थंडीमुळे द्राक्ष काढणी हंगाम लांबणीवर

थंडीमुळे द्राक्ष काढणी हंगाम लांबणीवर
थंडीमुळे द्राक्ष काढणी हंगाम लांबणीवर

नाशिक  : गेल्या दोन दिवसांपासून थंडी लाटने द्राक्ष मण्यांना तडे गेल्याने बागायतदार धास्तावले आहेत. फ्लेम, सोनाका, पर्पल जातीच्या द्राक्ष मण्यांना तडे जाऊन गुणात्मक दर्जा व प्रतवारी ढासळण्याची भीती निर्माण झाली आहे. 

हलक्या जमिनीतील तयार झालेल्या व १५ ब्रिक्सपेक्षा अधिक साखर उतरलेल्या द्राक्ष मण्यांना काही भागांत तडे गेले आहेत. यामुळे काही द्राक्ष उत्पादकांचे  प्राथमिक पातळीवर प्रतिएकरी २० ते ३० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे. मात्र, थंडी ओसरली जरी परिणामांची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. 

साधारणपणे द्राक्ष मण्यांची फुगवण व साखर उतरण्यास विलंब होणार आहे. हंगामामध्ये बेदाण्याचे उत्पादक शेतकऱ्यांनाही थंडीमुळे होणाऱ्या नुकसानीचा सामना करावा लागणार आहे. बेदाण्याच्या वाळवणीसाठी १५ दिवसांचा कालावधी लागतो, तो आता २५ ते ३० दिवसांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

वाढलेल्या थंडीमुळे द्राक्ष काढणी लांबणीवर जाणार आहे. यामुळे चालू व पुढील हंगाम यातील द्राक्ष उत्पादकांचे नियोजन कोलमडणार आहे. प्रतिएकरी मिळणाऱ्या उत्पादन व बाजारभावावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

सटाणा तालुक्यात आगाऊ (अर्ली) द्राक्षबागांतील माल काढणी शेवटच्या टप्प्यात आहे. परंतु, निफाड, दिंडोरी, चांदवड व नाशिक या प्रमुख द्राक्ष उत्पादक तालुक्यात अतिथंडीने काढणी हंगामावरील संकट वाढले आहे. त्यातच बाजारपेठेत मागणी मंदावल्याने साधारण ४० ते ४५ रुपये प्रतिकिलो ऐवजी आता २२ ते २८ रुपये प्रतिकिलोने सौदे होत आहेत. निर्यातीसाठीचा मालाला ८० ते ८५ रुपये किलोने ऐवजी ५५ ते ६० रुपये प्रतिकिलो भावाने शेतकऱ्यांना विकावा लागत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com