‘क्यार’ झाले ‘महाचक्रीवादळ’

हवामान अंदाज
हवामान अंदाज

पुणे : अरबी समुद्रात घोंगावत असलेल्या क्यार चक्री वादळाचे ‘महा’चक्रीवादळात रुपांतर झाले. तशी सुमारे २९० किलोमीटर वेगाने वारे वाहत असलेले हे वादळ देशाच्या किनाऱ्यापासून दूर ओमानकडे जात असल्याने कोकणात किनारपट्टीला कोणताही धोका नाही. किनारपट्टीलगत समुद्रात लाटा उसळण्याची शक्यता आहे. बुधवारपर्यंत (ता.३०) लक्षद्वीप बेटांजवळ नवीन कमी दाब क्षेत्र तयार होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

रविवारी (ता. २७) सकाळी ‘क्यार’ चक्रीवादळाचे महाचक्रीवादळीत रुपांतर झाले. मुंबईपासून ५८० किलोमीटर दूर पश्चिमेकडे, तर ओमानमधील मसिराहपासून १०१० किलोमीटर पूर्वेकडे अरबी समुद्रात होते. रविवारी दुपारी वादळाची तीव्रता खूपच वाढल्याने ताशी २५५ ते २९० किलोमीटर वेगाने चक्राकार वारे वाहत आहे. प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे उपग्रहाद्वारे काढलेल्या छायाचित्रात अरबी समुद्रात ‘भोवरा’ पडल्याचे स्पष्ट दिसत आहे. वादळाचे केंद्र ताशी १३ किलोमीटर वेगाने ओमानकडे झेपावत आहे. 

रविवारी (ता. २७) सकाळी निरभ्र आकाश असल्याने उन्हाचा ताप वाढला होता. अनेक दिवस असलेल्या ढगाळ हवामानामुळे हा चटका असह्य होत होतो. दुपारनंतर पुन्हा अंशत: ढगाळ हवामान झाल्याने ऊन सावल्यांचा खेळ सुरू होता. रविवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नांदेड येथे सर्वाधिक ३३ अशं सेल्सिअस तापामनाची नोंद झाली. डहाणू, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, नागपूर येथे तापमान ३० अंशांच्या पुढे गेले आहे.   

रविवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे २७.६ (-३.६), जळगाव २७.६(-६.७), कोल्हापूर २६.९(-४.२), महाबळेश्वर १९.१(-६.८), मालेगाव २६.६ (-६.१), नाशिक २५.२ (-६.६), सांगली २६.६ (-५.७), सातारा २५.१ (-४.८), सोलापूर २९.६ (-३.०), अलिबाग २८.१ (-४.७), डहाणू ३१.६ (-१.३), सांताक्रूझ २९.६ (-४.०), रत्नागिरी २८.०(-५.०), औरंगाबाद २७.४ (-३.९), परभणी २९.४ (-२.५), नांदेड ३३.० (०.३), अकोला २५.२ (-७.७), अमरावती २५.४ (-७.७), बुलडाणा २४.० (-६.०), ब्रह्मपुरी ३२.६ (०.८), चंद्रपूर ३०.४(-२.०), गोंदिया २८.०(-३.८), नागपूर ३०.३ (-१.७), वर्धा २८.५ (-३.३), यवतमाळ २७.०(-४.१).

उन्हाचा चटका वाढणार   अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांजवळ बुधवारपर्यंत (ता. ३०) नव्याने कमी दाब क्षेत्र तयार असून, त्याची तीव्रता वाढण्याचे संकेत आहेत. ‘क्यार’ वादळाने बाष्पही ओढून नेल्याने राज्यात पाऊस ओसरला आहे. आज (ता. २८) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. उन्हाचा चटका वाढल्याने कमाल तापमानातही वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

. . . . . .

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com