अमरावती विभागात सोयाबीन उत्पादकता घटली

हलक्‍या आणि भारी जमिनीतील उत्पादकतेत यावर्षी जास्त अंतर नाही. सहा ते सात क्‍विंटलचीच उत्पादकता मिळाली आहे. कमी पावसाचा फटका यावर्षी पिकाच्या उत्पादकतेवर झाला आहे. त्यातच आर्द्रता अधिक असल्याने २५०० ते ३५०० रुपये क्‍विंटलचे दर सध्या आहेत. - डॉ. गजानन ढवळे, सोयाबीन उत्पादक, शिरपूर जैन, जि. वाशीम
सोयाबीन
सोयाबीन

अमरावती  ः गेल्या काही वर्षांत कापसाला पर्याय आणि लागवड क्षेत्राच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचे पीक म्हणून नावारूपास आलेल्या सोयाबीनच्या एकरी उत्पादकतेवर काही भागांत कमी तर काही भागांत अधिक पावसाचा परिणाम झाला आहे. सरासरी दहा क्‍विंटलपेक्षा अधिक उत्पादकता असलेल्या सोयाबनीचा एकरी उतारा यावर्षी सहा ते सात क्‍विंटल राहण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. 

अमरावती विभागातील वाशीम जिल्ह्यात सर्वाधिक सोयाबीन लागवड होते. सोयाबीनचे हब म्हणून वाशीमची ओळख आहे. यावर्षीच्या हंगामात जिल्ह्यात सुरवातीला पावसाने ओढ दिली. त्यानंतरही समाधानकारक पाऊस न झाल्याने सोयाबीनच्या संपूर्ण हंगामावर परिणाम झाला आहे. सध्या जिल्ह्यात परिपक्‍व अवस्थेतील सोयाबीन काढणीचे काम सुरू आहे. त्यानुसार हलक्‍या जमिनीत पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना सहा क्‍विंटलचा उतारा आला आहे. त्यानंतर भारी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना सात ते आठ क्‍विंटलपर्यंतच उत्पादकता मिळाल्याचे शेतकरी सांगतात. त्यातच सोयाबीन काढणीकामी एकाचवेळी मागणी वाढल्याने मजुरी दरात वाढ झाली आहे. 

अडीच हजार रुपये एकराने कापणी करून जमा करून देण्याचे काम होते. त्यानंतर दोन व्यक्‍तींची परत ढीग करण्यासाठी मजुरी द्यावी लागते. ६०० रुपये यावर खर्च होतात. १५० रुपये पोते असा मळणीचा दर आहे. हा खर्च पावणेचार हजार रुपयांच्यावर जातो. ६०० ते ७०० सोयाबीन ट्रॅक्‍टरने शेतापासून घरापर्यंत माल आणणे.  ट्रॉलीमध्ये सोयाबीन पोते चढविणे व उतरविणे यावरील हमालीपोटी ३० रुपये असा पावणेपाच हजार रुपयांचा खर्च पिकाच्या अंतिम टप्प्यात होतो, असेही सांगण्यात आले. 

वायदे बाजारात डिसेंबरकरिता विक्रीसाठी उपलब्ध सोयाबीनला विक्रमी ४ हजार रुपयांचा दर ऑनलाइन प्लॅटफार्मवर २० सप्टेंबर रोजी होता. त्यानंतर दरात ३५०० पर्यंत घसरण ही नोंदविण्यात आली. त्यामुळे सोयाबीनच्या दराबाबत मोठी अनिश्चि‍तता बाजारात अनुभवली जात आहे. 

दरम्यान, गेल्यावर्षी कापसाला चांगला दर मिळाल्याने यावर्षी कापसाखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. परिणामी, गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी पाच जिल्ह्यात तब्बल एक लाख हेक्‍टरने सोयाबीन लागवड कमी झाल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगीतले. गेल्यावर्षी १४ लाख ७ हजार  ७८७ हेक्‍टरवर सोयाबीन होते. यावर्षी हे क्षेत्र १३ लाख ४० हजार ५१५ हेक्‍टरवर आले आहे. 

असे आहे विभागातील लागवड क्षेत्र  (हेक्‍टरमध्ये) अकोला ः १ लाख ७० हजार ८५७ बुलडाणा ः ३ लाख ७१ हजार ५२८ वाशीम ः २ लाख ९२ हजार ५९ अमरावती ः २ लाख ३८ हजार ७२६ यवतमाळ ः २ लाख ६७ हजार ३४५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com