तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

हवामान अंदाज
हवामान अंदाज

पुणे ः परतीचा मॉन्सून देशातून परतल्यानंतर मालदिवच्या परिसरात चक्रावाताची, अरबी समुद्राच्या परिसर आणि लक्षद्वीप या परिसरात कमी दाबाच्या क्षेत्राची स्थिती तयार झाली आहे. तसेच, दक्षिण कर्नाटक व अरबी समुद्र या परिसरातही चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. यामुळे पुढील दोन ते तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात काही अंशी हवामान ढगाळ राहणार असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

मॉन्सून परतल्यामुळे राज्यातील अनेक भागांत उन्हाचा चटका वाढला आहे. त्यामुळे सकाळपासून उकाड्यात वाढ होत आहे. कमाल तापमानात चढउतार होत आहे. राज्यातील अनेक भागांत सरासरीच्या तुलनेत कमाल व किमान तापमानात चढउतार झाले आहेत. गुरुवारी (ता. १७) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस अलिबाग येथे ३६.६ अंश सेल्सिअसची राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. तर महाबळेश्वरमध्ये सर्वात कमी म्हणजेच १६.४ अंश सेल्सिअसची एवढे तापमान नोंदविले गेले.     ऑक्टोबरहिटमुळे कोकणातील अनेक भागांत उन्हाचा पारा वाढला आहे. कोकणात सरासरीच्या तुलनेत अलिबाग येथे सर्वाधिक ४.२ अंश सेलिअसने वाढ झाली आहे. तर रत्नागिरी येथे सरासरीच्या तुलनेत ४.१ अंश सेल्सिअसने वाढ झाली असून कमाल तापमान ३६.३ अंश सेल्सिअस एवढे होते. डहाणू आमइ मुंबुई येथील तापमानातही सरासरीच्या तुलनेत तीन अंश सेल्सिअसने वाढ झाली होती. कोकणात कमाल तापमान ३४ ते ३६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. तर किमान तापमान २३ ते २६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मध्य महाराष्ट्रातही कमाल तापमान ३१ ते ३४, तर मराठवाड्यात ३१ ते ३३, विदर्भात ३० ते ३४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.

गुरुवारी (ता. १७) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासातील कमाल तापमान ः(कंसात घट, वाढ - अंश सेल्सिअसमध्ये)   पुणे ३१.२ (-०.७), जळगाव ३४.७ (-०.३), कोल्हापूर ३०.० (-१.७), महाबळेश्वर २५.६ (-०.१), मालेगाव ३३.० (-०.६), नाशिक ३०.९ (-१.६), सांगली ३०.५ (-२.०), सातारा २९.९ (-०.९), सोलापूर ३३.१ (-०.२), मुंबई ३६.० (३.२), सांताक्रुझ ३६.० (२.६), अलिबाग ३६.६ (४.२), रत्नागिरी ३६.३ (४.१), डहाणू ३४.२ (३.१), औरंगाबाद ३१.३ (-०.८), परभणी ३२.६ (-०.६), बीड ३१.७ (-०.७), अकोला ३३.७ (-०.२), अमरावती ३३.८ (-०.२), बुलढाणा ३०.६ (-०.४), ब्रम्हपुरी ३४.१ (१.१), चंद्रपूर ३३.६ (०.३), गोंदिया ३२.० (-१.२), नागपूर ३२.८ (-०.५), वाशीम ३२.०, वर्धा ३२.२ (-१.१), यवतमाळ ३१.५ (-०.८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com