agriculture news in Marathi,Rain possibility in Central Maharashtra, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा अंदाज

टीम अॅग्रोवन
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

पुणे : मेघगर्जना, विजांसह कमी कालावधीत पडणाऱ्या मुसळधार पावसाने राज्याला दणका दिला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात अनेक ठिकाणी पाऊस पडला. आज (ता. ७) मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार, तर कोकण, मराठवाड्यातही मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात उन्हाचा चटका वाढला असून, रविवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नांदेड येथे सर्वाधिक ३४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

पुणे : मेघगर्जना, विजांसह कमी कालावधीत पडणाऱ्या मुसळधार पावसाने राज्याला दणका दिला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात अनेक ठिकाणी पाऊस पडला. आज (ता. ७) मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार, तर कोकण, मराठवाड्यातही मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात उन्हाचा चटका वाढला असून, रविवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नांदेड येथे सर्वाधिक ३४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

पश्चिम राजस्थामध्ये आजपासून (ता. ७) हवामान कोरडे होणार असून, नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) परतीसाठी पोषक स्थिती तयार होत आहे. गुरवारपर्यंत (ता. १०) मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्याचा शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू झाल्यानंतर साधारणत: २० ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातून मॉन्सून परतण्याची संकेत आहेत. 

दरम्यान राज्यात वादळी पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता.७) कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद जिल्ह्यासह राज्यात अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा आहे. तर विदर्भातही हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.  
    
रविवारी (ता. ५) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३१.२ (०.४), जळगाव ३३.४(-१.२), कोल्हापूर ३१.१(०.७), महाबळेश्वर २४.८ (०.२), मालेगाव ३१.४ (-१.४), नाशिक ३१.९ (०.३), सातारा ३०.३ (१.१), सोलापूर ३३.४ (१.१), अलिबाग ३१.० (-०.२), डहाणू ३२.३ (०.४), सांताक्रूझ ३३.० (१.०), रत्नागिरी ३२.८ (२.२), औरंगाबाद ३०.५ (-१.१), परभणी ३२.९ (०.२), नांदेड ३४.० (०.४), अकोला ३३.२ (-०.५), अमरावती ३३.४ (-०.३), बुलडाणा २६.० (-४.६), ब्रह्मपुरी ३४.० (१.५), चंद्रपूर ३३.४(०.२), गोंदिया ३२.२(-०.६), नागपूर ३३.२ (०.१), वर्धा ३३.० (०.०), यवतमाळ ३१.०(-१.०).


इतर अॅग्रो विशेष
पामतेल आयात शुल्कात कपात; केंद्र...नवी दिल्ली ः केंद्र सरकारने कच्च्या...
टंचाईग्रस्त दहीगाव झाले लोकसहभागातून...सातारा जिल्ह्यातील दहीगाव गावातील ग्रामस्थांनी...
'निवार’ चक्रीवादळाचा प्रभाव; राज्यात...पुणे ः बंगालच्या उपसागरात पूर्व किनाऱ्याकडे...
केळीची मागणी कायम, दर टिकून जळगाव : दाक्षिणात्य व गुजरातमधील केळीची उत्तर...
तमिळनाडू, पुद्दुचेरीत धुमाकूळचेन्नई  ः निवार चक्रीवादळामुळे वेगवान...
गहू, हरभरा पेरणीला वेगपुणे : यंदा चांगल्या पाणीसाठ्यामुळे गहू व...
पहिल्याच टप्प्यात थकवली ३५० कोटींची ‘...पुणे : राज्याचा ऊस गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर...
आर्थिक चणचण,‘लम्पी’चे पशुधन बाजारावर...सांगली ः लॉकडाउनमुळे पशुधानाचे आठवडे बाजार तब्बल...
ऊसतोडणी मजुरांची संख्या यंदा दोन...नगर : राज्यातील साखर कारखान्यांवर ऊसतोडणी...
पणन महासंघाची खरेदी उद्यापासूननागपूर : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक...
मराठवाड्यातील बहुतांश धरणे तुडुंबऔरंगाबाद : यंदा जोरदार पावसामुळे मराठवाड्यातील...
संकटकाळात श्री ब्रॅण्डद्वारे दर्जेदार...नाशिक जिल्ह्यातील वनसगाव येथील शैलेश व संदीप या...
सणांच्या हंगामात भाव खाणारी गाडे यांची...कांजळे (ता. भोर, जि. पुणे) येथील विलास गाडे यांनी...
महाटीत उपसरपंचपदासाठी साडेदहा लाखांची...नांदेड ः ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी उपसरपंचपदाचा...
राज्यात शनिवारपासून ‘जनप्रबोधन यात्रा’नगर/पुणे ः शेतकरी आत्महत्येला कारणीभूत असलेल्या...
फळांपासून वाइननिर्मितीसाठी महाराष्ट्र...नाशिक : द्राक्षाबरोबर डाळिंब, जांभूळ,...
शिराळा तालुक्यात गुऱ्हाळघरांना उशिरा...सांगली ः शिराळा तालुक्यात यंदा गूळ उत्पादनाचा...
केंद्रीय पथकाकडून कापूस पिकाची पाहणीआरेगाव, यवतमाळ ः गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव...
नाशिक बाजार समितीत व्यापाऱ्याकडून...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
धान उत्पादकांना प्रतिक्विंटल सातशे...मुंबई: आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन...