महाराष्ट्रात २०१२ च्या दुष्काळापासून दुग्ध व्यवसायाचा रुळावरून घसरलेला गाडा संकटाच्या खाईतच जात आ
बातम्या
खानदेशात अनेक भागांत पावसाची विश्रांती
जळगाव ः खानदेशात मागील दोन दिवसांपासून अनेक भागांत पावसाने विश्रांती घेतली आहे. हलक्या व मध्यम प्रकारच्या क्षेत्रात चांगला वाफसा निर्माण झाल्याने या क्षेत्रात आंतरमशागतीची कामे वेगात सुरू आहेत.
जळगाव ः खानदेशात मागील दोन दिवसांपासून अनेक भागांत पावसाने विश्रांती घेतली आहे. हलक्या व मध्यम प्रकारच्या क्षेत्रात चांगला वाफसा निर्माण झाल्याने या क्षेत्रात आंतरमशागतीची कामे वेगात सुरू आहेत.
मागील मंगळवारपासून (ता. ९) पाचोरा, चाळीसगाव, जामनेर, जळगाव या भागांत पावसाने विश्रांती घेतली आहे. पेरण्या जवळपास पूर्ण होत आलेल्या आहेत. परंतु, ताग पिकाची पेरणी अनेक शेतकऱ्यांनी केलेली नाही. ही पेरणी पुढील आठवड्यात होऊ शकते. चोपडा, धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा, साक्री, धुळे या भागांतही पावसाने मागील दोन दिवस सवड दिली आहे. कडधान्य, तृणधान्य व कापूस आदी पिके अनेक भागांत तरारल्याने आंतरमशागत शेतकऱ्यांनी केली. लागलीच रासायनिक खते देण्याचे कामही शेतकऱ्यांनी उरकून घेतले.
चोपडा तालुक्यात प्रतीक्षा
चोपडा (जि. जळगाव) तालुक्यात जोरदार पाऊस अजूनही अनेक भागांत झालेला नाही. चोपडामधील तापीकाठ व जळगावमधील तापीकाठीदेखील जोरदार पाऊस झालेला नाही. पेरण्या या भागात झाल्या आहेत. हलक्या पावसामुळे पेरण्या यशस्वीदेखील झाल्या आहेत. परंतु, शेतातून पावसाचे पाणी वाहून निघालेले नाही. या तालुक्यातील गूळ प्रकल्पातील जलसाठाही हवा तसा वाढलेला नाही. जळगाव जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतलेली असल्याने पावसाची टक्केवारीदेखील वाढलेली नाही. सरासरीच्या १९ टक्के पाऊस जळगाव जिल्ह्यात झाला आहे. अशीच स्थिती धुळे व नंदुरबारमध्येदेखील आहे.
भाडेतत्त्वाने मशागतीसाठी मोठा खर्च
अनेक अल्पभूधारक किंवा बैलजोडी नसलेल्या शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर बैलजोडीचलित अवजारांनी आंतरमशागत करून घ्यावी लागत आहे. ही मशागत या हंगामात महाग पडत असून, १२०० रुपये प्रतिदिन, अशी मजुरी दोन बैल, एक माणूस यांच्या करवी केल्या जाणाऱ्या मशागतीसाठी द्यावी लागत आहे. मिनी ट्रॅक्टरने वाफसा हवा तसा मिळत नसल्याने आंतरमशागत करणे अशक्य होत असल्याची स्थिती आहे.
- 1 of 916
- ››