agriculture news in Marathi,rain will be stop from Saturday, Maharashtra | Agrowon

शनिवारपासून पावसाची उघडीप शक्य
टीम अॅग्रोवन
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

पुणे  : ‘महा’ चक्रीवादळ जमिनीवर आल्यानंतर व विरून गेल्यानंतर पाऊस उघडीप देण्याची शक्यता आहे. शनिवारी (ता. ९) राज्याच्या बहुतांशी भागांत मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. पाऊस थांबताच उत्तरेकडील वाऱ्यांचे प्रवाह महाराष्ट्राकडे येण्यास सुरुवात होऊन थंडीची चाहूल लागणार आहे. मात्र कडाक्याच्या थंडीसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

पुणे  : ‘महा’ चक्रीवादळ जमिनीवर आल्यानंतर व विरून गेल्यानंतर पाऊस उघडीप देण्याची शक्यता आहे. शनिवारी (ता. ९) राज्याच्या बहुतांशी भागांत मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. पाऊस थांबताच उत्तरेकडील वाऱ्यांचे प्रवाह महाराष्ट्राकडे येण्यास सुरुवात होऊन थंडीची चाहूल लागणार आहे. मात्र कडाक्याच्या थंडीसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

‘महा’ चक्रीवादळामुळे आज (ता.६) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यासह उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. राज्यात शुक्रवारपर्यंत (ता. ८) तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. शनिवारी (ता. ९) मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस शक्य असून, उर्वरित राज्यात हवामान कोरडे होईल.

तर बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या ‘बुलबुल’ चक्रीवादळामुळे उत्तरेकडील बाष्प खेचले जाईल, त्या बरोबरच थंड हवा विदर्भ, मराठवाड्याकडे येण्यास सुरवात होईल. हे चक्रीवादळ ओडिशालगतच्या समुद्रात असताना पूर्व विदर्भात हलक्या पावसाची शक्यता आहे. बुलबुल वादळ बंगालकडे गेल्यानंतर साधारणत: नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून राज्यात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे.   

 गारा वारा यामुळे थंडीची चाहूल लागली आहे. मात्र सकाळपासूनच उन्हाचा चटका वाढत आहे. तर दुपारनंतर ढग जमा होऊन वादळी पाऊसही पडत आहे. हवामानातील वेगवान बदलाने तापमानात चढ-उतार होत आहेत. मंगळवारी (ता. ५) सकाळी राज्यात किमान तापमान १७ ते २४ अंशांदरम्यान होते. सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे ३४.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.  

 मंगळवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३१.५ (०.७), जळगाव ३२.८(-०.७), कोल्हापूर ३०.६(-०.२), महाबळेश्वर २३.३(-२.३), मालेगाव २९.२ (-३.१), नाशिक ३१.० (-०.४), सातारा २९.८ (०.३), सोलापूर ३३.० (१.३), अलिबाग ३०.६ (-२.६), डहाणू ३२.४ (-०.६), सांताक्रूझ ३२.९ (-१.३), रत्नागिरी ३२.०(-१.८), औरंगाबाद ३०.५ (-०.१), परभणी ३२.० (०.९), अकोला ३२.८ (०.५), अमरावती ३२.४ (०.३), बुलडाणा २९.० (-०.१), ब्रह्मपुरी ३४.१ (३.०), चंद्रपूर ३३.०(१.६), गोंदिया ३१.८(०.७), नागपूर ३३.२ (२.०), वर्धा ३३.१ (१.६). 

इतर अॅग्रो विशेष
'पणन'ची २७ पासून कापूस खरेदी नागपूर ः सिसिआयची खरेदी सुरूच असली तरी कापूस पणन...
शेतीला व्यावसायिक दर्जा आवश्यक: सुहास...पुणे: भावनिकतेच्या आधारे शेती न करता शेतकरी...
कुजलेल्या तुराट्यांच्या झाडण्याही होणार...परभणी ः यंदा तुरीचं पीक लई जोरात आलं होतं. चांगली...
सांगली जिल्ह्यातील अंडी उत्पादकांना...सांगली ः एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांत...
मानवी, शेती आरोग्यासाठी नैसर्गिक शेतीचा...मानवी व शेतीचे आरोग्य याबाबत अधिक जागरूक झालेल्या...
अभ्यास, नियोजनातून देशी दुग्धव्यसाय...भाजीपाला शेती करण्याबरोबरच रेशीमशेती आणि...
इथेनॉल उत्पादन घटणारपुणे:  देशाच्या इथेनॉलनिर्मितीत मोठी घट...
अकोला जिल्ह्यात कपाशीवर बोंड अळीअकोला ः परतीच्या पावसाने कापूस पिकाचे मोठ्या...
पीकविम्यासाठी शासकीय पातळीवर धावपळपुणे: अतिपावसामुळे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना...
देशात मागणीच्या तुलनेत ४० टक्केच कांदा...पुणे: देशभरात ऑगस्ट महिन्यातील खरीप कांद्याच्या...
किमान तापमानात घटपुणे: राज्यात होत असलेले ढगाळ हवामान निवळल्यानंतर...
राज्यातील सव्वानऊ हजार गावांत पाणीपातळी...पुणे ः चालू वर्षी राज्यातील अनेक भागांत जोरदार...
शेतीतूनच जाते आर्थिक विकासवाट भारतीय अर्थव्यवस्थेवरील मंदीचे सावट दिवसेंदिवस...
मदत हवी दिलासादायकअवकाळी पावसाने राज्यात शेतीच्या झालेल्या...
स्वतःच्या गरजेनुसार यंत्रांची केली...बदलत्या काळात शेतीत मजुरांची संख्या कमी झाली....
व्यापाऱ्यांनी शेतमाल बाजारातील बदल...पुणे ः बाजार समित्या बरखास्त केल्यास सक्षम...
नांदेड : सोयाबीनचा पेरणीपेक्षा अधिक...नांदेड  ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात...
पंचनाम्यांची ‘अतिवृष्टी’; रातोरात ९३...पुणे ः राज्य शासनाची यंत्रणा पिकाचे पंचनामे...
पीकविम्यापासून वंचित राहिल्यास कंपनी...अकोला ः जिल्ह्यात गेल्या महिन्यातील पावसाने...
उसावर आता तांबेरा, तपकिरी ठिबकेकोल्हापूर: सातत्याने पडणारे धुके व जमिनीतील...