इच्छा असून, मुलांसाठी कुठलीही सुविधा नाही, आर्थिक परिस्थिती नाही.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com