agriculture news in Marathi,Procession of buffaloes in Kolhapur, Maharashtra | Agrowon

कोल्हापुरात हलगीच्या तालावर म्हशींची मिरवणूक

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

कोल्हापूर: शिंगाला मोरपिसे, गळ्यात फुलांच्या व कवड्याच्या माळा, पायात चांदीचे तोडे, अंगावर विविध रंगाचे ठसे व पुढे हलगी ढोल ताशा याचा कडकडाट असा थाट काल कोल्हापूर शहर व परिसरातील म्हशींनी अनुभवला. निमित्त होते दीपावली पाडव्याचे. या दिवशी कोल्हापूर परिसरातील सर्व दूध व्यावसायिक एकत्र येतात, आपल्या म्हशींना सजवतात त्यांची मिरवणूक काढतात. व त्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. सोमवारी (ता. २८) सायंकाळी शनिवार पेठेतील गवळी गल्लीत हा आगळावेगळा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. 

कोल्हापूर: शिंगाला मोरपिसे, गळ्यात फुलांच्या व कवड्याच्या माळा, पायात चांदीचे तोडे, अंगावर विविध रंगाचे ठसे व पुढे हलगी ढोल ताशा याचा कडकडाट असा थाट काल कोल्हापूर शहर व परिसरातील म्हशींनी अनुभवला. निमित्त होते दीपावली पाडव्याचे. या दिवशी कोल्हापूर परिसरातील सर्व दूध व्यावसायिक एकत्र येतात, आपल्या म्हशींना सजवतात त्यांची मिरवणूक काढतात. व त्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. सोमवारी (ता. २८) सायंकाळी शनिवार पेठेतील गवळी गल्लीत हा आगळावेगळा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. 

कोल्हापूर शहरात आजही चार ते पाच हजार कुटुंबांत म्हशींचे पालन करून दूध दुभत्याचा व्यवसाय करतात. किंबहुना हेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन आहे. या निमित्ताने त्यांनी कोल्हापुरातील धारोष्ण दूध व दूध कट्ट्याची परंपराही जपली आहे. दरवर्षी दीपावली पाडव्याच्या निमित्ताने हे सर्व दूध व्यावसायिक गवळी गल्लीत एकत्रित येतात व सामूहिकरीत्या हा सोहळा साजरा करतात. सायंकाळी चार वाजल्यापासून या सोहळ्याला सुरवात झाली. मोरपिसे कवड्याच्या माळा झेंडूच्या माळा चांदीचे तोडे व विविध रंगांचे ठसे अशा वैविध्याने म्हशींना सजविण्यात आले होते.

वीरशैव लिंगायत गवळी समाज, कोल्हापूर म्हशी पालन व दुग्ध व्यवसाय संघटना यांनी या सोहळ्याचे आयोजन केले. त्यांच्या वतीने सर्व सहभागी व्यावसायिकांना नारळ व फेटे बांधण्यात आले. याच पद्धतीने सागर माळ व कसबा बावडा येथेही तेथील व्यावसायिकांशी हा सोहळा साजरा केला. सागर माळ येथे गवळी व्यावसायिकांचे कुलदैवत सागर देवाचे मंदिर आहे तेथे दरवर्षी प्रथेनुसार सजवून म्हशींना आणले जाते. व त्यांची पूजा केली जाते. मिरवणुकीत हलगीचा कडकडाट होता.

फटाक्‍यांची आतषबाजी होती. व आपापल्या म्हशी अधिक प्रभावीपणे मिरवणुकीत उठून दिसण्यासाठी गवळी व्यावसायिकांची धडपड सुरू होती. यानिमित्ताने गवळी व्यावसायिकांची आपल्या म्हशी वरील प्रेम तर व्यक्त झालेच पण कुटुंबाला आधार देणाऱ्या म्हशी बद्दलची कृतज्ञता ही त्यानिमित्ताने व्यक्त झाली. अनेकांनी खास आपल्या म्हशीच्या पायात घालण्यासाठी चांदीचे तोडे तयार करून घेतले होते.


इतर अॅग्रो विशेष
म्हणे शेतात, पीक असल्याने वीज जोडणीस...अमरावती  ः शेतात पीक असल्यामुळे शेतकरी वीज...
देशी गोसंगोपन, गांडूळखतासह दूध...सातारा जिल्ह्यातील कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड)...
दर्गनहळ्ळी येथे वाढलाय पक्ष्यांचा...सोलापूर : पूर्वी सूर्यकिरणांसोबतच पक्ष्यांचा...
अवकाळी पावसामुळे बाधितांसाठी साडेचार...मुंबई : ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांतील अवकाळी...
डाळिंब बियाच्या तेलापासून ‘सॉफ्टजेल...सोलापूर ः येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राने...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात...पुणे  ः मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व...
आव्हाने खूप सारी, तरीही मधमाशीपालनात...नाशिक येथे पूर्वा केमटेक या कंपनीतर्फे नुकताच...
आकस्मिकता निधीच्या मर्यादेत तात्पुरत्या...मुंबई : महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या...
खासगी प्रवासी बसमधून शेतमाल वाहतुकीला...सोलापूर : राज्याच्या ग्रामीण भागातून मुंबई,...
राज्यात बोरं ८०० ते ४००० रुपये...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
विदर्भात वादळी पावसाची शक्यता पुणे ः विदर्भाच्या काही भागांत हवामान ढगाळ आहे....
मूळ समस्यांशी थेट भिडावे लागेल ऑगस्टपर्यंत पावसाची वाट पाहणारा शेतकरीवर्ग...
दराबाबतचा दुटप्पीपणा घाऊक आणि किरकोळ बाजारांतील कांद्याचे वाढते दर...
खातेवाटप जाहीर : सुभाष देसाईंकडे कृषी,...मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या...
फळबागांच्या माध्यमातून प्रगतिपथावर वडकी पुणे शहरापासून जवळ असलेले वडकी हे दुष्काळी गाव...
गाई, म्हशीच्या सुलभ प्रसूतीसाठी ‘शुभम’...माळेगाव, जि. पुणे ः शेती, पशुपालन करताना येणाऱ्या...
विदर्भात गारपिटीची शक्यतापुणे ः पावसाला पोषक वातावरण तयार झाल्याने...
कांद्यानंतर 'या' पिकावर साठा मर्यादा...नवी दिल्ली: देशात यंदा कडधान्याचे उत्पादन...
‘पीजीआर’साठी जाचक नियमावली नकोपुणे : बिगर नोंदणीकृत जैव उत्तेजकांना (...
अपरिपक्व कांदा आवकेचा दरवाढीवर परिणामनवी दिल्ली: उन्हाळी आणि खरीप कांदा उत्पानातील...