मराठवाड्यातील प्रकल्प तळालाच

विष्णुपूरी प्रकल्प
विष्णुपूरी प्रकल्प

औरंगाबाद: मराठवाड्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत जवळपास ६५ टक्‍के पाऊस झाल्याचे दिसत असले तरी, पाणीसाठ्यांची पातळी अजूनही तळालाच असल्याचे चित्र आहे. ३२८ लघू-मध्यम प्रकल्प कोरडेठाक असून २३९ लघू मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा  जोत्याखालीच आहे. पावसाळा उत्तरार्धात असताना मराठवाड्यातील  एकूण ८७२ प्रकल्पांत केवळ ३८ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा झाल्याचे चित्र आहे.  गेल्या वर्षी दुष्काळ अनुभवलेल्या मराठवाड्यात यंदाही पावसाची अवकृपा कायम आहे. जायकवाडीची प्रकल्पात १०० टक्‍के पाणीसाठा झाला आहे. तर विष्णूपरी व निम्न मानार प्रकल्पात अनुक्रमे १०० व ७७ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा झाला आहे. तर ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पात २२ टक्‍के उपयुक्‍त पाणी आहे. हे प्रकल्प वगळता येलदरी, सिद्धेश्वर, माजलगाव, मांजरा, निम्न दुधना, सीनाकोळेगाव या प्रकल्पात उपयुक्‍त पाण्याचा थेंब नाही. ७४९ लघू प्रकल्पांपैकी ३०० प्रकल्प अजूनही कोरडे आहेत. तर ७५ पैकी २८ मध्यम  प्रकल्पात पाण्याचा थेंब नाही. कोरड्या असलेल्या लघू प्रकल्पांत औरंगाबादमधील ३४, जालना ३८, बीड ९२, लातूर ४० तर उस्मानाबाद जिल्ह्यातील ९६ लघू प्रकल्पांचा समावेश आहे. दुसरीकडे कोरड्या असलेल्या २८ मध्यम प्रकल्पांत औरंगाबादमधील ५, जालना १, बीड ९, लातूर २ तर उस्मानाबादमधील ११ प्रकल्पांचा समावेश आहे. २६ मध्यम तर २१३ लघू प्रकल्पांतील पाणीसाठा अजूनही जोत्याखालीच आहे.  जोत्याखाली पाणीसाठा असलेल्या मध्यम प्रकल्पात औरंगाबादमधील ५, जालन्यातील ४, बीडमधील ६, उस्मानाबाद व लातूरमधील प्रत्येकी ५, तर परभणीमधील एका प्रकल्पाचा समावेश आहे. जोत्याखाली पाणीसाठा असलेल्या लघू प्रकल्पांमध्ये औरंगाबादमधील २० जालन्यातील १४, बीडमधील २४, लातूरमधील ३८, उस्मानाबादमधील ८७, नांदेडमधील १६, परभणीतील १३ व हिंगोलीतील एका लघू प्रकल्पाचा समावेश असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com