हवामान
हवामान

मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा अंदाज

पुणे : मेघगर्जना, विजांसह कमी कालावधीत पडणाऱ्या मुसळधार पावसाने राज्याला दणका दिला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात अनेक ठिकाणी पाऊस पडला. आज (ता. ७) मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार, तर कोकण, मराठवाड्यातही मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात उन्हाचा चटका वाढला असून, रविवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नांदेड येथे सर्वाधिक ३४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पश्चिम राजस्थामध्ये आजपासून (ता. ७) हवामान कोरडे होणार असून, नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) परतीसाठी पोषक स्थिती तयार होत आहे. गुरवारपर्यंत (ता. १०) मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्याचा शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू झाल्यानंतर साधारणत: २० ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातून मॉन्सून परतण्याची संकेत आहेत.  दरम्यान राज्यात वादळी पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता.७) कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद जिल्ह्यासह राज्यात अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा आहे. तर विदर्भातही हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.        रविवारी (ता. ५) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३१.२ (०.४), जळगाव ३३.४(-१.२), कोल्हापूर ३१.१(०.७), महाबळेश्वर २४.८ (०.२), मालेगाव ३१.४ (-१.४), नाशिक ३१.९ (०.३), सातारा ३०.३ (१.१), सोलापूर ३३.४ (१.१), अलिबाग ३१.० (-०.२), डहाणू ३२.३ (०.४), सांताक्रूझ ३३.० (१.०), रत्नागिरी ३२.८ (२.२), औरंगाबाद ३०.५ (-१.१), परभणी ३२.९ (०.२), नांदेड ३४.० (०.४), अकोला ३३.२ (-०.५), अमरावती ३३.४ (-०.३), बुलडाणा २६.० (-४.६), ब्रह्मपुरी ३४.० (१.५), चंद्रपूर ३३.४(०.२), गोंदिया ३२.२(-०.६), नागपूर ३३.२ (०.१), वर्धा ३३.० (०.०), यवतमाळ ३१.०(-१.०).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com