agriculture news in marathi,production of black gram become decrease, nagar, maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटले
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

नगर  ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस नसल्याने त्याचा गंभीर फटका खरिपातील उडदाला बसला आहे. अपुऱ्या पावसामुळे वाढ खुंटल्याने गतवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादनात सुमारे ६० टक्के घट झाली असल्याचे कृषी विभागाच्या पाहणीतून स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षी उडदाचे हेक्टरी ५१८ किलो ८२४ ग्रॅम उत्पादन मिळाले होते. यंदा अवघे हेक्टरी १९७ किलो १६७ ग्रॅम उत्पादन मिळाले असल्याचे पीक कापणी प्रयोगातून स्पष्ट झाले आहे.

नगर  ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस नसल्याने त्याचा गंभीर फटका खरिपातील उडदाला बसला आहे. अपुऱ्या पावसामुळे वाढ खुंटल्याने गतवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादनात सुमारे ६० टक्के घट झाली असल्याचे कृषी विभागाच्या पाहणीतून स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षी उडदाचे हेक्टरी ५१८ किलो ८२४ ग्रॅम उत्पादन मिळाले होते. यंदा अवघे हेक्टरी १९७ किलो १६७ ग्रॅम उत्पादन मिळाले असल्याचे पीक कापणी प्रयोगातून स्पष्ट झाले आहे.

नगर जिल्ह्यात यंदा अपुरा पाऊस झाला. जूनमध्ये चांगला पाऊस झाला की सर्वाधिक पेरणी होते. मात्र यंदा मुळात सुरवातीला कमी पावसावरच उडदाची पेरणी झाली. यंदाही दरवर्षीच्या सरासरीपेक्षा तिप्पट क्षेत्रावर उडीदाची पेरणी झाली. मात्र पीक एेन बहारात असताना पावसाने ताण दिला. यंदा पुरेशा पावसाअभावी जवळपास सर्वच पिकांना फटका बसला आहे. त्यात उडीदाचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात घटले आहे.

जिल्ह्यामध्ये २०१६-१७ मध्ये उडदाचे हेक्टरी ४५३ किलो ५५६ ग्रॅम उत्पादन झाले होते. गतवर्षी हेक्टरी ५१८ किलो ८२४ ग्रॅम उत्पादन मिळाले. यंदा मात्र हेक्टरी केवळ १९७ किलो १६७ ग्रॅम उत्पादन मिळाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा केवळ ३० ते ४० टक्केच उत्पादन निघाले असल्याचे पीक कापणी प्रयोगातून स्पष्ट झाले आहे.  त्यामुळे यंदा उडीद उत्पादक शेतकऱ्यांना पावसाअभावी मोठा आर्थिक फटका सोसावा लागत आहे. त्यात उडीद विक्रीसाठी शासकीय खरेदी केंद्रे सुरू झाली नसल्याने उडदाबाबत शेतकरी हतबल आहेत.

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...