Agriculture news in marathi;Rain fall in many parts of Khandesh | Agrowon

खानदेशात अनेक भागांत पावसाची विश्रांती
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 12 जुलै 2019

जळगाव ः खानदेशात मागील दोन दिवसांपासून अनेक भागांत पावसाने विश्रांती घेतली आहे. हलक्‍या व मध्यम प्रकारच्या क्षेत्रात चांगला वाफसा निर्माण झाल्याने या क्षेत्रात आंतरमशागतीची कामे वेगात सुरू आहेत. 

जळगाव ः खानदेशात मागील दोन दिवसांपासून अनेक भागांत पावसाने विश्रांती घेतली आहे. हलक्‍या व मध्यम प्रकारच्या क्षेत्रात चांगला वाफसा निर्माण झाल्याने या क्षेत्रात आंतरमशागतीची कामे वेगात सुरू आहेत. 

मागील मंगळवारपासून (ता. ९) पाचोरा, चाळीसगाव, जामनेर, जळगाव या भागांत पावसाने विश्रांती घेतली आहे. पेरण्या जवळपास पूर्ण होत आलेल्या आहेत. परंतु, ताग पिकाची पेरणी अनेक शेतकऱ्यांनी केलेली नाही. ही पेरणी पुढील आठवड्यात होऊ शकते. चोपडा, धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा, साक्री, धुळे या भागांतही पावसाने मागील दोन दिवस सवड दिली आहे. कडधान्य, तृणधान्य व कापूस आदी पिके अनेक भागांत तरारल्याने आंतरमशागत शेतकऱ्यांनी केली. लागलीच रासायनिक खते देण्याचे कामही शेतकऱ्यांनी उरकून घेतले. 

चोपडा तालुक्‍यात प्रतीक्षा
चोपडा (जि. जळगाव) तालुक्‍यात जोरदार पाऊस अजूनही अनेक भागांत झालेला नाही. चोपडामधील तापीकाठ व जळगावमधील तापीकाठीदेखील जोरदार पाऊस झालेला नाही. पेरण्या या भागात झाल्या आहेत. हलक्‍या पावसामुळे पेरण्या यशस्वीदेखील झाल्या आहेत. परंतु, शेतातून पावसाचे पाणी वाहून निघालेले नाही. या तालुक्‍यातील गूळ प्रकल्पातील जलसाठाही हवा तसा वाढलेला नाही. जळगाव जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतलेली असल्याने पावसाची टक्केवारीदेखील वाढलेली नाही. सरासरीच्या १९ टक्के पाऊस जळगाव जिल्ह्यात झाला आहे. अशीच स्थिती धुळे व नंदुरबारमध्येदेखील आहे. 

भाडेतत्त्वाने मशागतीसाठी मोठा खर्च
अनेक अल्पभूधारक किंवा बैलजोडी नसलेल्या शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर बैलजोडीचलित अवजारांनी आंतरमशागत करून घ्यावी लागत आहे. ही मशागत या हंगामात महाग पडत असून, १२०० रुपये प्रतिदिन, अशी मजुरी दोन बैल, एक माणूस यांच्या करवी केल्या जाणाऱ्या मशागतीसाठी द्यावी लागत आहे. मिनी ट्रॅक्‍टरने वाफसा हवा तसा मिळत नसल्याने आंतरमशागत करणे अशक्‍य होत असल्याची स्थिती आहे. 

इतर बातम्या
पीकविम्याला मुदतवाढ देण्याची ‘...अकोला ः या हंगामात पीकविमा भरण्यासाठी २४ जुलै ही...
‘त्या’ बँकांमधील शासकीय खाती बंद करणार...यवतमाळ : बँकांच्या आडमुठेपणामुळे शेतकरी...
परडा येथे मक्यावर लष्करी अळीचा...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मक्यावर मोताळा...
अमरावती जिल्ह्यात पीककर्जाचा टक्का...अमरावती  : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी...
अकोल्यात सोयाबीन सरासरी ३६१० रुपये...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (...
सातारा जिल्हा परिषदेचा १०० कोटींचा...सातारा : जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच मूळ...
पुण्यात पीकविम्यासाठी शिवसेना रस्त्यावरपुणे ः ‘कोण म्हणतो देणार नाय विमा घेतल्याशिवाय...
पुणे विभागातील कोरडवाहू पट्ट्यात टंचाई...पुणे : विभागातील पुणे, सातारा, कोल्हापूर...
मराठवाड्यातील पाणीटंचाईत वाढऔरंगाबाद : पावसाने पाठ फिरविल्याने...
नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांनी उतरविला १...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गंत खरिपासाठी...
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत १५ चारा...औरंगाबाद : मराठवाड्यातील घटलेली चारा छावण्यांची...
अचूक पीक पेरणी अहवाल देणे शक्य नाही ः...बुलडाणा  ः जिल्ह्यातील पीक पेरणीचा...
आडसाली ऊस लागवडीला कोल्हापूर जिल्ह्यात...कोल्हापूर  : जिल्ह्यात गेल्या पंधरवड्यात...
परभणी कृषी विद्यापीठ उत्पादित अडीच हजार...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या...
‘शेतकरी सन्मान’साठी ९१.३३ टक्के ...अकोला  ः पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम...
एचटी कापूस बियाण्यांबाबतचा अहवाल १५...मुंबई  : प्रतिबंधित एचटी (हर्बीसाइड टॉलरंट)...
शिवसेना शेतकऱ्यांची दिशाभूल करतेय ः...मुंबई  ः पीकविम्यासंदर्भात विमा कंपन्यांवर...
पीकविम्याचे पैसे पंधरा दिवसांत न...मुंबई  : कर्जमाफी दिलेल्या शेतकऱ्यांची...
फळपीक विमा योजनेला मुदतवाढ देण्याची...पुणे  : राज्यातील दुष्काळी स्थिती आणि...
कृत्रिम पावसाचा मंगळवारी तीन ठिकाणी...मुंबई   ः पश्चिम महाराष्ट्रातील...