agriculture news in Marathi,rain possibility in several places, Maharashtra | Agrowon

तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

टीम अॅग्रोवन
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

पुणे ः अरबी समुद्रात तयार झालेल्या महा चक्रीवादाळाची तीव्रता वाढल्याने राज्यातील बहुतांशी भागांत हवामान ढगाळ आहे. यामुळे दिवसभर हवामानात बदल होत आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली, वेल्हा, शिरूर तालुक्यांतील काही भागांत पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. नागपूर जिल्ह्यात अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस झाला. मराठवाड्यातही काही ठिकाणी हलका पाऊस झाला. पुढील चार ते पाच दिवस हवामान ढगाळ राहणार असून, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.

पुणे ः अरबी समुद्रात तयार झालेल्या महा चक्रीवादाळाची तीव्रता वाढल्याने राज्यातील बहुतांशी भागांत हवामान ढगाळ आहे. यामुळे दिवसभर हवामानात बदल होत आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली, वेल्हा, शिरूर तालुक्यांतील काही भागांत पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. नागपूर जिल्ह्यात अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस झाला. मराठवाड्यातही काही ठिकाणी हलका पाऊस झाला. पुढील चार ते पाच दिवस हवामान ढगाळ राहणार असून, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.

लक्षद्वीप आणि अरबी समुद्राच्या परिसरात महा नावाचे चक्रीवादळ तयार झाले आहे. या चक्रीवादळाची तीव्रता चांगलीच वाढली आहे. आज या चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढणार असून उद्यापासून त्याची तीव्रता कमी होणार आहे. अरबी समुद्रात असलेल्या या चक्रीवादळाचा वेग ताशी २४ किलोमीटर एवढा होता. लक्षद्वीपमधील अमिनीदिवीपासून नैर्ऋत्येकडे ४५० किलोमीटर, तर कर्नाटकातील मंगळुरूपासून ४६० किलोमीटर, गोव्यापासून ३१० किलोमीटर अंतरावर आहे. अरबी समुद्रात असलेल्या क्यार चक्रीवादळाचीही तीव्रता कमी झाली असून ताशी वेग ११ किलोमीटर एवढा आहे. त्यामुळे राज्यातील वातावरणात वेगाने बदल होत आहेत.  

सध्या राज्यातील अनेक भागांत ढगाळ हवामान असले तरी दुपारी अधूनमधून ऊन पडत आहे, त्यामुळे कमाल तापमानाचा पारा ३४ अंशांपर्यंत वाढत आहे. दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन सायंकाळी ढग जमा होऊन पाऊस पडत आहे. मात्र, दुपारी उन्हाच्या वाढलेल्या तापमानामुळे कमाल तापमानाची काही प्रमाणात वाढ असली तरी सरासरीच्या तुलनेत कमाल तापमानात तीन ते चार अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे. शुक्रवारी (ता. १) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत मुंबईजवळील सांताक्रूझ येथे सर्वाधिक ३६.९ अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे. कमाल तापमानाबरोबर किमान तापमानातही चांगली घट झाली आहे. महाबळेश्वर येथे १६.४ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे.

शुक्रवारी (ता. १) सकाळी आठ वाजेपर्यंत विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत झालेली वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये): पुणे २७.६ (-३.५), लोहगाव २८.४ (-३.६), जळगाव ३२.८ (-१.२), कोल्हापूर २८.० (-२.९), महाबळेश्वर २१.८ (-३.७), मालेगाव ३१.० (-१.७), नाशिक २८.१ (-३.६), सांगली २७.६  (-४.१), सातारा २७.१ (-२.९), सोलापूर ३०.२ (-१.८), मुंबई ३३.८, सांताक्रूझ ३४.९ (०.७), अलिबाग ३३.४ (०.२), रत्नागिरी ३३.६ (०.३), डहाणू ३४.२ (०.९), औरंगाबाद २९.० (-२.०), परभणी ३०.० (-१.४), नांदेड ३२.० (-०.३), अकोला ३१.३ (-१.३), अमरावती ३२.० (-०.४), बुलडाणा २९.५ (-०.२), ब्रह्मपुरी ३०.९ (-०.४), चंद्रपूर ३१.६ (-०.२), गोंदिया ३२.२ (०.७), नागपूर ३२.८ (१.२), वाशीम ३०.०, वर्धा ३१.५, यवतमाळ ३९.५ (-१.१)  


इतर अॅग्रो विशेष
अभियान नको, योजना हवीकेंद्र सरकारने आत्मनिर्भर योजनेंतर्गत शेतमाल...
इर्व्हिनिया रॉट रोगाची केळी पिकात समस्या जळगाव ः जिल्ह्यात केळी पिकात...
`पोकरा`मधून शेतमजुरांना प्रशिक्षण द्याऔरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
ऑगस्टमध्ये प्रथमच भरले सीना धरण नगर: दुष्काळी कर्जत, श्रीगोंदा आणि आष्टी...
कोल्हापूर : जनावरे बाजारातील...कोल्हापूर: `कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे...
साखर निर्यातवाढीसाठी केंद्राची ‘रॅपिड अ...कोल्हापूर: देशातून जास्तीत जास्त साखर निर्यात...
परभणीत सोळा हजार शेतकऱ्यांचे आधार...परभणी ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सोयाबीन बियाणेप्रकरणात शेतकऱ्यांना एक...अमरावती : विभागातील पाच जिल्ह्यांत सोयाबीन बियाणे...
‘ई-नाम’, शीतसाखळी बळकट करण्याची गरज;...पुणे: चीनशी व्यापारी संबंध डळमळीत झाल्यानंतर...
‘सिट्रस नेट’वर केवळ दोनशे शेतकऱ्यांची...नागपूर : प्रशासकीय यंत्रणांच्या उदासीनतेमुळे ‘...
मका खरेदी केंद्रांवर शेतकरी ठाण मांडून औरंगाबाद: हमीभावाने खरेदीसाठी ३१ जुलैपर्यंत...
पावसाचा जोर वाढण्याची शक्यता  पुणे ः  बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे...
भाजीपाला शेतीतून अर्थकारणाला गतीडोंगरगाव (ता.जि.अकोला) शिवारातील योगेश नागापुरे...
राज्यात धरणांमध्ये ३८ टक्के साठापुणे : मॉन्सूनचा पाऊस सुरू झाल्यानंतर जून...
जुलैअखेर पावसाने सरासरी गाठलीपुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) हंगामाची...
सांगली जिल्ह्यात २६ हजार हेक्टरने ऊस...सांगली : जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यासह अन्य...
मुगावर काय फवारायचे?अकोला ः कडधान्य वर्गीय पिकांपैकी एक प्रमुख...
कीडनाशकांवरील बंदी- शेतकऱ्यांसाठी तारक...केंद्रीय कृषी मंत्रालयाने २७ कीडनाशकांवर बंदी...
दूध दर आंदोलनाचा राज्यभर एल्गारपुणे: दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व...
पीकविमा नोंदणीत महाराष्ट्राची आघाडीपुणे: डिजिटल तंत्राचा वापर करून पंतप्रधान पीकविमा...