Agriculture news in marathiPurchase of fifty thousand quintals of cotton in Yavatmal | Agrowon

यवतमाळमध्ये पन्नास हजार क्विंटल कापूस खरेदी

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 26 नोव्हेंबर 2020

जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या सीसीआय केंद्रावर कापूस खरेदी सुरू झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील पाच केंद्रांवर ५० हजार क्विटंलच्या वर कापूस खरेदी झाली आहे. दिवाळीपूर्वीच कापूस वेचणीला सुरुवात झाली. 

यवतमाळ : जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या सीसीआय केंद्रावर कापूस खरेदी सुरू झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील पाच केंद्रांवर ५० हजार क्विटंलच्या वर कापूस खरेदी झाली आहे. दिवाळीपूर्वीच कापूस वेचणीला सुरुवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या घरात मोठ्या प्रमाणात कापूस आहे. शेतकरी शासकीय खरेदी केंद्र उघडण्याची प्रतीक्षा करीत होते. परंतु परतीच्या पावसाने कापूस भिजल्याने ओलावा अधिक होता. सीसीआयकडून १२ टक्के आर्द्रता असलेल्या कापसाचीच खरेदी केली जाते. परिणामी सीसीआयने असर्मथता दर्शविली. त्यामुळेच दिवाळीनंतर सीसीआयने कापूस खरेदीला सुरुवात केली आहे.

शासकीय केंद्रावर शेतकऱ्यांनी विक्रीसाठी कापूस आणायला सुरुवात झाली आहे. सीसीआयच्या राळेगाव, पांढरकवडा, वणी, खैरी, घाटंजी, शिंदोला तसेच मुकुटबन केंद्रावर कापसाची आवक वाढली आहे. सीसीआयकडून ५ हजार ८२५ रुपये प्रति क्विंटल दरात कापूस खरेदी केली जात आहे. सध्या खासगी बाजारातही कापसाला ५ हजार ७२५ रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे काही शेतकरी खासगी बाजाराकडे गेल्याचे दिसत आहे. शेतकऱ्यांना नगदी रक्कम मिळत असल्याने शेतकरी खासगी बाजारात कापूस विक्री करीत आहे.

सीसीआयकडून दोन दिवसानंतर चुकारे दिले जात आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा चुकारे गतीने होत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात कापूस मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी शेतकरी आणण्याची शक्‍यता आहे.

पणन केंद्राबाबत संभ्रम
सीसीआयने जिल्ह्यात कापूस खरेदीला सुरुवात केली आहे. मात्र पणनकडून अजूनही मुहूर्त ठरलेला नाही. त्यामुळे शेतकरी संभ्रमात आहे. पणनकडून तारीख पे तारीखचा खेळ सुरू आहे. परिणामी, अनेक भागांतील शेतकरी पणनचे केंद्र उघडण्याच्या प्रतीक्षेत आहे.

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
रिसोडमध्ये कांदा बीजोत्पादनाकडे कल रिसोड, जि. वाशीम : तालुक्यात यंदा कांदा...
औरंगाबादेत सर्वच पक्षांकडून गुलालाची...औरंगाबाद : मतदानाची प्रक्रिया शांततेत पार...
पुणे जिल्ह्यात संमिश्र निकाल; दावे-...पुणे ः जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये...
साताऱ्यात स्थानिक आघाड्यांचा जल्लोषसातारा ः दोन दिवसांपूर्वी मतदान झाले. गेले दोन...
नांदेड जिल्ह्यात प्रस्थापितांनी सत्ता...नांदेड : नांदेड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे...
नाशिक जिल्ह्यात प्रस्थापितांना धक्कानाशिक : जिल्ह्यात एकूण ६२१ ग्रामपंचायतीच्या...
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या...यवतमाळ : माजी मुख्यमंत्री व जलक्रांतीचे प्रणेते...
परभणी जिल्ह्यात संमिश्र यशपरभणी ः परभणी जिल्ह्यातील मतदान झालेल्या ४९८...
भाजपचे ४४, शिवसेनेचे २२ ग्रामपंचायतीवर...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतीपैकी...
नागपुरात संत्रा दरात तेजीनागपूर ः आंबिया बहाराचा हंगाम अंतिम टप्प्यात...
सांगलीत भाजपला धक्का;  महाविकास आघाडीला...सांगली : ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालात...
रत्नागिरीत शिवसेनेला कौल रत्नागिरी : जिल्ह्यातील ३६० ग्रामपंचायतींचे निकाल...
सोलापुरात प्रस्थापितांना धक्कासोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ५९०...
उमरेड येथील महिलांनी स्थापन केली शेतकरी...उमरेड. जि. नागपूर : शेतीमधील विषम परिस्थितीची दखल...
स्वाभिमानीचा विजयासाठी संघर्षकोल्हापूर : कोण म्हणतंय येत नाही, आल्याशिवाय राहत...
‘ब्लॅक राइस’ बियाणे निर्मितीचे काम सुरुरत्नागिरी ः तालुक्यातील शिरगाव येथील कृषी संशोधन...
सोलापुरात वांगी, गाजराला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
विदर्भात महाविकास आघाडी, भाजपला संमिश्र...नागपूर : विदर्भात महाविकास आघाडी, भाजप प्रणीत...
वऱ्हाडात महाविकास आघाडीला यश अकोला : ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीच्या...
जळगाव जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव...जळगाव : परभणी जिल्ह्यात आढळून आलेल्या ‘बर्ड फ्लू’...