agriculture news in marathi,rain in pune district, maharashtra | Agrowon

पुणे जिल्‍ह्यात सर्वदूर पावसाच्या सरी

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

पुणे  : जिल्‍ह्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली असून, पूर्व भागातील कोरडवाहू तालुक्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर अधिक असल्याने पाण्याचा मोठा विसर्ग सुरूच आहे. भीमा नदीतून पाण्याची आवक होत असल्याने उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे.

पुणे  : जिल्‍ह्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली असून, पूर्व भागातील कोरडवाहू तालुक्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर अधिक असल्याने पाण्याचा मोठा विसर्ग सुरूच आहे. भीमा नदीतून पाण्याची आवक होत असल्याने उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे.

जिल्ह्यात सोमवारपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर मंगळवारी (ता.२१) आणखी वाढून दिवसभर संततधार पाऊस पडला. रात्रभर अनेक भागांत पावसाची रिपरिप सुरू होती. बुधवारी सकाळी अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. दुपारनंतर मात्र पावसाने उघडीप दिल्याचे चित्र होते. पश्‍चिम भागातील पावसाचा जोर अधिक होता. दुष्काळी पट्ट्यांतही हलक्या पावसाने हजेरी लावली आहे. हा पाऊस धाेक्यात आलेल्या खरिपाला जीवदान देणारा ठरणार अाहे.

मुळा-मुठा, निरा, भीमेच्या उपखोऱ्यातील सर्वच धरणांसह कुकडी खोऱ्यातील डिंभे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे मुळा-मुठा, भीमा, इंद्रायणी, पवना, निरेसह अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहे. डिंभे धरणातून ७ हजार क्युसेक, मुळशीतून १० हजार, खडकवासला धरणातून १५ हजार तर वीर धरणातून २३ हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. भीमेच्या खाऱ्यातील नद्यांच्या पाण्यामुळे भीमेला पूर आला असून,  दौंड येथे पात्रातून ५७ हजार क्युसेक वेगाने उजनी धरणात पाणी वाढत आहे.

बुधवारी (ता.२२) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये जिल्ह्यात पडलेला पाऊस (मिमी) : पौड ४१, घोटावडे ४३, माले ५४, मुठे ९९, भोलावडे ९५, निगुडघर ५१, काले १०२, कार्ला ५२, लोणावळा ८६, शिवणे ४३, वेल्हा ४३, वेल्हा ५८, पानशेत ५८, राजूर ९४, आपटाळे ४०, वाडा ४८.


इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रयत्न करु...सोलापूर : ‘‘अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतपिकांचे...
खानदेशात पावसाने दाणादाण सुरूचजळगाव ः खानदेशात गेले दोन दिवस अनेक भागात मध्यम...
जिगाव प्रकल्पग्रस्तांना मिळणार योग्य...बुलडाणा ः जिगाव प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला...
सोलापुरात नुकसानग्रस्तांसाठी `रयत’चे...सोलापूर : सोलापूरसह संपूर्ण राज्यात अतिवृष्टीमुळे...
साताऱ्यात रब्बीची १२ टक्के क्षेत्रावर...सातारा : जिल्ह्यात परतीच्या पावसाने झोडपल्याने...
एफआरपी एकरकमी देणार की तुकडे होणार?सातारा : यावर्षीच्या ऊस हंगामासाठी एक ते दोन...
कृषी योजनांच्या अंमलबजावणीत अकोला अव्वलअकोला ः जिल्ह्यात कृषी विभागामार्फत राबविलेल्या...
पीक नुकसानीची मदत निश्‍चित मिळेल ः मलिकपरभणी : ‘‘हवामान विभागाने रविवार (ता.२५)...
रयत क्रांती संघटनेतर्फे जागरण गोंधळ...पुणे ः  रयत क्रांती संघटनेतर्फे...
इथेनॉल पूर्णत्वासाठी ‘कादवा’ला सहकार्य...नाशिक : ‘‘अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उत्तम...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पुन्हा मुसळधार...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यात अनेक दिवसांची...
नाथाभाऊ काय चीज आहे, दाखवून देऊ : शरद...मुंबई: नाथाभाऊंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने...
शेतकऱ्यांना मदत करण्याचीच भूमिका : शहालातूर : ‘‘कृषी उत्पन्न बाजार समितीने अडचणीच्या...
धान्य खरेदीसाठी नोंदणीचे निर्देशच नाहीत जळगाव ः जिल्ह्यात १ नोव्हेंबरपासून शासकीय धान्य...
मदतीच्या घोषणेचे स्वागत, पण तोकडीः डॉ....नगर ः राज्यात अतिवृष्टीने नुकसानग्रस्त...
जलसंधारणाच्या `बुलडाणा पॅटर्न`चा डंकाअकोला ः महामार्ग तयार करताना त्यासाठी लागणारे...
सोयाबीनचे मूल्यवर्धित पदार्थसोयाबीनपासून सोया-दूध, सोया पनीर, पीठ आणि...
परभणीत रताळी १३५० रूपये प्रतिक्विंटलपरभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
कापूस उत्पादकांचे शोषण थांबवा: विजय...नागपूर: देशात कापसाचे दर कमी होत असतानाच...
फवारणीनंतर १८ एकरातील कपाशीने टाकल्या...अकोला ः जिल्ह्यातील म्हातोडी येथील शेतकऱ्याने...