आषाढी यात्रा मार्गदर्शिकेचे पंढरपूरमध्ये प्रकाशन

आषाढी यात्रा मार्गदर्शिकेचे पंढरपूरमध्ये प्रकाशन
आषाढी यात्रा मार्गदर्शिकेचे पंढरपूरमध्ये प्रकाशन

सोलापूर : आषाढी यात्रेसाठी जिल्ह्यात येणाऱ्या भाविकांना आवश्‍यक सेवा व सुविधेची माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आषाढी यात्रा मार्गदर्शिका २०१९ काढण्यात आली आहे. या मार्गदर्शिकेचे प्रकाशन नुकतेच अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे व अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रांत कार्यालय पंढरपूर येथील सांस्कृतिक भवन येथे मार्गदर्शिकेच्या प्रकाशनावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी सागर कवडे, तहसीलदार मधुसूदन बर्गे, मुख्याधिकारी अभिजित बापट उपस्थित होते. आषाढी यात्रा मार्गदर्शिकेत पालखी मार्गावरील सर्व शासकीय अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक, शासकीय कार्यालयाचे संपर्क क्रमांक, पालखी मार्गावरील आपत्ती प्रतिसाद केंद्र, पालखी मार्गावरील संबंधित ग्रामपंचायतीचे अधिकारी, कर्मचारी, केरोसिन हॉकर्स व गॅस वितरक, बस स्थानक व्यवस्था, रेल्वे  वेळापत्रक, पंढरपूर शहरातील मठ व इतर निवासस्थाने यांचे संपर्क तसेच शहरातील खासगी डॉक्‍टर यांचे संपर्क क्रमांक आहेत. या मार्गदर्शिकेमुळे भाविकांना तसेच संबंधित अधिकारी, कर्मचारी व नागरिकांना आवश्‍यक माहिती सहज उपलब्ध होणार असल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com